आधी वराने घातली गळ्यात वरमाला, जेव्हा वधूची वेळ आली तेव्हा थांबले हात, म्हणाली मला लग्न करायचे नाही, कारण…

जेव्हा एखादी मुलगी लग्नाला उभी असते तेव्हा भविष् याबद्दल तिच्या फार सुंदर कल्पना असतात. म्हणूनच मुलीला तिचा नवरा निवडायचे संपूर्ण स्वातंत्र्य असायला हवे. पण प्रत्येक मुलीचे नशीब असे नसते. गावात अशा अनेक मुली आहेत ज्यांचे आईवडील त्यांचे मत विचारात न घेता त्यांचे लग्न ठरवून मोकळे होतात. असेच काहीसे घडले आहे मध्यप्रदेशातील इसागढ येथील प्रीती कुशावह हिच्या बाबतीत. वर धुमधडाक्यात वरात घेऊन आला, वधूकडच्यांनी त्याचे स्वागतही जोरदार केले. जेव्हा गळ्यात वरमाला घालायची वेळ आली तेव्हा आधी वराने गळ्यात माळ घातली पण जेव्हा वधूने त्याच्या गळ्यात माळ घालायची वेळ आली तेव्हा तिचे हात थांबले आणि ती हिंमत करू शकली नाही.

सगळे गोंधळून गेले कारण तिने वरमाला घालण्यास नकार दिला. जेव्हा तिला याबाबत विचारले गेले तेव्हा तिने असे सांगितले की या आधी तिने वराचा चेहरा पाहिलाच नव्हता, आज पहिल्यांदा पाहिला आणि तिला तो आवडला नाही. तिच्या अशा नकारामुळे सगळ्यांनाच खूप धक्का बसला , सगळ्यांनी तिला परोपरीने समजावण्याचा प्रयत्नही केला पण ती तिच्या या निर्णयावर ठाम होती. सरतेशेवटी सगळ्यांचा नाईलाज झाला आणि त्यांना हे लग्न रद्द करावे लागले. वरात वधूशिवायच परत गेली. मुलाकडच्यांनी जो हुंडा घेतला होता तोही परत दिला. इतकेच नाही तर त्यांनी वधूला घालण्यासाठी जे दागिने आणले होते तेही परत घेऊन गेले.

प्रीतीचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले आहे. प्रतापभान याच्याशी तिचा साखरपुडा सहा महिन्यापूर्वी झाला होता. तिने तिच्या आईवडिलांकडे प्रतापचा फोटो पाह्ण्याची इच्छा व्यक्त केली पण कोणी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आणि तिला फोटो बघायला मिळाला नाही. लग्नात पहिल्यांदाच वराचा चेहरा जेव्हा तिने पाहिला तेव्हा तिला तो काही खास आवडला नाही आणि म्हणून तिने वरमाला घातली नाही. प्रीतीचे म्हणणे असे आहे की लग्नानंतर एक नवीन जीवन सुरु होते. अशात तिला वर आवडला नाही म्हणून तिने या विवाहाला नकार दिला.

शेवटी हा प्रश्न पूर्ण आयुष्याचा आहे आणि याबाबत तिला कोणताही समझोता करायचा नव्हता. हा निर्णय योग्य की अयोग्य तिला माहिती नाही पण तिला मनापसून जे वाटले तेच तिने केले. जो माणूस मनापासून आवडलेला नाही त्याच्याबरोबर आयुष्य काढणे शक्य नाही असे तिला वाटले, जे योग्य आहेच.
विवाह हे दोन जीवांचेच नाही तर मनांचेही मिलन असते. हा निर्णय पूर्ण विचाराअंती घेणे गरजेचे आहे नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *