नागराज मंजुळे यांचा बिघडलेल्या मुलापासून लोकप्रिय दिग्दर्शक पर्यंतचा प्रवास….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला यायचं आणि सिनेमासृष्टीचे स्वप्न पहायचे हे ऐकायला कितीतरी अवघड वाटतं, आणि त्यामध्ये कुटुंबाची परिस्थिती खूपच हालाकीची असेल तर आणखीनच अवघड.. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा जीवन प्रवास खूपच खडतर झालेला आहे. आज आपण त्यांचा हा खडतर प्रवास पाहणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

सध्याच्या काळात मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळे वळण मिळलेले आहे या वळणामध्ये दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळेचा महत्वाचा वाटा आहे. कवी, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक तर कधी स्क्रीन लेखक अशा वेगवेगळ्या पैलुतून नागराज मंजुळेचा प्रवास झालेला आहे. लोक त्यांना नागराज या नावाने ओळतात, नागराज यांचा जन्म 24 अगोस्ट 1978 मध्ये करमाळा तालुक्यात जेऊर या गावात झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव पोपटराव मंजुळे असे आहे. नागराजच्या काका काकूंना मुले नसल्याने नागराजच्या वडिलांनी नागराजला काकू काकांच्या पदरात दिल आणि नागराजचे वडील कुटुंबा सहित तुळजापूरला आले, नागराजचे बालपण जेऊर या गावात झालं, कारण काका काकूंनी खूप प्रेम दिल असले तरी नागराजला एकटेपणा जाणवू लागला. एकटेपण घालवण्यासाठी अण्णा दिवसभर घराबाहेर राहायचे या कारणाने मंजुळे व्यसनाच्या दिशेने जाऊ लागले.

घरच्यांसाठी आणलेल्या दारूच्या बाटलीतून थोडीशी दारू ते पिऊ लागले, अशा पद्धतीच्या सवयी लागल्यामुळे नागराजला पैशाची गरज भासू लागली प्रसंगी ते चोऱ्याही करू लागले. चोऱ्या करून मिळालेल्या पैशातून तर व्यसन आणि जुगाराच्या विश्वात रमले. एवढे सर्व करून देखील त्यांचा एकटेपणा काही दूर झाला नाही. उलट ते काही पटीने वाढले, त्यामुळे शाळेत किंवा अभ्यासात त्यांचे मन कधी रमायचे नाही. मग शाळा बुडवून मित्रांसोबत सिनेमा पाहायला जाणे असे प्रकार सुरू झाले.

सिनेमे पाहत असताना त्यांना चित्रपटाच आणि चित्रपट सृष्टीच आकर्षण वाटू लागले. अमिताभ बच्चन यांचे ते खूप मोठे फॅन आहेत. काही कारणाने नागराज मंजुळे करमाळा वरून जेऊरला आले जेऊरमध्ये आणि तेथे आल्यावर सर्वच त्यांना वेगळे वाटत होते व त्यामुळे त्यांना अशी भीती वाटू लागली की आपल्या अशा सवयीमुळे आपल्याशी कोणी मैत्री करणार की नाही? आणि मग त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे ठरवले व या दरम्यान त्यांना एक मुलगी आवडत होती, व ते सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायचे.

दहावीच्या कर्यक्रमात नापास झाल्याने नागराज मंजुळे खूपच निराश झाले, पण त्यातून त्यांना वाचनाची आवड लागली. वाचनालयात जाऊन अण्णा मिळेल ते वाचायचे, वाचनापासून त्यांना लिहण्याची प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी लेखन चालू ठेवले लिहता लिहता ते कविता देखील करू लागले. 12 मध्ये असताना पहिली कविता त्यांनी केली आणि त्यांच्या कवितेचे कौतुक देखील झाले. आणि खूप कौतुक मिळल्याने त्यांच्या आत्मविश्वस वाढला आणि आणखी जोमाने ते लिहू लागले त्यांच्या उन्हाच्या तटाविरुद्ध हा त्यांचा कविता संग्रह छापून आलेला आहे.

यामधून त्यांना विचार आला की आपल्या आयुष्यातील वास्तव लोकांसमोर मांडायला हवे, आणि म्हणून ते चित्रपट सृष्टीकडे वळाले, त्यासाठी मास कम्युनिकेशनच शिक्षण देखील त्यांनी घेतलं. प्रशिक्षणा नंतर नागराज मंजुळेने लघु पटाद्वारे आपली पहिली कलाकृती सादर केली, ती म्हणजे पिस्तुल्या…. या लघुपटामुळे नागराज मंजुळे यांचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यानंतर त्यांनी प्रथमच मोठ्या पडद्यावर म्हणजे फँड्री या चित्रपटाच्या माध्यमातुन एक वेगळीच कथा पडद्यावर मांडली. आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे शीर्षक गीत सोडून कोणतेही गाणं नसतानाही या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले.

त्यावरच मंजुळे थांबले नाहीत तर 2016 मध्ये महाराष्ट्राला वेड लावणारा चित्रपट त्यांनी आणला तो म्हणजे सैराट…. गाणी कथा अभिनय दिगदर्शन अशा सर्वच बाबी या चित्रपटाच्या होत्या त्यामुळे सर्वच स्तरांवर चित्रपटाचे खूप कौतुक झाले आणि प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रतिसात दिला. व हा चित्रपट मराठी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. व या सर्व चित्रपटांमुळे नागराज मंजुळे यांना चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख मिळली आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.