या आजी त्यांच्या मुलांना भेटायला तब्बल २० वर्षांनी गेल्या,तर मुलांनी आणि सुनेने पहा काय केले.

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आजीचे वय 85, 20 वर्षांपूर्वी आजोबा वारले, आजी एकटीच राहते डोंबेवलीला भाड्याच्या घरात चांगली गोष्ट म्हणजे घर मालक भाड घेत नाही, आणि आजी रोज मागून पोट भरते. काहीजण तिला थोडीफार मदत करतात, मागच्या महिन्यात तिने माझ्याकडे एक इच्छा व्यक्त केली की मनोज माझे दिवस आता कमी राहिले आहेत आता मला माझ्या मुलांना बघून प्राण सोडायचे आहेत, मला घेऊन जाशील का रे माझ्या गावी कोकणात, मी बोललो हो आजी घेऊन जातो, खरतर मला धक्का बसला होता कारण आजीने आम्हा सगळ्यांना पहिल्यांदा सांगितले होत की तिला चार मूल आणि चार मुली आहेत. कारण मला असे माहीत होतं की आजीला कोणीच नाही. मग मी विचारले, आजी खोट का बोललीस तू ती बोलली की घर मालक काढून टाकले मला घरातून आणि तू पण मदत करणार नाहीस….

मग कळले की मुलं असून सुद्धा कस आयुष्य जगावे लागते आहे, मूल असण्याचे पण किती मोठं दुःख जिथ मुलं आहेत म्हणून सांगणे पण आयुष्यासाठी किती मोठा श्राप आहे. जिथे आई पण सांगू शकत नाही की मुलगा आहे आणि मुलगा पण आईला भेटायला येत नाही, खरच का हो, माणसाने एवढी माणुसकी घाण ठेवावी की आपल्या आईला पण भेटायला येऊ नये आई जिवंत आहे का वारली हे पण माहिती नसू नये

20 वर्षांपासून कोणीच भेटायला आले नाही शेवटी मी आणि आजी ट्रेन ने 310 किलोमीटर चा प्रवास करून आम्ही आजीच्या गावी गेलो, जून घर जुना रोड सगळं पाहून आजीच्या डोळ्यात पाणी आलं, शेवटी आपण आपल्या गावी 20 वर्षानंतर आलो, घराचे दार वाजवले, आतून मुलगी धावत आली.आई कोणीतरी आले आहे बग, मुलीची आई पण आतून आली व विचारले कोण हवे आहे तुम्हाला? मला तर धक्का बसलाच पण आजीलाही धक्का बसला मी बोललो ह्या तुमच्या सासूबाई आणि तुमच्या ह्यांची आई, बाईने आतमध्ये बोलावले आजीच्या पाया पडली. पाणी दिल जेवलो मग काही वेळाने आजीचा मुलगा आला आजीला भेटला त्यालाही बरे वाटले. आजी पण खुश झाली मग आम्ही आजीच गाव फिरायला गेलो, गाव बघितले आजीच्या मित्र मैत्रिणी भेटल्या, आजीने त्यांच्या सोबत खूप गप्पा मारल्या, रात्री झोपलो, सकाळ झाली, आजी बोलली मी जाते पण मुलगा पटकन बोलला जा….. एका शब्दाने पण बोलला नाही की आई तू थांब नको जाऊ, आजी रडली नाही पण मनात किती त्रास होत होता ते तिलाच माहीत.

आजीने पोटली उचलली आणि निघाली बस स्थानक घराजवळच होत, पण मुलगा किंवा कोणीही बस स्थानका पर्यंत सोडायला आले नाही. कारण लाज वाटत होती की, इतरांना आई जिवंत झाली म्हणून सांगायला, बस मध्ये बसलो बस निघाली गाव दूर दूर जाऊ लागल आणि आजी झाडामागे डोंगरामागे लपत चाललेले आपले घर आपली माणसे शोधत होती, पण आयुष्याचा शेवटी तिच्या हाती निराशाच लागली.

आज आजी शेवटी एकटीच चार मूल आणि चार मुली सुद्धा आईसाठी कोणाच्या घरात जागा नाही, सगळे चांगले कमावते आहेत, सांगा की माणुसकी कमी पडली की पैसा आपल्या सर्वांसाठी व आजीसाठी आनंदाची गोष्ट घडली परवा, आजीचा छोटा मुलगा आजीला, आजीच्या शेतातील आंबे घेऊन भेटायला आलेला व फोटो स्टुडिओ ला जाऊन आजोसोबत फोटो पण काढला हे सगळं आजी खूप खुश होऊन सांगत होती. काही दिवसानंतर आजी बोलली म्हणून मागील 20 वर्षांपासून मला माझ्या गावच्या देवीची ओटी काय भरता आली नाही नवरात्र पण चालू आहे, घेऊन जाशील का रे गावी मला आणि आम्ही परत एकदा निघालो परत एक प्रवास अजिसोबत तिच्या गावच्या पुरातन दुर्गादेवीच्या दर्शनाला आजीच्या गावी कोकणात 200 किलोमीटरचे आंतर कापून झाले अजून 85 किलोमीटर बाकी आहे आजी खूप खुश आहे.
मित्रांनो तुम्हाला या माहिती बद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा

Leave a Reply

Your email address will not be published.