नवऱ्याने बेडरूममध्ये चुकूनही करू नयेत या चुका, नाहीतर…

बेडरूम ही एक अशी जागा आहे जिथे नवरा आणि बायको सगळ्यात जास्त वेळ घालवतात. पती आपल्या कामात तर पत्नी आपल्या कामात गर्क असते. रात्री घरी आल्यावर ते एकमेकांबरोबर वेळ घालवतात याच बेडरूममध्ये. म्हणूनच ह्या किमती क्षणांत काही चुका करू नये. आज आम्ही तुम्हाला अशा काही सात गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही बेडरूममध्ये टाळल्या पाहिजेत. जर या तुम्ही चुकूनही केल्यात तर तुमच्या नात्यात एक दरी निर्माण होऊ शकते.

सतत मोबाईलमध्ये घुसून राहणे : सतत मोबाईलमध्ये घुसून राहू नका. याने तुमच्या पार्टनरला तुम्ही इग्नोर करताय असे वाटेल. थोडा वेळ तुमचा मोबाईल बाजूला ठेवू पार्टनरबरोबर वार्तालाप करा. दिवसभराच्या गोष्टी आपल्या पार्टनरला सांगा जेणेकरून तुमचाही ताण हलका होईल तसेच झोपही शांत लागेल.

न बोलता झोपून जाणे : बेडरूम मध्ये आल्या आल्या न बोलता झोपून जाऊ नका.त्याआधी थोडा वेळ तरी तुमच्या पार्टनरशी गप्पा मारा. असे न केल्यास तुमच्या पार्टनरला वाईट किंवा एकटे वाटू शकते आणि तुमच्या नात्यात त्याने अडथळा येऊ शकतो. थोडा संवाद साधणे आवश्यक असते.

रात्री मित्रांशी गप्पा मारत बसणे : रात्री उशिरापर्यंत मित्रांशी गप्पा मारत बसू नका. त्याने समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल किंवा त्याचे महत्व कमी झाल्यासारखे वाटेल.

अव्यवस्थित खोली: तुमची खोली कायम व्यवस्थित असू द्या. अव्यवस्थित खोली असली तर चिडचिड होते आणि त्याने तुमच्या नात्यात दरी निर्माण होऊ शकते. याने रोमान्स करण्याची इच्छा होणार नाही, यांमुळे एक नेगेटिव उर्जा तयार होईल ज्याने भांडणे होण्याची शक्यता वर्तवते. म्हणून खोली नेहमी नीटनेटकी ठेवा.

कामाच्या ऑर्डर सोडणे : कधीही आपल्या पत्नीला बसल्या जागी कामाच्या ऑर्डर सोडून नये, तसे केल्यास तिला राग येऊ शकतो. लहान सहान कामे तुमची तुम्ही करत जा. पाणी आण किंवा कपडे ठेव अशी लहान सहान कामे सारखी सांगितल्याने नात्यातील तणाव वाढू शकतो.

रोमांसचा दबाव: तुमच्या पत्नीकडून रोमान्सची अपेक्षा करणे चूक नाही पण तसा दबाव कधी आणू नका याने तुमचे संबंध जास्त बिघडतील. जर मूड नसेल तर गप्पा मारल्या तर तणाव कमी होईल.

राग : राग ही खूप वाईट गोष्ट आहे, रागात माणूस काही उलट सुलट बोलून टाकतो आणि नंतर त्याला त्याचा पश्चात्ताप होतो ज्याचा काही उपयोग नसतो. यांमुळे आपल्या नात्यावर परीणाम होईल. म्हणून बेडरूममध्ये जाताना राग बरोबर घेऊन जाऊ नये.

पती पत्नीतील नाते उत्तम ठेवायचे असेल तर या काही महत्वाच्या गोष्टी जरूर लक्षात ठेवा आणि त्यांचा अवलंब करा.

3 Comments on “नवऱ्याने बेडरूममध्ये चुकूनही करू नयेत या चुका, नाहीतर…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *