महाराष्ट्रातील पहिली पोस्ट मार्टम करणारी महिला सांगतेय त्या खोलीतील भयानक सत्य !

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, 28 वर्षांची महाराष्ट्र कन्या शीतल चव्हाण चक्क पोस्ट मार्टम करून उदर-निर्वाह करते. तिची कहाणी अंगावर काटा उभा करते, परंतु डोळ्यात पाणी येऊन देत नाही. कारण स्वतः शितलनेच तिच्या डोळ्यात कधीही पाणी येऊन दिले नाही, तिच्या डोळ्यात आहे ती फक्त उमेद….! तुम्हाला हे ऐकून तुम्हाला शितल कोण आहे हा प्रश्न नक्कीच पडला असेल, तर चला आपण या शीतल विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

“शीतल रामलाल चव्हाण” पुणे जिल्यातील भोर मध्ये राहत असून तिने जगण्यासाठी मृतांचे जग जवळ केले. पण आता हे जग बदलायला हवे असे तिला तीव्रतेने वाटू लागले आहे, मग हा प्रश्न पडतो की, कसे आणि कोण बदलणार तिचे हे जग? ‘शीतल रामलाल चव्हाण’ हे तिचे संपूर्ण नाव, तिचे हे कुटुंब भाकरीच्या शोधत कुठून आले? हे कोणाला सांगू शकत नाही. वाल्मिकी समाजातील हे कुटुंब कितीतरी वर्षांपासून भोर मध्येच स्थिरावले आहे, आणि तिचे आजोबा सफाई कामगार होते. सफाई करत करत ते डॉक्टरांच्या सहवासात राहून पोस्ट मार्टम म्हणजेच PM करायला शिकले. व त्यांचा मुलगा रामलाल हा भोर मध्ये मजुरी करायचा आणि त्याचे वडील PM करत असल्याने त्यालाही PM करता यायचे, परंतु हे काम काही पूर्ण वेळ काम म्हणजेच (पर्मनंट) न्हवते. कधी बोलावणे आले तरच जायचे, अन्यथा बिगारी काम शोधायचे आणि त्यावरती खर्च चालवायचा.

रामलालला पहिली मुलगी झाली आणि तीच ही मुलगी शीतल….! बापाची लाडकी, कधी कधी ती बापाच्या कामात मदत देखील करायची, पुढे जाऊन वडील म्हातारे झाले वारंवार आजारी पडू लागले, आता घरची सर्व जवाबदारी शीतल वरती पडली होती घर खर्च चालवण्यासाठी ती पोस्ट मार्टम करायला जाऊ लागली. आणि विशेष म्हणजे जेव्हा तिने पाहिल्यांदा PM केले तेव्हा ती 12 ते 13 वर्षांची असावी.

जेव्हा ती सहावी-सातविला होती तेव्हा एक पाण्यात बुडून फुगलेली डेड बॉडी आली होती. व त्या बॉडीचे PM काराचे होते पाहिले तर बॉडी वर पासून खाल पर्यंत फाडून पुन्हा शिवायची होती, तेव्हा तिला वडिलांनी धीर दिला आणि म्हणाले बाळा मेलेल्या माणसांना त्रास होत नसतो……!

नंतर शीतल धाडसाने उभी राहिली, आणि एक कवळा जीव हातात छन्नी, हातोडा आणि बेल्ड घेवून प्रेत फाडुन शिवू लागली, हळूहळू वडील अधिकच अशक्त होऊ लागले, तेव्हा तर शीतल सातत्याने त्यांच्या बरोबर जाऊ लागली. आणि बघता बघता ती डेड बॉडीच्या जगात स्थिरावली…. कारण तिला जगाचे होते, कुटुंब जगवायचे होते, आणि त्यासाठी तिला उपलब्ध झाले ते मायतांचे जग…..!

शीतल म्हणाली वारंवार प्रेत बघून, प्रेत फाडून नजर मरून जाते, भीती संपून जाते, वेगळे असे काहीच वाटत नाही आणि हे बोलत असताना पुढे म्हणते की भूत पिशाच्च वगैरे काहीही नसतात…. आणि जर आत्मा असेल तर तो मारणाबरोबरच शरीरातून निघून जात असावा, आणि आत्तापर्यंत तरी मला तसे कुठेच काहीही दिसलेले नाही.
मात्र हे एक खरे आहे की, प्रेतांची दुर्गंधी सहन करण खूप कठीण असत.

