काहीही झाले तरी या 3 चुका करू नका नाहीतर रस्त्यावर याल…

जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य चुका करतो भले तो पुरुष असो वा स्त्री. प्रत्येक चुकीचे एक नुकसान ठरलेले असते पण काही चुका अशा असतात संपूर्ण ज्यामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. आचार्य चाणक्य अशा तीन चुका सांगतात ज्या केल्यास रस्त्यावर येण्याची वेळ येते. आचार्य चाणक्य पहिली चूक सांगतात चारित्रहीन स्त्री पासून दूर राहा कारण अशा स्त्रीपासून संपूर्ण जीवन बरबाद होण्याचा धोका असतो. व्यवहारी जीवन खराब होते तसेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. स्त्री फक्त तुमचा वापर करून घेत असते. तुमची सर्व संपत्ती दिली तरी तिची मागणी पूर्ण होत नसते. सोबत त्या व्यक्तीला व्यसन लागण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये खूप बदनामी होते, अशामध्ये चरित्रहीन स्त्री पासून पुरुषांना जितका धोका आहे तितकाच चरित्रहीन पुरुषांपासून स्त्रियांनाही धोका आहे. म्हणून चरित्रहीन स्त्री किंवा पुरुषा पासून दूर राहणे चांगले.

दुसरी चूक ही सर्वात महत्त्वाची ठरेल, कारण ती सर्वांच्या हातून होते, पण ती लवकरात लवकर विचार करून सुधारणे खूप महत्त्वाचे आहे. वाईट विचार किंवा नकारात्मक विचार किंवा दु:खी लोकांपासून दूर रहा. दुःखी म्हणजे एखाद्या संकटापासून किंवा परिस्थितीमुळे दुखी नव्हे, तर समाजामध्ये असे काही लोक पाहायला मिळतात. त्यांच्याकडे बरेच काही असुनसुद्धा काहीच नसल्यासारखे वागतात. सतत एकच प्रॉब्लेम सांगून दुःखी राहतात आणि नकारात्मक बोलत राहतात. त्यांना सवय असते की प्रत्येक गोष्ट नकारात्मक विचार करायची आणि नकारात्मक बोलायची. प्रत्येक गोष्ट नकारात्मक पहायची. त्यामुळे त्यांच्या सहवासात येणारी व्यक्ती नकारात्मक बनतो. 100% नकारात्मक नाही पण त्यांच्या जीवनावर बराच वाईट परिणाम होतो किंवा त्यांची विचारसरणी नकारात्मक बनते. सुखी व समृद्धी जीवन जगायचे असल्यास दु:खी व नकारात्मक लोकांपासून दूर राहा.

तिसरा आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किंवा दुसऱ्याचे वाईट करून स्वतःचा फायदा करून घेणारे व्यक्ती. अशा लोकांपासून कधीही संपर्क ठेवू नका. कारण असे व्यक्ती स्वतः तरी वाईट मार्गावर लागले असतात पण सोबत इतरही चांगल्या लोकांना स्वतःसारखे वाईट बनवतात. अशा लोकांना स्वतःला चांगले म्हणून घ्यायला आवडते व ते इतर समाजाला वाईट सिद्ध करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. सतत त्यांच्या बद्दल वाईट बोलत राहतात. त्यांच्या खूप जास्त बोलण्यामुळे व सतत एकच गोष्ट सांगितल्यामुळे कदाचित ऐकणाऱ्या व्यक्तीलाही त्याचे बोलणे खरे वाटू लागते. त्यामुळे चांगले व्यक्ती वाईट वाटू लागतात. तू गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती चांगला वाटायला लागतो, अशा गुन्हेगारी व्यक्तीच्या सहवासात राहिल्यास इतर लोकांचे विचारही खालावतात. ज्यामुळे वाईट मार्गाचा अवलंब केला जातो, म्हणूनच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहणे चांगले ठरेल.

मित्रानो तुमचे या तीन व्यक्तीबद्दल काय मत आहे, अशा व्यक्तीबरोबर मैत्री करावी की नाही ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

One Comment on “काहीही झाले तरी या 3 चुका करू नका नाहीतर रस्त्यावर याल…”

Leave a Reply

Your email address will not be published.