कितीही भांडणे झाली तरी बायकोने नवऱ्याला चुकूनही बोलून दाखवू नयेत या ५ गोष्टी, नाहीतर….

मित्रांनोस्वागत आहे तुमचे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, संसाराची गाडी तेव्हाच चालू शकते जेव्हा त्या दोघांमध्ये कोणताही गैरसमज नसतो आणि ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक नात्यात बरीच भांडणे होतात. परंतु पती-पत्नीचे नाते खूप वेगळे आहे या नात्यामध्ये प्रेम आणि भांडणे दोन्हीही थोडे अधिक  होत असतात. तसे नवरा-बायकोच नातं खूप मजबूत आहे, परंतु त्यामधील दोर तितकीच नाजूक आहे. जर दोघांमधली ती दोर जास्त ताणली गेली तर ते नाते तुटण्यास वेळ लागत नाही. हे नाते दोघांच्या समर्पण आणि त्यागावर चालत असते, परंतु जर त्या नात्यामध्ये पत्नी कडून एखादी मोठी चूक झाली तर मात्र ते प्रकरण अधिकच चिघळते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या पत्नीने त्यांच्या पतीला कधीच सांगू नये किंवा बोलू नये, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

दुसऱ्यांच्या नवऱ्याशी तुलना….जगातील प्रत्येक पतीला असे वाटत असते की त्याच्या पत्नीने त्यालाच सर्वात योग्य मानले पाहिजे. अशा परिस्थितीत आपल्या पतीसमोर कधीही दुसऱ्यांच्या नवऱ्याची स्तुती करू नका. सोशल मीडियावर किंवा इतरांचे ऐकत असताना, बर्‍याच स्त्रियांना असे वाटते की त्या महिलेचा नवरा त्याच्या पत्नीवर खूप जास्त प्रेम करतो. आणि ते पाहून तुम्ही कधीही आपल्या पतीकडे तक्रार करू नका की तिचा नवरा पहा तिच्यावर किती प्रेम करतो. कारण त्या चित्रांमध्ये आणि कथांमागे लपलेले सत्य वास्तविक खूप वेगळे असते. अशा परिस्थितीत, इतरांच्या आनंदाचा अंदाज लावून आपले संबंध खराब करू नका.

मुलांना सोडून येणार नाही…वास्तविक लग्नानंतर पती पत्नी मधील प्रणयचे प्रमाण थोडे कमी होत जाते. व याचे मुख्य कारण म्हणजे मुले….. मुले झाल्यावर पत्नीचे लक्ष फक्त त्यांच्या संगोपनावर असते. मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्यासाठी नेहमीच हजर असणे ही तशी खूप चांगली गोष्ट आहे परंतु या सर्व गोष्टींमध्ये आपल्या पतीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्यांना कधीही असे वाटू देऊ नका की तुम्ही आता त्यांच्यासोबत बसू शकत नाही कारण आपल्या मुलांना पहावे लागेल. कधीकधी मुलांमधून वेळ काढून तो थोडा वेळ आपल्या पती सोबत घालवा, जेणेकरून तुमच्या नात्यामधले प्रेम कधीही कमी होऊ नये.

तुम्ही नेहमी आईचेच ऐकता…प्रत्येक नात्यामध्ये प्रेमा सोबत आदर असणे खूप महत्वाचे आहे. घरातल्या भांडणाचे बहुतेक कारण म्हणजे बायकोला असे वाटत असते की त्यांचा नवरा फक्त आपल्या आईची आज्ञा पाळतो. व तुम्ही कधीही आपल्या पतीला असे बोलू नका की, तुम्ही फक्त तुमच्या आईच्याच सर्व गोष्टी ऐकता…. त्याऐवजी तुम्ही असे न बोलता थोडा विचार करा की, जो आपल्या आईचा इतका आदर करतो त्याचे आपल्या पत्नीवर किती प्रेम असेल. आणि जो व्यक्ती त्याच्या आईचे ऐकत नाही, तो आपल्या बायकोचे काय ऐकणार…. तुम्हाला सांगू इच्छितो की, चुकीचा विचार करून कधीही तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आई-वडिलांना त्रास देऊ नका.

तुम्ही माफीच्या लायकीचे नाही…वास्तविक पती-पत्नी आपल्या जीवनातील काही वर्षे निघून गेल्यानंतर (लग्नाचे योग्य वय झाल्यानंतर) एकमेकांना भेटत असतात. अशा परिस्थितीत आपल्यामध्ये आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये खूप फरक असतो. शक्यतो हे खरे होऊ शकते की, बर्‍याच गोष्टींमध्ये आपल्याला त्यांचा खूप राग येऊ शकतो. परंतु आपल्या नवऱ्याला कधीही असे बोलू नका की मी तुम्हाला या चुकी बद्दल कधीही माफ करू शकत नाही.

घटस्फोट देईन….भांडणे तर प्रत्येक घरांमध्ये होत असतात, आणि जेव्हा भांडणे वाढतात, तेव्हा आपल्या तोंडून असे बरेच शब्द निघून जातात ज्याचा आपल्याला नंतर खूप पश्चात्ताप होतो. तुमचे नवऱ्या सोबत कितीही मोठे भांडण होऊ , परंतु त्या भांडणामध्ये “मी घटस्फोट देईन” असे त्यांना कधीही सांगू नका. यामुळे नात्यामध्ये खूप मोठी दरार पडेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.