काही वेळेस त्यात किडे-आळ्या होतात, व त्या प्रेताची इतकी दुर्गंधी येते की पुढचे चार दिवस डोक सुंध होऊन जातं, अन्न पाण्यावरची वासना निघून जाते. नंतर या सर्वातून पुन्हा रुटीनवर येते तेवढ्यात पुन्हा लगेच PM करण्यासाठी कॉल येतो, खंडाळा, शिरवळ, वारंदळ अनेक ठिकाणी स्पॉट PM साठी बोलावले जाते. PM करण्यासाठी बहुतेक सरकारी दवाखान्यांसमोर कफलग, व्यसनी किंवा असाच कोणीतरी माणूस असतो. बहुतेक ठिकाणी राजस्थान मधून आलेले काही जण असतात, PM करण्यापूर्वी ते हातभट्टी भरपूर रिझवतात जणू की काही नशेतच डेड बॉडी फाडायला लागतात, जोडायला लागतात. दुर्गंधीच त्यांना काहीच वाटत नाही कारण त्यावर मात करणारी दारू त्यांनी रिझवलेली असते म्हणजे खूप दारू पिलेले असतात.

PM करणारा म्हणून कोणी पूर्णवेळ नोकरीत नसतो. कारण हे काम ग्रामीण भागात रोज नसत…. दवाखान्यातील अशी कामे कोणीतरी स्वीपर किंवा बाहेरचा कठोर दिलवाला व्यक्ती करत असतो. शितलच देखील तसेच काही झाले आहे, वडिलांच्या निधनानंतर स्वीपरची नोकरी मिळाली, शितलला 7-8 हजार साठी दवाखाना स्वच्छ ठेवणे, तिथले स्वच्छता ग्रह साफ ठेवणे असे काम करायला लागायचे . या शिवाय वरदी आली तर PM साठी जायचे, आणि विशेष म्हणजे वरदी कुठूनही आणि आधीही येऊ शकते, व हे सर्व करत असताना आपले PM चे काम झटपट आणि चांगले व्हावे म्हणून तिने स्वतःच स्वतःच्या पैशातून घेसाड्याकडून एक धारधार हातोडा आणि छन्नी विकत घेतली आहे. कारण एखाद्या सरकारी खात्याध्ये हत्याराला धार कमी असते, आणि कागद अगदी धारधार असतो. सरकारी दवाखान्यांमध्ये जेव्हा टेंडर मंजूर होईल तेव्हाच तेथील हत्यारांवर धारेच पाणी पडते.

मुलांच्या या जगातल्या विलक्षण अनुभवांनी शितलचे 28 वर्षांच आयुष्य सरुन गेलं. आणि या 28 वर्षांमध्ये तिने अनेक PM केले आहेत, उदा. एक मातेन आपलं दोनतीन दिवसांच अर्भ फेकून दिल होत… त्याचे देखिल PM करायला लागले, नंतर एकाने बाईला जळून फेकली होती, त्याचे देखील PM केले…. कोणीतरी कोणाचा खून करून प्रेत पुरून टाकले होते आणि किती तरी दिवसांनी जंगली जनावरांनी ते प्रेत उकरून काढलं होत. त्याचे तुकडे झाले त्याचही PM केले. एकाला तर कोणीतरी गोळ्या घातल्या होत्या अशा परिस्थितीत ती डेड बॉडी कुजलेली होती आणि खूप शोधले तर गोळ्या सापडत न्हवत्या नंतर मग त्या डेड बॉडील अंघोळ घालून लवचुंबकाच्या मदतीन गोळ्या काढण्यात आल्या…. तुम्हाला सांगू इच्छितो की सडलेल, कुजलेल, जळलेल, तुटलेल देह फाडणे खूप आव्हानात्मक असते. बोलता बोलता शितलन किती प्रेतांच्या आणि मारणांच्या कथा सांगितल्या हे तिलाही कळले नसावे.

आपण किती PM केली याचा आकडा शीतलला सांगता येत नाही, परंतु आता आपल्या कामात थोडा बदल व्हावा आणि साफ सफाईच काम मिळावं, शिपायाचे काम मिळाळे, आणि कोणीतरी आपला गांभीर्याने विचार करून आपल्यावर उपकार करावेत असे तिला वाटत आहे….

