वास्तुशास्त्र: या कारणामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही…..

माणूस घरातली सुख शांति तशीच नांदावी भरभराट व्हावी म्हणून आपल्याकडून होईल तेवढे प्रयत्न करत असतो, दिवस रात्र कष्ट करून आपल्या परिवाराला खुश कसे ठेवता येईल या प्रयत्नांत असतो परंतु मनात नसतानाही कधी कधी त्याला कोणत्या न कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागत असते व त्यामुळे माणूस नेहमी चिंताग्रस्त असतो. पण ज्या कारणाने अशी संकटे येतात त्या मागे वास्तु दोष हे एक कारण नक्कीच असू शकते.

वास्तुशास्त्रामध्ये घरच्या सुख समृद्धी साठी अनेक प्रकारचे नियम बनविले गेले आहेत, त्याचे जर खरच लोकांनी पालन केले तर आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना सकरात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात मिळेल आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा समाप्त होईल, वास्तु दोषामुळे घरातली माणसे मनाने दु:खी राहतात, कोणत्या न कोणत्या कारणाने त्रासलेले असतात, एवढेच नाही तर पैशाच्या नुकसानीचा त्यांना सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला वास्तु दोष कोणत्या प्रकारे दूर करता येईल या बद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे आपल्या परिवाराची खुशी अबाधित राहील.

या प्रकारचे वास्तु दोष तुम्ही लगेच दूर करू शकता :

• वास्तु शास्त्रामध्ये पैशाची कमतरता किंवा नुकसानी याचे मुख्य कारण मानले जाते सतत घरातील नळाची गळती, जर आपल्या घरात असा कोणता नळ असेल ज्यातून सारखे पाणी गळत आहे तर त्यामुळे पैशाच्या नुकसानीचा सामना आपल्याला करावा लागतो, जमा केलेला पैसा उगाच नको असलेल्या कामात खर्च होऊन जातो. योग्य ठिकाणी वापरला जात नाही. • आपण आपल्या घरच्या ईशान्य कोपर्‍यात म्हणजेच उत्तर पूर्व कोपर्‍यात कोणत्याही प्रकारचा केर किंवा केराची बादली ठेवू नये, कारण वास्तु शास्त्रानुसार आपल्या घराचा हा भाग अत्यंत शुद्ध व सकारात्मक ऊर्जा देणारा मानला जातो. • वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घराच्या उतरणीच्या बाजूची ऊंची उत्तर पूर्व दिशेला असेल तर संपत्तीच्या आगमनाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे धनलाभ होण्यास अडथळा येऊ शकतो.

• जर नवरा बायकोच्या झोपण्याच्या खोलीत आरसा असेल तर त्यामुळे त्या दोघांमध्ये वारंवार भांडण तंटा होऊ शकतो, व त्यांचे संबंध बिघडतात. • आपण जर आपल्या घरात पाहुण्यांसाठी खोली बनवत असाल तर ती दक्षिण पूर्व दिशेला नको कारण यामुळे धनलाभ होण्यास बाधा येऊ शकते. कारण दक्षिण पूर्व दिशा ही धनाच्या आगमनाची दिशा मानली गेली आहे. • वास्तुशास्त्रानुसार कधीही घराच्या छपरावर किंवा जिन्याखाली भंगार सामान एकत्र करून ठेवू नये कारण यामुळे पैशाच्या नुकसानीला सामोरे जावे लागते तसेच परिवारातील लोकांच्या तब्येतीच्या कुरबुरी सतत चालू राहतात.

• जर कोणत्याही व्यक्तीच्या घरात शौचालयाची जागा दक्षिण पश्चिम दिशेला असेल तर त्यामुळे घरात पैसा किंवा धन टिकत नाही.• वास्तुशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घरातील कपाट नेहमी दक्षिणेकडील भिंतीजवळ ठेवावे आणि कपाटाचा दरवाजा उत्तर दिशेकडे पाहिजे व आपल्याला एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तिजोरीचे व कपाटाच्या दरवाजाचे तोंड दक्षिण दिशेकडे नको कारण यामुळे संपत्तीची हानी होते. • वास्तुशास्त्रामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आढळते की घराचा उतार उत्तर पूर्वेकडे असावा व पाण्याचा निचरा पण त्याच दिशेला असावा आणि उत्तर पश्चिमेचा भाग नेहमी उंचावर असावा.

मित्रांनो जर तुमचा अध्यात्मवर विश्वास नसेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करा, हे सर्व प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे आणि ज्यांचा यावर विश्वास आहे खास त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे…

Leave a Reply

Your email address will not be published.