पायात जोडवी घातल्यामुळे शरीरास होणारे फायदे जाणल्यावर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल…

कोणत्याही पुरुषाला पाहून तो विवाहित आहे किंवा नाही याबाबत अंदाज  बांधणे कठीण आहे पण एखाद्या विवाहित स्त्रीला ओळखणे अगदीच डाव्या हाताचा मळ आहे.
एक विवाहित स्त्री मंगळसूत्र, शेंदूर, बांगड्या वगैरे सगळे घालते. आपण लहानपणी आपल्या आईपासून वहिनीपर्यंत सगळ्यांना असेच पाहिले आहे. या सगळ्या गोष्टी सौभाग्याचे प्रतिक मानल्या जातात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की या सगळ्या गोष्टी म्हणजे केवळ सौभाग्याचे प्रतिक नव्हेत. या गोष्टी घालण्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. आज आपण बाकी सगळ्या  नाही पण जोडव्या घालण्यामागच्या शास्त्रीय कारणाबद्दल नक्कीच बोलणार आहोत. तर चला आज याच शास्त्रीय कारणांबाबत बोलूया आणि आम्ही तुम्हाला हे सांगू की जोडव्या घालणे महिलांच्या आरोग्यासाठीही चांगले असू शकते.

सगळ्यात आधी हे जाणून घ्या: वास्तविक आजकालच्या  ट्रेंडनुसार पायाच्या कोणत्याही बोटात किंवा सगळ्या बोटात जोडव्या घातल्या जातात.पण शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास अंगठ्याच्या बाजूच्या बोटात जोडव्या घातल्या जातात.

गर्भाशयावर पडतो प्रभाव : कदाचित हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल पण जोडव्या घालण्याचा थेट संबंध महिलांच्या गर्भाशयाशी आहे. शास्त्रानुसार पायाच्या अंगठ्याच्या बाजूने दुसरया बोटात एक विशेष नस असते जि गर्भाशयाशी जोडलेली असते. ही नस गर्भाशयाला नियंत्रणात ठेवते व रक्ताभिसरणही सुरळीत करते.

प्रजननक्षमतेत वाढ : जोडव्या घातल्याने महिलांची प्रजननक्षमता वाढते. आयुर्वेदाप्रमाणे महिलांमध्ये प्रजननक्षमता वाढवण्यासाठी जोडव्या एक महत्वाची भूमिका बजावतात. खरेतर जोडव्या घातल्यावर सायटिक नर्व ची एक नस दाबली जाते ज्याच्या आजूबाजूच्या दुसऱ्या नसांमध्ये रक्तप्रवाह वेगाने होऊ लागतो. यात गर्भाशय, पित्ताशय आणि आतड्यांपर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होतो.

मासिक पाळी नियमित होते : ज्या फक्त शृंगारासाठी घातल्या जात नाहीत तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.जोडव्या घातल्याने मासिक पाळीसंबंधीच्या तक्रारी कमी व्हायला मदत होते. मासिक पाळी नियमित होते.

ह्रदय स्वस्थ ठेवते : पायाच्या दुसऱ्या बोटाच्या तंत्रीकेचा संबंध गर्भाशयाशी असतो. ही हृदयाजवळून जाते. अशात जोडव्या घातल्याने हृदयाची गतीही नियमित राहते.
तणाव दूर होतो.जोडव्या घातल्याने तणाव दूर होतो आणि शांतता मिळते. उर्जा ही मिळते, कशी ते पाहूया.

शरीरात ताजेपणा राहतो : चांदीला उर्जेचा चागला स्त्रोत मानले जाते. पायात जोडव्या घातल्याने पृथ्वीच्या ध्रुवीय उर्जेला नीट करून शरीरात पोहोचते. याने संपूर्ण शरीर ताजेतवाने होते.

एक्यूप्रेशरचे काम करतात जोडव्या: जोडव्या घातल्याने शरीरातील सर्व नद्या व मांसपेशी योग्यप्रकारे काम करतात. यात तळव्यापासून बेंबीपर्यंतच्या सगळ्या नाड्या व पेशी नीट होतात.

दोन्ही पायात जोडव्या घातल्याने होतात हे लाभ : दोन्ही पायात जोडव्या घातल्याने उर्जा नियंत्रित होते. वास्तविक दोन्ही पायाच्या अंगठ्याच्या बाजूची नस गर्भाशय व हृदयाशी जोडलेली असते. अशात दोन्ही पायात जोडव्या घातल्याने स्त्रियांचा गर्भाशयही नियंत्रित राहतो.

चांदीच्याच जोडव्या घाला. : जसे आपण वर वाचले की चांदी तुमच्या शरीरासाठी किती लाभदायक आहे. अशात इतर कोणत्याही धातूपेक्षा चांदीच्याच जोडव्यांची निवड करा.

आशा आहे की तुम्हाला जोडव्या घालण्यासंबंधित या गोष्टी ऐकायला आवडले असेल. या गोष्टी तुम्ही तुमच्या मित्रांना नक्कीच सांगा .

Leave a Reply

Your email address will not be published.