या सर्व गोष्टींमध्ये लग्नाचा विचारही तिच्या मनात तरळून जातोय, असे देखील म्हणता येईल की प्रेत फाडून तिचा एक केमिकल लोच्या झाला आहे. आणि तिला दुःख पचवण्याची दांडगी सवय लागल्यामुळे तिला मन मोकळे करण्यासाठी रडताच येत नाही, काहीही घडलं तरी तिला रडू फुटत नाही. बाप मेला तेव्हा देखील तिचे डोळे ओले झाले नाहीत याची तिला खंत आहे. शिवाय सर्व कुटुंबाची जवाबदारी तिच्या खांद्यावर आहे, तिच्या दोन बहिणी दहावी आणि बारावीत आहेत, त्या दोघीही कधी ना कधी प्रेतांन जाऊन धडकल्या आहेत, परंतु त्यांना शिकवून मोठे होऊन डॉक्टर, इंजिनीयर वैगेरे व्हायचे आहे.

घरात प्रत्येकच कोणतं ना कोणतं स्वप्न आहे मात्र त्याला पंख देण्याची जवाबदारी शीतलची आहे. कदाचित या स्वप्नांनमुळेच ती राडण्यापासून मुक्त झाली असेल, आणि स्वप्न पूर्तीच्या साऱ्याच वाटा बंद झाल्या असल्यामुळेच ती प्रेत फाडून शिवत असेल. PM करणारी ती देशातील बहुतेक पहिलीच महिला असावी आणि आता तिला या जगातून बाहेर येऊन दुसऱ्या जगात जायचे आहे परंतु तिथे देखील प्रश्न निर्माण होतो की ती कशी जाणार? ,

महा शक्तिमान असणाऱ्या या समाजाणं आणि शासनाने मनावर घेतल तर तिला कुठेही शिपाई म्हणून नेमता येईल किंवा तिला तिच्या त्या पदावरून इतर ठिकाणी बदली करता येईल, किंवा तिच्या भावंडांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलता येऊ शकतो, BPL सारख्या योजनांनमध्ये तिला घर देता येऊ शकते, तिच्यासाठी आयुष्यभर PM करत राहण, मृतांवर हत्यार चालवत राहणं हे काही सोप काम नाही. हे सर्व करण्यासाठी त्या व्यक्तीने खूप विचार केलेला असतो अनेक संवेदनाही मारलेल्या असतात, प्रसंगी प्रेमाचं रुपांतरही मृतात केलेल असत, शितलच्या मनामध्ये समाज सेवा करण्याची खूप मोठी इच्छा आहे. आणि त्याच बरोबर हे देखील खरे आहे की तिच्या कामचे कौतुक करून तिला बढती देण्याची गरज आहे. तिच्या खांद्यावर फक्त शाल टाकून तिचे जग काही बदलणार नाही…… यासाठीज्यांना कुणाला तिला शाब्बासकी द्यायची असेल मदत करायची असेल तर हा तिचा पत्ता… शीतल रामलाल चव्हाण, घर नं. 569, नागोबा आळी, भोर तालुका- भोर, जिल्हा- पुणे, मोबाईल नंबर:- 7038875310, शीतल ने जगण्यासाठी मृतांचे जग जवळ केले आहे हे खरे आहे पण जिवंत माणसांच्या जगात आत्मसन्मानाने जगण्याचा तिचा हक्क नाकारून कसा चालेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

6 Comments on “महाराष्ट्रातील पहिली पोस्ट मार्टम करणारी महिला सांगतेय त्या खोलीतील भयानक सत्य !”

  1. या मुलीच्या कर्म कहाणी चे भांडवल होण्याआधी सन्मा. अनंतराव जी, मान. संग्रामसिंह थोपटे या गावातील आमदार खासदार मंडळींनी तिच्या साठी कुठलीही शासकीय मदत का देऊ केली नाही? किंबहुना आजही ते मदत करु शकत आहेत. दुसरी बाजू या कहाणी तून लेखकाला काही संदेश द्यावासा वाटतोय की कोरडी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

  2. सरकारने व समाजाने शीतलच्या विचार नक्कीच करावा

  3. पोस्ट मार्टम करणारी पहिली महिला ही शांताबाई मस्के आहेत. त्या डोंगरकडा ता. कळमनुरी जि. हिंगोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *