असे म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. अनेक जोड्या अशा असतात ज्या दिसायला विजोड असल्या तरी इतर बाबतीत अनुरूप असतात. मुली प्रेम करताना जरूर दिसायला चांगल्या मुलाशी करत असतील, पण लग्न करताना त्या पैसा, परिपक्वता अशा अनेक गोष्टी बघतात. अनेक मुली अशा असतात ज्या सर्वकाही पाहून मग लग्न करतात आणि असेच केले आहे कन्नड अभिनेत्री राधिका हिने. तर मग पाहूया कोणत्या मुख्यमंत्र्याशी तिने लग्न केले ?
आपल्या देशात एक असे मुख्यमंत्री आहेत ज्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल २७ वर्षांनी लहान असून दिसायला फार सुंदर आहे. आम्ही ज्यांच्याबद्दल सांगत आहोत्त ते आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी, ज्यानी सरकार बनल्यानंतर अनेक अडचणींचा सामना केला आहे. त्यांची पत्नी राधिका ही कन्नड चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती दिसायला तरुण आणि आकर्षकही आहे. या दोघांचे अफेयर अनेक वर्षे चालले होते पण याची माहिती कोणालाही नव्हती. नंतर त्यांनी त्यांच्या या प्रेमाचे रुपांतर एका नात्यात करायचा निर्णय घेतला.
राधिका ही त्यांची दुसरी पत्नी असून २००६ मध्ये त्यांनी गुपचूप लग्न केले. कुमार स्वामी आजही आपल्या पहिल्या पत्नी बरोबरच राहतात. राधिकाने कन्नड चित्रपट नीला मेघा शामा मधून डेब्यू केले होते आणि हा चित्रपट सुपरहिट झाल्यावर तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. तिचे सोशल मीडियामध्ये लाखोच्या वर फॉलोअर्स आहेत आणि ती कन्नडमधील सगळ्यात उत्तम अभिनेत्री मानली जाते. तिचे चाहते तिला फॉलो करतात आणि तिच्या नवनवीन फोटो आणि विडीयोंची वाट ते नेहमीच पाहात असतात.
एका इंटरव्यूमध्ये बोलताना राधिकाने कुमार स्वामी यांच्याशी असलेल्या नात्याची कबुली दिली होती. तिला बॉलीवूड चित्रपट फार आवडतात भविष्यात सलमान खान व शाहरुखखान सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची तिची इच्छा आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असून फक्त कन्नड नाही तर तमिळ आणि मल्याळम चित्रपटात सुद्धा तिने काम केले आहे आणि आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता पाहूया तिच्या या इच्छा पूर्ण कधी होतील ते. तिच्या या इच्छा लवकर पूर्ण होतील अशी आशा करूया.