प्रत्येक माणसाला असे वाटते की त्याचे पाकीट किंवा पर्स ही कायम पैशांनी भरलेली असावी. काही लोक जितक्या वेगाने पैसे कमावतात तितक्या वेगाने खर्चही करून टाकतात आणि पैसे त्यांच्या हातात टिकत नाहीत. अशांना कायम पैशांची चणचण भासते. जर तुम्हालाही सतत पैशांची चणचण जाणवत असेल तर चिंता करू नका उलट तुमच्या त्या सवयी बदलून टाका ज्यामुळे या समस्या उभ्या राहातात.
तुमच्या पर्समध्ये पैसे सतत टिकून राहावेत यांसाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्र असे सांगते की जर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा असेल तरच तुमच्या पर्समध्ये पैसे टिकून राहातील. आपल्या काही चुकांमुळे आपल्याकडे पैसे जास्त काळ टिकून राहात नाहीत. या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा ज्यामुळे तुमचा फायदा होईल/ अनेक लोक पर्समध्ये अनावश्यक गोष्टी ठेवतात ज्याने पैसे टिकून राहात नाहीत. अशा अजिबात आवश्यक नसलेल्या गोष्टी लगेच काढून टाकल्या पाहिजेत.
अनावश्यक गोष्टी काढून टाका
जुनी बिले किंवा कागद गरज नसल्यास काढून टाका. अशा गोष्टी कधीही पर्समध्ये जमा करू नयेत. यांमुळे पैसे टिकत नाहीत. वास्तुशास्त्र असे सांगते की जुने कागद किंवा रद्दीवर राहूचा प्रभाव असतो म्हणून असे कागद पर्समध्ये जमा करून ठेवू नयेत. अशा वस्तू काम झाल्यानंतर लगेच काढून टाकाव्यात, जमा करून ठेवू नयेत. फाटलेली पर्स, कधीही फाटलेली पर्स वापरू नये त्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. धडधाकट असलेली पर्स कायम वापरा. तुमची पर्स फाटली तर ती लगेच बदला.
औषधे ठेवू नका , बर्याच लोकांना पर्समध्ये औषधे किंवा कैप्सूल ठेवण्याची सवय असते पण ही सवय तुमच्या आर्थिक नुकसानाचे कारण बनू शकते. असे केल्याने नकारात्मक उर्जा वाढते असे वास्तूशास्त्र सांगते. म्हणून चुकूनही अशा गोष्टी तुमच्या पर्समध्ये ठेवू नका.
खाद्यपदार्थ, तुमच्या पर्समध्ये कधीही खाद्यपदार्थ जसे की चॉकलेट वगैरे ठेवू नका. यांमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या गोष्टी तुम्ही पैशांची पर्स सोडून दुसर्या पर्समध्ये ठेवू शकता. ही सवय सोडून द्या.
लोखंड, पर्समध्ये कधीही लोखंडाच्या वस्तू ठेवू नका जसे की चाकू ब्लेड वगैरे. काही लोक अशा वस्तू त्यांच्या पाकिटामध्ये ठेवतात पण वास्तुशास्त्र सांगते की असे केल्याने आर्थिक हानी होऊ शकते. हे नकारात्मक उर्जेचे प्रतिक आहे. अशा वस्तू पाकिटात ठेवण्याची सवय सोडून द्या.
या पाच गोष्टी कधीही पर्समध्ये ठेवू नका. तुमची पर्स कायम साफ ठेवा आणि देवाचे नाव घ्या म्हणजे तुमच्या पाकीटात पैसे टिकून राहातील. मित्रांनो जर तुमचा अध्यात्मवर विश्वास नसेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करा, हे सर्व प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे आणि ज्यांचा यावर विश्वास आहे खास त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे…