प्रत्येक गोष्टींमध्ये काही वर्षाने बदल हे होतच असतात. कधी चांगले तर कधी वाईट असेच आपले लहान कलाकारही बदलले आहेत. चला तर मग बघुया लहान कलाकार लहानपणी प्रसिद्ध आलेले आता कसे दिसतात. काही कलाकार लहानपणीच चित्रपट सृष्टीमध्ये किंवा मालिकांमध्ये नाव निर्माण करतात. आज आपण अशाच बाल कलाकारा विषयीं बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी लहानपणी काही भूमिका साकार केल्या आणि त्या भूमिका प्रसद्धीस देखील आल्या. पण आता ह्या भूमिका साकार करून खूप वर्ष झाले आहेत. तर आता हे बालकलाकार मोठे झाले आहेत आणि वेगळे दिसू लागले आहेत.
पहिली अभिनेत्री आहे गौरी वैद्य तिने दे धक्का या चित्रपटापासून सुरुवात केली. या चित्रपटापासून तिला प्रसिद्ध मिळाली. दे धक्का मध्ये तिने सायली हे पात्र साकार केले होते, त्या वेळी तिचा गोंडस अभिनय आणि नृत्य देखील लोकांना आवडले होते. शिक्षणाच्या आईचा घो या चित्रपटामध्ये ती पुन्हा आपल्याला दिसून आली होती, पण त्यानंतर ती गायब झाली. बरेच वर्षं ती शिक्षण घेत होती तिने मुंबई मधून माटुंगा येथील डीजे रूपारील इंजिनीरिंग कॉलेज मधून कॉम्पुटर टेक्नॉलॉजी मधून पदवी घेतली आहे. पण आता दे धक्का 2 मध्ये ती पुन्हा दिसण्याची शक्यता आहे, लहानपणीची गौरी आणि आत्ताची गौरी यामध्ये खूप फरक पडला आहे ते अधिकच सुंदर दिसू लागली आहे.
पुढची कलाकार आहे शालू….. फॅन्ड्री या चित्रपटांमधील सर्वांना आजही आठवते. शालू हे पात्र साकार करणारी अभिनेत्री राजश्री खरात आता मात्र खूपच वेगळी दिसते. आता ती अधिकच सुंदर आणि ग्लॅमरस दिसू लागली आहे. फॅन्ड्री चित्रपटानंतर तिचा आयटमगिरी हा चित्रपट सुद्धा प्रसिद्ध झाला होता. आता मात्र तिने बरेच फोटोशूट सुद्धा करून घेतले आहेत. ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते.
पुढची कलाकार आहे दृश्यम मधील अजय देवगन च्या मुलीचे पात्र करणारी मृणाल जाधव. दृश्यम बरोबर लय भारी, तु ही रे आणि अंड्याचा फंडा या चित्रपटांमध्ये सुद्धा तिने काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा भयभीत हा चित्रपट सुद्धा प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटामध्ये सुबोध भावे यांच्याबरोबर तिने काम केले होते. सुरवातीच्या काळामध्ये दिसणारी मृणाल आता मात्र बदलली आहे.
बालक पालक हा चित्रपट आजही सर्वांना आठवतो. या चित्रपटाने खूप लोकांचे मन जिंकले होते. मनोरंजन व माहिती या दोन्ही गोष्टींचे या चित्रपटांमध्ये मिश्रण होते. या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून दिसली होती भाग्यश्री मिलिंदर. बालक पालक या चित्रपटाला आता सात वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि यामधील भाग्यश्री आता मात्र खूप वेगळी दिसत आहे. बालक पालक नंतर ती उबुंटू आणि आनंदी गोपाळ या दोन चित्रपटांमध्ये ती आपल्याला दिसून आली होती.
पुढची अभिनेत्री आहे मालिकांमधून प्रसिद्ध झालेली ती म्हणजे उंच माझा झोका यामधील तिच्या खट्याळ बोलण्यामुळे तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं ती म्हणजे तेजश्री वालावलकर. तेजश्रीने आजी आणि नात, माथ आणि चिंतामणी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच झी युवा वरील जिंदगी नॉट आऊट या मालिकेमध्ये दिसून आली होती. उंच माझा झोका मधील दिसणारी मुलगी आता मात्र खूप मोठी झाली आहे. आणि खूप वेगळी आणि सुंदर दिसू लागली आहे.