मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आचार्य चाणक्य एक थोर विचारवंत होते, ज्यांना जीवनाचा परिपूर्ण अभ्यास होता. आचार्य चाणक्यांनी संगीतलेल्या त्या चार गोष्टी पाहू ज्या बुद्धिमान लोकांनी कोणालाही सांगू नयेत. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
पहिली आहे आर्थिक नुकसान….. बिजनेस मध्ये किंवा कोणत्याही व्यवहारामध्ये झालेले आर्थिक नुकसान बाहेरच्या व्यक्तींसमोर बोलू नये, ज्या व्यक्तींना सांगणे खूप गरजेचे आहे अशाच व्यक्तींजवळ ते बोलावे, इतर बाहेरच्या व्यक्तींसमोर हे बोलल्यास तुमची प्रतिष्ठा खालावेल, जेव्हा तुमच्या अपयशा बद्दल लोकांना समजते तेव्हा लोकांचा वागण्याचा दृष्टीकोन बदलतो. खालावलेल्या आणि मागासलेल्या लोकांमुळे गरीब व्यक्ती प्रतिष्टेने जगू शकत नाही. तुमच्या झालेल्या छोट्याश्या अपयशाला मोठे करून ते सर्व समाजामध्ये सांगतात, व अजून तुमची बदनामी करतात जरी तुमच्या मध्ये सामर्थ्य असले तरी व्यवहार करताना लोक तुमच्या पासून दूर राहतात, म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये झालेले आर्थिक नुकसान सर्वांसमोर बोलून दाखवू नये.
दुसरी गोष्ट आहे व्यक्तिगत समस्या…. स्वतःच्या पर्सनल लाईफ बद्दल समाजामध्ये चर्चा करू नये, तुम्ही जेवढे मोठे बनण्याची स्वप्न पाहता तेवढ्या पर्सनल गोष्टी जास्त गुप्त ठेवाव्यात. तुमची कोणतीही कमजोरी जेव्हा इतर व्यक्तींना समजते तेव्हा त्यांचा ते गैरफायदा घेतात. आणि ज्याला आपली कमजोरी समजते तो आपल्या बद्दल सर्वत्र सांगू शकतो, सर्व समाजामध्ये तुमची बदनामी करू शकतो, व तुम्ही एक समाजामध्ये थट्टेचा विषय बनता. समाजात असे काही लोक पाहायला मिळतात जे दुसऱ्यांचे दुःख पाहून आनंदी होतात. व दुःखी लोकांची थट्टा उढवन्यात त्यांना आनंद मिळतो. म्हणून आपल्या पर्सनल गोष्टी कधीही कोणासमोर बोलू नये.
तिसरी आहे पत्नीच्या चारित्र्या बद्दल चर्चा…. आचार्य चाणक्य म्हणतात की आपली पत्नी म्हणजे आपला स्वाभिमान व अब्रू असते, तिच्या बद्दलची चर्चा बाहेरच्या व्यक्ती सोबत करणे म्हणजेच आपला स्वाभिमान किंवा अब्रू घालवण्या सारखे आहे. पत्नीच्या चारित्र्या बद्दल कोणतीही गोष्ट कोणालाच सांगू नये, जेव्हा आपण आपल्या पत्नी बद्दल आपल्या मित्रांसोबत किंवा इतर व्यक्तींसोबत बोलत असतो, तेव्हा अजाणते पाणी असे काही विषय छेडले जातात व आपण कधी गुप्त गोष्टी बोलून गेलो याचे भान रहात नाही , म्हणून कोणत्याही व्यक्ती समोर पत्नी विषयी किंवा आपल्या पत्नीच्या चारित्र्य विषयी बोलू नये.
चौथा आहे अपमानाच्या कथा…. आचार्य चाणक्य सांगतात स्वतःचा झालेला अपमान किंवा आपण केलेले कोणतेही वाईट कृत्य मग ते जाणून बुजून असो किंवा नजाणते पणी झालेले, कधीही अशा गोष्टी बाहेरील व्यक्तींसमोर बोलू नये आपला झालेला अपमान सर्वांना सांगू नये, किंवा या गोष्टी सांगितल्यास समोरच्या व्यक्ती तुम्हाला गृहीत धरण्यास सुरू करते. वारंवार तुमच्या अपमानाची जाणीव करून देते, व इतर समाजा समोरही तुमची थट्टा उडवली जाते. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास खालावतो म्हणून स्वतःचा झालेला अपमान कोणालाही सांगू नये, तुम्ही जर या चार गोष्टींचे पालन केले तर तुम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी बनू शकता, व तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळा येणार नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.