पुरुषांनी या चार गोष्टी कधीच कोणाला सांगू नये, नंतर पश्चाताप करावा लागतो

हे तर सगळ्यांनाच माहिती आहे कि आचार्य चाणक्य किती बुद्धीमान आणि समजूतदार होते. आणि म्हणूनच असे आहे कि जे कोणी चाणक्याच्या नीतीचे पालन करतात त्यांना आयुष्यात कमी अडचणींचा सामना करावा लागतो. नेहमी असे असते कि प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यातील काही गोष्टी इतरांशी शेयर करतो. बरेचदा असे होते कि मन मोकळे करता करता एखादी अशी गोष्ट तो दुसर्याला सांगून बसतो जे सांगायला नको होते.यांमुळे त्याला वाईट फळे भोगावी लागतात. अशातच चाणक्याने अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या माणसाने, खासकरूनपुरुषांनी कोणाजवळ बोलू नयेत.

१. पहिली गोष्ट: चाणक्य असे सांगतात की जर पुरुषाला पैशाचे नुकसान होत असेल तर त्याने हे कोणाला सांगू नये. होय, इतकेच नाही तर घरातही कोणाजवळ त्याबद्दल बोलू नये. ह्याचे कारण असे आहे की जेव्हा लोकांना तुमच्या वाईट आर्थिक परिस्थितीबद्दल समजते तेव्हा ते तुमची मदत करण्याऐवजी तुमची खिल्ली उडवतात आणि मजा घेतात. असेही या जगात पैसेवाल्यांनाच किंमत असते. म्हणून ही गोष्ट फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादीत ठेवा.

२. दुसरी गोष्ट : चाणक्य असेही सांगतात की आपल्या दुःखाबाबत कोणाला पुरुषाने सांगू नये. कारण पुरुषाने जर त्याच्या दुःखाबाबत कोणाला सांगितले तर त्याला मदत करण्याऐवजी त्याची खिल्ली उडवली जाते. लोक मजा बघतात फक्त आधार देत नाहीत कि मदतही करत नाहीत. अशामुळे दुःख कमी व्हायच्या ऐवजी वाढते. म्हणून आपले दुःख आपल्याजवळ ठेवावे.

३. तिसरी गोष्ट: चाणक्याच्या मते पुरुषांनी आपल्या पत्नीच्या चरित्राशी संबंधित सगळ्या गोष्टी अगदी गुप्त ठेवाव्यात. त्याच्या मते समजूतदार पुरुष तोच असतो जो त्याच्या पत्नीविषयीच्या बाबी स्वतःपर्यंतच ठेवतो. त्याचबरोबर घरात होणारे क्लेश आणि कलह घरातच ठेवावेत. जर हे कोणाला सांगितले तर मदत करण्याऐवजी ते त्याचा फायदा घेऊन गॉसिप करतात व खिल्ली उडवतात. याचे फार वाईट परीणाम त्याला पुढे सहन करावे लागतात. म्हणून कधीही घरातले कलह कोणाशी शेयर करू नयेत.

४. चौथी गोष्ट : चाणक्याच्या मते जर कोणी खालच्या दर्जाची व्यक्ती तुमची बेइज्जती करत असेल तर त्याबाबत कोणाजवळ बोलू नये. याने तुमचा मान कमी होईल आणि लोकांसाठी तुम्ही एक चर्चेचा विषय ठरेल आणि तुमची बेइज्जती होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *