अंकीता लोखंडेशी ब्रेकअप झाल्यांनतर कोसळून गेला होता सुशांत सिंह राजपूत, ब्रेक अपचे हे कारण आले आहे समोर…

बॉलीवुडचे धोनी आणि एक मातब्बर अभिनेता म्हणून ओळखला जाणार्या सुशांत सिंह राजपूत याने आपल्या मुंबईच्या घरात गळफास लावून आ त्मह त्या केली. मुंबई येथील बांद्रा परीसरातील त्याच्या घरात त्याचे शव मिळाले. वास्तविक अजूनही पोलिसांना त्याच्या आ त्म ह त्येचे नक्की कारण कळू शकलेले नाही, पण माहितीनुसार त्याच्या नोकराने त्याचे शव घरात पंख्याला लटकलेले पाहिले आणि त्याने त्याची माहिती पोलिसांना दिली.

सुशांत सिंह राजपूतच्या अशा अचानक झालेल्या निधनाने सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरे तर या घटनेवर अजूनही विश्वास बसत नाही आणि अनेक जण अजून या धक्यातून सावरलेले नाहीत. तो अवघ्या ३४ वर्षांचा होता. म्हणूनच हा प्रश्न उभा राहात आहे की इतक्या लहान वयात त्याने आत्महत्या का केली असावी ?
टीवी सिरीयल च्या माध्यामतून पोहोचला चित्रपटात  त्याने त्याच्या करीयरची सुरुवात टीवी मालिकांतून केली आणि त्या नंतर चित्रपटात डेब्यू केला. चित्रपटातील उत्तम अभिनयाने त्याने सगळ्या प्रेक्षकवर्गाचे मन जिंकून घेतले. याशिवाय त्याच्या खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळेसुद्धा तो बराच काळ चर्चेत राहीला.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्याबरोबर त्याचे अनेक वर्षे अफेयर चालले त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले ज्याची बरीच चर्चा झाली. या ब्रेकअप मुळे अंकिता खूप दुःखी झाली होती तसेच सुशांतसुद्धा दुःखी होता. काही काळानंतर त्या दोघांनीएकमेकांना विसरायचा प्रयत्न करत आपापले आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली.

मी वुमेनाइजर नव्हतो किंवा अंकिता एल्कोहोलिकही नव्हती – सुशांत
सुशांत व अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअप नंतर मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होऊ लागली. बातम्या जशा पसरू लागल्या तसे सुशांत ने असेही सांगितले की ना अंकिता लोखंडे एल्कोहोलिक आहे आणि ना मी वुमेनाइजर. खरेतर लोक असेही बोलू लागले कि सुशांत अंकिताच्या एल्कोहोलिक असण्याने त्रस्त झाले होते.

हेच दुसरीकडे सुशांतच्या बाबतीत असे बोलले जायचे कि तो वुमेनाइजर आहे. खरेतर नंतर सुशांत सिंह राजपूत याने ब्रेक अप बद्दल बोलताना असे सांगितले कि अनेकदा लोक न पटल्याने वेगळे होतात आणि असे लोकांचे वेगळे होणे अत्यंत दुर्दैवी आहे.

सुशांत आणि अंकिता यांची भेट टीवी मालिका पवित्र रिश्ता च्या दरम्यान झाली होती. यांत दोघेही महत्वाच्या भूमिकेत होते. सुरुवातीला त्यांच्यात छान मैत्री होती आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बराच काळ त्यांनी एकमेकांना डेट केले आणि नंतर गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली होती. या ब्रेकअप मुळे त्यांचे चाहते हैराण झाले होते कारण त्यांची जोडी खूप लाडकी होती.

Leave a Reply

Your email address will not be published.