इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री, जिचे सुंदर रूपच बनले होते तिच्या मृत्यूचे कारण…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, इतिहासामध्ये अशा असंख्य राण्या होऊन गेल्या ज्यांची सुंदरता पाहून प्रत्येकाला असे वाटत होते की अशीच आपली पत्नी असावी. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका स्त्री बद्दल सांगणार आहोत ज्या स्त्रीची सुंदरताच तिच्या मृत्यूचे कारण बनली. भारताच्या इतिहासमध्ये सर्वात सुंदर राणींमध्ये राणी रुपमतीचे देखील नाव घेतले जाते. रुपमती मांडू मधील एका शेतकऱ्याची मुलगी होती. नावा प्रमाणेच ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्याच बरोबर ती एक चांगली गायिका देखील होती.

मांडूचे अंतिम स्वतंत्र शासक बाज बहादुरने देखील रुपमती बद्दल बरेच ऐकले होते. आणि म्हणूनच त्यांनी रुपमतील आपल्या महालात गायनासाठी बोलावले. व राजा रुपमतीच्या सौंदर्याने आणि गायनाने इतका प्रसन्न झाला की त्याने तिच्याशी विवाह केला.

नंतर जेव्हा अकबरला रुपमती बद्दल समजले तेव्हा तो देखील तिला मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. व त्याने बाज बहादूरला पत्र लिहिलेले की, रुपमतीला त्यांच्या सेवेसाठी पाठवण्यात यावे. नंतर हे पत्र वाचून बाज बहादूरला खूप राग आला आणि त्याने असे करण्यास साफ नकार दिला.

बाज बहादूरचे उत्तर ऐकून अकबर संतावला आणि त्याने आपल्या सेनापती आजम खानला आज्ञा दिली की, मालवा वर त्वरित आक्रमण करा आणि तेथील राणी रुपमतीला कैद करा. अकबराचे सैन्य खूप मोठे होते आणि बाज बहादूरचे सैन्य लहान….. तरी देखील बाज बहादूरने अकबरच्या सैन्याशी युद्ध केले परंतु बाज बहादूर हारले आणि अकबराच्या सैन्यानी बाज बहादुरला कैद केले.

रुपमतीने संपवले आपले जीवन

आजम खानजेंव्हा रुपमतीला घेऊन जाण्यासाठी त्यांच्या महालाजवळ निघाला तेंव्हा तिने विष पिऊन स्वतःला संपवले. आणि ही बातमी जेव्हा अकबरला समजली तेव्हा अकबर खूप दुःखी झाला आणि त्याने रुपमती साठी एक मकबरा बनवला. व बाज बहादूरला सन्मानाने त्याच्या राज्यात पाठवले. जेव्हा बाज बहादूर मालवामध्ये पोहोचले तेव्हा रुपमतीच्या मकबरे वर आपले डोके आपटून प्राण सोडले. आजही आपण मध्य प्रदेशात गेलो तर तिथे आपल्याला दोन्ही मकबरे दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *