प्रसिद्धी पैसा सर्व काही असूनही, सुशांत सिंह राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी अश्याप्रकारे का संपवले जीवन?

उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या बळावर आपले स्थान बॉलीवुडमध्ये पक्के करणाऱ्या काही निवडक कलाकारांमध्ये एक नाव होते आणि ते म्हणजे सुशांत सिंह राजपूत. त्याने त्याच्या फिल्मी करियरमध्ये एका पेक्षा एक उत्तम चित्रपटात काम केले. ‘दिल बेचारा’ हा त्याने अभिनय केलेला सगळ्यात शेवटचा चित्रपट, जो अजून रिलीज झालेला नाही. २००० साली त्याच्या वडिलांची बदली दिल्ली येथे झाली आणि सुशांतही वडीलांबरोबर गेला. अभ्यासात खूप हुशार असलेल्या सुशांतने इंजीनियरिंग करायचे ठरवले. दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये अभ्यास करताना सुशांतला वाटले की त्याने आणखी काही एक्टिविटी अभ्यासाव्यतिरीक्त करायला हवी. त्यानंतर त्याने श्यामक डावर याचा डान्स ग्रुप जॉईन केला आणि अनेक देश विदेशात नृत्याचे शो केले.

‘पवित्र रिश्ता’ मधून निर्माण केली स्वतःची वेगळी ओळख

२१ जानेवारी १९८६ ला पटना येथे जन्म झालेल्या सुशांतने अनेक चित्रपटात ही काम केले. त्याने त्याच्या करियरची सुरुवात २००८ साली ‘किस देश में है मेरा दिल’ या सिरीयल पासून केली. पण तरीही त्याच्या अभिनयाचा ठसा उमटला तो ‘पवित्र रिश्ता’ सिरीयलमधूनच. या सिरीयलमध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री अंकिता लोखंडे हीसुद्धा होती. या सिरीयलमुळे त्याची खास ओळख निर्माण झाली. लोकांना त्याचा अभिनय खूप आवडला.

फिल्म ‘काय पो छे’ मधून केले बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण

२०१३ साली सुशांतनी फिल्म ‘काय पो छे!’ मधून बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्या उत्तम अभिनयाचे सगळ्यांनीच खूप कौतुक केले. पहिल्याच चित्रपटात दर्शक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाल्यानंतर त्याने रोमांटिक, कॉमेडी, ड्रामा, थ्रिलर, स्पोर्ट्स सारख्या जॉनरचे चित्रपट यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि उत्तम अभिनयाने सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. इथूनच त्याच्या करीयरला एक कलाटणी मिळाली आणि त्याची ओळख निर्माण झाली.

२०१३ मध्ये फिल्म शुद्ध देसी रोमांस मध्ये त्याने भूमिका केली तसेच पी.के (2014), डिटेक्टिव बोमेश बख़्शी (2015) व २०१६ मध्ये पूर्व भारतीय कप्तान एमएस धोनी याच्या जीवनावर आधारीत फिल्म एम० एस० धोनी: द अनटोल्ड स्टोरी मधून त्याने आपला जलवा दाखवला. या चित्रपटात त्याने खूप मेहनत घेतली होती. याच्यानंतर सुशांत सिंह फिल्म राब्ता(2017), वेलकम टू न्यूयॉर्क(2018), केदारनाथ (2018), सोनचिड़िया(2019), छिछोरे(2019), ड्राइव (2019) या चित्रपटात दिसले होते.

अजून रिलीज नाही झाला त्याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’

मध्यंतरी सुशांत त्याचा आगामी चित्रपट दिल बेचारा साठी चर्चेत होता. या चित्रपटाच्या रिलीज डेट सारख्या बदलत होत्या. हा चित्रपट ८ मे ला रिलीज होणार होता. याचे पोस्टरही रिलीज झाले होते पण लॉकडाउनमुळे याचे रिलीज होणे लांबले. हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणारा ठरेल यांत काही शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *