मुलगी न्यासाला अशी वागणूक देतो अजय देवगण….

एका मुलीसाठी तिचे वडील हिरोही बनू शकतात आणि विलनही. हे अवलंबून असते ते तिला कशी वागणूक देतात त्यावर. हल्ली जमाना खूप बदलला आहे. अशात मुलींना वाढवण्याची पद्धत आणि त्यामागचे विचार बदलायला हवेत हे मात्र नक्की. अजय देवगणचे त्याची मुलगी न्यासा हिच्यावर खूप प्रेम आहे. हल्ली त्यांच्यातील नाते अगदी दृढ झाले आहे. अजयची तिला वागणूक देण्याची खूप चांगली पद्धत आहे जिचा अवलंब सगळ्या वडीलांनी करायला हवा.जर असे केले तर त्यांचे नाते आणखी दृढ होईल.

मित्र बना: मुलीशी मैत्रीचे नाते जपायला हवे. एक कडक वडील यापेक्षा एक उत्तम मित्र असे नाते जोपासलेत तर नक्कीच फायद्याचे आहे. जर तुमी मुलीचा चांगला मित्र झालात तर ती तुमच्यापासून काही लपवणार नाही आणि सगळ्याच गोष्टी तुमच्याशी शेयर करेल. अजयचे न्यासाशी मैत्रीपूर्ण नाते आहे. असे केल्याने मुलगी नक्की तुमचे ऐकेल.

करियर चॉइस करताना दबाव आणू नका : मुलीला तिच्या करीयरची वाट स्वतः निवडू द्या आणि तिच्या निवडीवर दबाव आणू नका. न्यासाला पुढे जाऊन काय करायचे आहे किंवा कोणत्या प्रकारची नोकरी करायची आहे याचा निर्णय त्याने तिच्यावर सोपवला आहे. एका इंटरव्यूमध्ये त्याने असे सांगितले की आईवडिलांनी कधीही त्यांचे निर्णय मुलांवर लादू नयेत. अशाने मुलांना मानसिक दबाव येऊन ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. त्यांनी कोणताही करियर मार्ग निवडला तरी पालकांनी त्यांना आधार दिला पाहिजे आणि योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे.

आवडते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य : मुलींना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. बंधने घातली तर त्या तुमच्यापासून दुरावतील व त्यांचा आत्मविश्वास खच्ची होईल. अजय कधीही न्यासाला तिच्या आवडीचे कपडे घालण्यापासून अडवत नाही, मग ते कितीही लहान असोत.

प्रोटेक्शन आणि सपोर्ट : प्रत्येक पित्याने आपल्या मुलीला आवशयक तो आधार आणि संरक्षण द्यायला हवे जेणेकरून तिचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक पिता आपल्या मुलीसाठी प्रोटेक्टिव असतो आणि अजय काही अपवाद नाही. जर कोणी तिला ट्रोल केले तर तो सडेतोड उत्तर देतो. जेव्हा एक पिता आपल्या मुलीबाबत प्रोटेक्टिव असतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीत तो तिला सपोर्ट करतोच.

वेळ देणे : अजय एक व्यस्त अभिनेता आहे पण तरीही तो त्याच्या मुलीला पूर्ण वेळ देतो. न्यासा शिक्षणासाठी सिंगापूरला असते आणि बरेचदा शुटींग संपल्यावर तो थेट सिंगापूरची फ्लाईट पकडतो.
अजयप्रमाणेच आपणही आपल्या मुलांना पुरेसा वेळ द्यायला हवा. ज्यामुळे तुमच्यातील नाते आणखी चांगले होईल.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.