लग्नाच्या पहिल्याच रात्री घटस्फोट, नक्की वाचा कारण अशी वेळ प्रत्येकावर येते….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, एक अशी गोष्ट जी खूप काही सांगून जाते आणि खूप काही शिकवून जाते. एका मुलाचे लग्न होत व त्याच्या घरी फक्त त्याची आई असते, लग्न सोहळा पार पडल्यानंतर पहिल्याच रात्री नवरा स्वतःच्या हातामध्ये जेवणाने भरलेले ताट घेऊन बेडरूम मध्ये जातो. तो पत्नीला म्हणतो दोघे मिळून जेवणाचा आस्वाद घेऊ, मी स्वतः हे जेवण तुझ्यासाठी घेऊन आलोय….! पत्नी म्हणते आई अजून जेवलेली नसेल आपण सर्व मिळून एकत्र जेवण करू. यावर तिचा पती म्हणतो, आग जेवेल ती तू नको काळजी करू ती काय उपाशी राहणार नाही. या एका उत्तरावर पत्नी त्या घरातून निघून जाते व त्याला घटस्फोट देते.

काही महिन्यानंतर दोघांची वेगवेगळी लग्ने होतात. व ते दोघेही आपआपल्या संसारात मग्न होऊन जातात. पुन्हा कधीच त्या दोघांच्या एकमेकांशी संपर्क येत नाही. पण त्या पतीला नेहमीच एक गोष्ट सतावत असते की त्या मुलीने मला का घटस्फोट दिला असेल?, दोघेही म्हातारे होतात याची पत्नी मरण पावते तर तिचा पती मरण पावतो, दोघांनाही मुले असतात.

म्हातारपणी देवदर्शन करावे व सर्व देवांचे दर्शन घ्यावे, या उद्देशाने म्हातारी आपल्या मुलांना म्हणते, की मला देवदर्शन करायचे आहे. आणि लगेच तिची मुले तयारीला लागतात तिने मुलांना चांगल संस्कार दिलेले असतात. ती मुले आईची पुरेपूर काळजी घेत असतात, ठरल्या प्रमाणे एका मंदिरामध्ये जेवून ते देवदर्शन घेतात. व बाहेर येऊन जेवण करण्याचा विचार करतात. दोन्ही मुले अगदी प्रेमाने आपल्या आईसाठी ताटामध्ये जेवण घेतात व आईला जेवण्यासाठी आग्रह करतात. तेवढ्यात आईची नजर समोर बसलेल्या एका म्हाताऱ्या व्यक्तीकडे जाते. दाढी वाढवलेला केस वाढवलेला मळकट कपडे घालून एक म्हातारा व्यक्ती समोर बसलेला असतो. कोणता तरी विचार करत असतो, एकटक त्यांच्याकडे पाहत असतो. गरिबाला मदत करावी या उद्देशाने आई मुलांना म्हणते त्या वृद्ध व्यक्तीला जाऊन प्रथम जेवण द्या. त्यानंतर आपण सर्वजण मिळून जेवण करू.

आईने सांगितल्या प्रमाणे त्या म्हाताऱ्या व्यक्तीजवळ जातात व त्याला जेवणासाठी आग्रह करतात . तो व्यक्ती आनंदाने जेवत असतो तेवढ्यात त्या मुलांची आई त्याच्या जवळ येते व त्याला म्हणते, ओळखलं मी कोण आहे?

तिचे बोलणे ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, तो फक्त एकच वाक्य बोलतो, आज मला कळले की तू का मला सोडून गेली होतीस, आपल्या समाजात याचीच कमतरता सध्या भासत आहे. मोठ्या लोकांचा आदर करणे व त्यांना प्रेमाची वागणूक देणे दुर्मिळच होत चालले आहे. मुलगा आई वडिलांना बाहेर काढतो त्यांची विचारपूस करत नाही. जवाबदार फक्त मुलेच नाहीत त्यांचे संस्कार सुद्धा आहेत, ज्यामुळे मुलांनी आई वडिलांना घराबाहेर काढले किंवा त्यांचे संगोपन करत नाहीत. त्यांच्याबद्दल थोडा विचार करून पहा, तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा असेच स्वतःच्या आई वडिलांना त्रास दिला असणार किंवा मुलांवर चांगले संस्कार केले नसणार. त्यांना फक्त हेच समजावून दिले असणार की कुटुंबामध्ये फक्त बायको व मुलेच असतात. आई वडिलांना त्यामध्ये थारा नसतो आणि म्हणूनच त्या मुलांना दोष दोष देण्यापेक्षा तुम्ही जसे वागाल तसेच तुमच्या मुलावर संस्कार होतील व मुलेही तशीच वागतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *