हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की लसणामध्ये आजार संपवण्याची क्षमता असते. अनेक पदार्थांत स्वाद आणण्यासाठी लसणीचा वापर केला जातो पण इतकेच नाही तर अनेक स्वास्थ्य फायदेही याचे आहेत. लसणामध्ये मुख्य औषधीय यौगिक एलिकिन नावाचे तत्व आहे ज्यात जीवाणुरोधी, एंटीवायरल, एंटिफंगल तसेच एंटीऑक्सिडेंट गुण असतात. आयुर्वेद आणि स्वयंपाकघर दोन्ही दृष्टीकोनातून लसूण ही एक खूप महत्वाचे पिक आहे.
लसूण हे एक बारामाही पिक आहे जे मूळ रुपात मध्य एशियातून आले आहे तसेच ज्याची शेती आता फक्त भारतात नव्हे तर जगभरात होते. घरगुती गरजांना पूर्ण करण्याशिवाय भारतात याची निर्यात होते. पदार्थात स्वाद वाढविण्यासाठी याचा वापर केला जातो. याव्यतिरीक्त लसणात वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन आणि पोषक तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात.
यांत विटामिन बी १, बी ६ आणि सी च्या बरोबरीने मैंगनीज कैल्शियम, तांबा, सेलेनियम व अशी अनेक खनिजे असतात. याचे जास्तीत जास्त आरोग्य लाभ मिळवण्यासाठी ही कच्चीच खावी. शिजलेल्या लसणात अनेक महत्वाच्या राशी हरवलेल्या असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लसूण हृदयाशी संबंधित समस्याही दूर करते.
लसूण खाल्ल्याने रक्ताचा जमाव होत नाही आणि त्याचबरोबर हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.
लसूण कच्चा खाल्ल्याने किंवा पदार्थात वापरल्याने बरेच फायदे असतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की लसूण खिशात ठेवल्यानेही बरेच फायदे होतात? होय , हे खरे आहे. वास्तूशास्त्रानुसार तुमच्या खिशात लसूण ठेवला तर खूप फायदे होतात.
घरातून निघून जाईल सगळी नकारात्मक उर्जा
जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक उर्जा असेल तर तुम्ही तुमच्या खोलीत लसूण ठेवाज्यामुळे सगळ्या वाईट गोष्टी टळतील. याला खोलीत ठेवण्याआधी सुंदर कांड पाठ करावा, असे केल्याने संकटे दूर होतील आणि सकारात्मक उर्जा तुमच्या घरी येईल. तुमच्या खिडकीत लसूण नक्की ठेवा. फक्त इतकेच नाही तर यांमुळे घरात किडे किंवा पाली येणार नाहीत. याच्या वासाने झुरळे, किडे, पाली पळून जातील.
चांगली झोप
असे म्हणतात की तुमच्या उशीखाली जर लसूण ठेवलीत तर तुम्हाला झोप चांगली येईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खिशातही लसूण ठेवू शकता. तुमच्या पाकिटात लसूण ठेवलीत तर पाकीट सदैव भरलेले राहील. लसूण बाळगणे हे खप चांगले आहे आणि त्याने तुमचे नशीबही उजळून निघेल.
लसूण खूप गुणकारी असून त्याचे इतरही बरेच फायदे आहेत. त्याचा वापर करा आणि फरक पहा. खिशात ठेवा किंवा जेवणात घाला, याचे फायदे नक्कीच होणार आहेत.