दुसरे मुल जन्माला घालण्याआधी ट्विंकलने अक्षयच्या समोर ठेवली होती ही अट, वाचून धक्काच बसेल…

बॉलीवुडमध्ये विवाहीत जोडपी बरीच प्रसिद्ध आहेत पण अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची गोष्ट काही वेगळीच आहे. या दोघांचा जोडा शोभून दिसतो. ही जोडी कायम सोशल मिडिया आणि पब्लिक इवेंटमध्ये बरीच चर्चेत असते. यांची पहिली भेट फिल्म फेयरच्या एका फोटोशूट दरम्यान झाली होती. ट्विंकलला पाहताच अक्षय तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर जेव्हा त्या दोघांनी एकत्र ‘इंटरनेशनल खिलाड़ी’ मध्ये काम केले तेव्हा त्यांचे प्रेम अधिक दृढ झाले.

अक्षय ला बनवले गेले १५ दिवसांपुरता बॉयफ्रेंड : एका इंटरव्यूमध्ये ट्विंकलने सांगितले होते की जेव्हा तिची आणि अक्षयची पहिली भेट झाली, तेव्हा तिचे एक ब्रेकअप झाले होते जे नाते दीर्घकाळाचे होते. त्यामुळे ते दुःख विसरण्यासाठी तिला कोणाचीतरी गरज होती ज्याच्याबरोबर ती चांगला वेळ मजेत घालवू शकेल. त्यावेळी तिने अक्षयला तात्पुरता १५ दिवसांचा बॉयफ्रेंड बनवला. पण झाले असे की त्या पंधरा दिवसात त्यांचे खरेच प्रेम झाले आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

लग्नाआधी ठेवली ही अट समोर: लग्नाआधी ट्विंकलने एक आगळीवेगळी अट समोर ठेवली होती. अक्षयला लवकर लग्न करायचे होते पण तिला मात्र थोडा वेळ हवा होता. त्यावेळी तिचे करीयर जोरात चालले होते. अक्षयला असे वाटत होते की ट्विंकलने लग्नानंतर चित्रपटात काम करू नये. एका अटीवर ती हे लग्न करण्यास तयार झाली. त्यावेळी तिचा “मेळा” चित्रपट रिलीज होणार होता. तिने असे सांगितले की हा चित्रपट जर फ्लॉप झाला तर ती लग्न करून संसार मांडेल. पुढे हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि तिने त्याच्याशी लग्न केले. ठरल्याप्रमाणे लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणे सोडून दिले. सध्या ती लेखिका आहे, काही पुस्तके तिने लिहिली आहेत.

 

फैमिली बेकग्राउंड तपासली होती : एका इंटरव्यूमध्ये ट्विंकलने असे सांगितले आहे की तिने लग्नाच्या आधी अक्षयच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती मिळवली होती. तिने हेही तपासले होते की त्यांच्या कुटुंबात कोणाला एखादा गंभीर आजार तर नाही. हे यासाठी कारण तिला असे वाटत होते की भविष्यात तिच्या मुलांना कोणताही आजार होऊ नये.

दुसरे मुल व्हायच्या आधी ठेवली होती ही अट : अक्षय जेव्हा दुसर्या मुलाचा विचार करत होते तेव्हा ट्विंकलने त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. खरेतर जेव्हा हे दोघे ‘कॉफ़ी विथ करण’मध्ये आले होते तेव्हा ट्विंकलने असे सांगितले होते की तिची ही अट आहे की जोपर्यंत तो दर्जेदार आणि उत्तम चित्रपट करत नाही, तोपर्यंत ती दुसरे मुल जन्माला घालणार नाही.

सासू समजत होती “गे” : ट्विंकलने बोलताना एक मजेदार किस्सा सांगितला, तिची आई डिम्पल कपाड़िया आधी अक्षयला गे समजत असे. तेव्हा डिम्पलने ट्विंकलला हा सल्ला दिला की तिने लग्नाआधी अक्षयबरोबर एक वर्ष राहून त्याला ओळखावे.

सध्या अक्षय-ट्विंकल त्यांची मुले आरव आणि नितारा यांच्याबरोबर खूष आहेत.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.