बॉलीवुडमध्ये अनेक अशी उदाहरणे आहेत ज्यात अनेक सेलेब्रिटीज़नी आपले आधीचे लग्न मोडून दुसर्या पार्टनरबरोबर संसार सुरु केला आहे. पण गोविंदा हा असा एक अभिनेता आहे ज्याने दुसरीशी नव्हे तर त्याच्याच पत्नीशी अनेक वर्षांनंतर दुसर्यांदा विवाह केला आणि तोही सगळ्या विधींसकट. अगदी पहिल्या लग्नात होतात तसे सगळे विधी केले गेले. आपल्या पत्नीशी दुसर्यांदा लग्न करण्यामागचे कारण त्याने नंतर एका इंटरव्यूमध्ये स्पष्ट केले.
गोविंदा याने त्यांची पत्नी सुनिता हिच्याशी २०१५ साली विवाह केला. त्यावेळी दोघे एखाद्या नवविवाहित जोडप्याप्रमाणे पारंपारीक वेशात दिसत होते. दोघांनी सात फेरे घेऊन एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. या खास अशा सोहळ्यात त्यांची मुलेही उपस्थित होती. यामागचा खुलासा गोविंदा यांनी याच वर्षी इंडिया टीवीचा शो आपकी अदालत यांमध्ये केला. त्यांनी असे सांगितले कि त्यांच्या आईच्या इच्छेखातर त्यांनी हा सोहळा केला. त्यांनी असेही सांगितले कि त्यांच्या आईने सांगितले होते कि ४९ व्या वर्षात तू दुसर्यांदा लग्न कर. गोविंदा २१ डिसेंबरला ५६ वर्षांचे झाले आहेत, आपल्या आईचे मन राखण्यासाठी त्यांनी परत एकदा संपूर्ण सोहळा केला.
काही वर्षांपूर्वी जेव्हा गोविंदा यांनी सुनिताबरोबर दुसर्यांदा विवाह केला तेव्हा ते चर्चेत आले. शो मध्ये याचा खुलासा करताना त्यांनी असे सांगितले कि हे त्यांनी त्यांच्या आईच्या सांगण्यावरून केले. तिच्या इच्छेखातर त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये पुन्हा एकदा लग्न केले आणि तेही सगळ्या विधींसकट. सगळा थाटमाट तसाच होता जसा पहिल्या लग्नात केलाहोता. अत्यंत हौसेने त्या दोघांनी हा सोहळा पार पाडला.
आपल्या पत्नीशी पहिल्या भेटीबद्दल सांगताना गोविंदा म्हणाले की ते तिच्याबरोबर एका पार्टीतून परत येत होते. तिच्या हाताचा गोविंदाला स्पर्श झाला. आणि इथूनच त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली. त्याचे काका आनंद सिंह यांनी त्यांना ‘तन-बदन’ मधून पुढे आणले आणि त्याच दरम्यान आनंद सिंह यांची वहिनी सुनिता मुंजाल याच्याबरोबर त्याचे सुत जुळले. ११ मार्च १९८७ साली दोघांनी लग्न केले. खरेतर गोविंदाने करीयरमुळे चार वर्षे ही गोष्ट लपवून ठेवली.
गोविंदा एक असा अभिनेता आहे ज्याने बॉलीवुड चित्रपटात त्याच्या उत्तम अभिनयाने ठसा उमटवला. विविध प्रकारच्या चित्रपटांनी गोविंदा यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. खासकरून त्यांच्या विनोदी टायमिंगचा एक वेगळाच अंदाज आहे. असे म्हणतात कि कॉमेडी चित्रपटांच्या यशाच्या आधी या प्रकारच्या जॉनरला खालच्या दर्जाचे मानले जायचे पण ९० च्या दशकांत गोविंदाने कॉमेडी जॉनरला एका नव्या उंचीवर पोहोचवले आणि फिल्ममेकर्सनी त्याला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली.