नव्या नवरीने लग्नाच्या रात्री केली अशी मागणी की, जाणल्यावर तुम्ही देखील हैराणच व्हाल …

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नाला फार महत्व आहे. लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन नव्हे तर दोन कुटुंबांचे मिलन असते. बरेच विधी आणि रीतीरिवाज पूर्ण केल्यावर विवाह संपन्न होतो.यांत अशा अनेक पद्धती असतात ज्यात गिफ्ट्सची देवाणघेवाण होते. नवरा नवरीला तसेच नवरी नवर्याला गिफ्ट देते किंवा इतर नातेवाईकही एकमेकांना गिफ्ट्स देतात. पण ह्या घटनेत लग्नात नवरीने अशी एक मागणी केली की सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि नवर्यानेही ऐकताक्षणी तिची मागणी पूर्ण केली. एक अशी मागणी जी ह्याआधी कदाचित कोणत्याही वधूने तिच्या नवर्याकडे केली असेल. चला तर मग पाहूया काय अशी आगळी वेगळी मागणी होती ज्यामुळे ही नवरी चर्चेत आली.

सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना काशी येथील चोलपुर येथील आहे जिथे हजरतपूरला राहणारा अभिषेक याचे लग्न मिर्जापूर येथे राहणाऱ्या निधीशी झाले. लग्नाचे सगळे विधी संपन्न झाल्यावर गृहप्रवेशाचा विधी असतो ज्यात तिने सासरच्यांकडे अशी काही मागणी केली की जी ऐकून सगळेच हैराण झाले. या मागणीने वर मात्र खुश झाला आणि त्याने लगेचच ही मागणी पूर्ण करून टाकली.

हल्लीच्या काळात सुशिक्षित असण्याचे बरेच फायदे आहेत आणि हेच झाले निधीच्या बाबतीत. तशाच प्रकारची मागणी तिने आपल्या नवर्याकडे केली. गृहप्रवेश करण्याआधी तिने ही मागणी केली की घरात एक झाड लावले तरच मी घरात प्रवेश करीन नाहीतर मी घरात प्रवेश करणारच नाही. साधारणपणे मुलाकडचे अनेक मागण्या लग्नात करत असतात पण या लग्नात वधूने एक आगळीवेगळी मागणी केली आणि स्वतः एक सुशिक्षित आणि सुजाण नागरीक असल्याचे सिद्ध केले.

सुरुवातीला सगळे खूप गोंधळून गेले होते पण त्यांनी नंतर असा विचार केला की जर आपण ही मागणी पूर्ण केली तर एक उत्तम आदर्श समाजात घालून देता येईल तसेच लोकही याचे अनुकरण करतील. ह्याने निसर्गालाही हातभार लागेल. यांत तिने फक्त स्वतःचा किंवा स्वतःच्या घराचा नाही तर संपूर्ण समाजाच्या भलाईचा विचार केला आणि हे खूप कौतुकास्पद आहे यांत काही शंकाच नाही. तिची ही आगळीवेगळी मागणी लगेचच पूर्ण करण्यात आली आणि सगळ्यांना खर्या अर्थाने आनंद झाला. झाड लावल्यावर वधूने आनंदाने गृहप्रवेश केला. घरच्या लक्ष्मीने आनंदाने गृहप्रवेश करणे याहून चांगली आणि आनंदाची गोष्ट आणखी काय असू शकते?

सगळ्यांनी या नववधूचे फार मनापासून कौतुक केले इतकेच नाही तर सगळ्या गावाने तिचे कौतुक केले. सगळ्या गावातल्या मुली आणि सुनांसाठी तिने एक उत्तम आदर्श घालून दिला आहे.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.