हि पोस्ट वाचल्यानंतर तुम्ही कलिंगडची साल कधीच फेकून देणार नाही….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती,तुम्हाला माहित आहे का की, मार्केटमध्ये जी टूटी-फ्रुटी मिळत असते अगदी तशीच घरामध्ये आपण एका टाकाऊ पदार्थापासून तयार करू शकतो, तुम्हाला ये ऐकून नक्कीच आश्चर्य वाटले असले, मार्केट मध्ये मिळणारी टूटी फ्रुटी तशीच व तितकीच चविष्ट आपण कलिंगड खाऊन जी साल टाकतो त्यापासून बनवू शकतो. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

तुम्हाला तर माहीतच आहे की कलिंगड खाल्ल्यानंतर आपण त्याची उरलेली साल फेकून देतो, परंतु ती न फेकता आपण त्यापासून अगदी चविष्ट अशी टूटी-फ्रुटी बनवू शकतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे शक्य आहे? तर चला ती कशी बनवायची याची थोडक्यात कृती जाणून घेऊ,

टूटी फ्रुटी बनवण्यासाठी प्रथम कलिंगडच्या थोड्या साली घ्या, व त्या सालीवरील जी हिरव्या कलरची कात असते ती पूर्णपणे काढून टाका, परंतु ही कात काढत असताना थोडी सावधगिरी बाळगा जेणेकरून आपल्या हाताला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्या, ही हिरवी कात काढून झाल्यानंतर त्या सालीचे बारीक बारीक काप करून घ्या, व ते काप प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून, नंतर गरम पाणी करून त्यामध्ये शिजण्यासाठी टाका….

5 ते 6 मिनिटे त्या कापांचा कलर बदले पर्यंत तसेच पाण्यामध्ये शिजवत ठेवा, 5 मिनिटानंतर ते काप चाळणीच्या साहायाने पाण्यातून वेगळे करून घ्या, नंतर एक पॅन किंवा कढई घेऊन त्यामध्ये एक वाटी साखर टाका, व ती एक वाटी साखर विरघळण्यासाठी त्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी घाला, नंतर साखर त्या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून झाली असेल तर ते गरम पाण्यातून काढलेले कप त्या साखरेच्या पाण्यामध्ये टाका.

काप 8 ते 10 मिनिटे त्या साखरेच्या पाण्यामधून आणखी एकदा शिजवून घ्यावेत, म्हणजे त्यामध्ये साखरेचे पाणी जाऊन ते खाण्यासाठी चवीला गोड लागतील. नंतर ते काप साखरेच्या पाकामधून काढून एका भांड्यामध्ये ठेवा. आता ते काप चवीला नक्कीच गोड झाले असतील आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण मार्केट मधून जी टूटी फ्रुटी आणतो ती वेगवेगळ्या कलरची बनलेली असते आणि आपल्याला देखील तशीच बनवण्यासाठी त्या कापांना (तुकड्यांना) कलर लावणे आवश्यक आहे व हा कलर लावण्यासाठी तुम्ही ते काप वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढा तुम्हाला ज्या ज्या कलर मध्ये टूटी फ्रुटी बनवायची आहे ते ते कलर वेगवेगळ्या भांड्यामध्ये टाका व ते काप व कलर चांगले मिक्स करून घ्या,

नंतर तो कलर त्या कापांना चांगल्या प्रकारे लागण्यासाठी ते काप 2 ते अडीच तास तसेच ठेवा, 2 ते अडीच तास झाल्यानंतर ते काप एका मोठ्या प्लेटमध्ये काढून ते फॅन खाली किंवा उन्हामध्ये सोखण्यासाठी ठेवा, ते काप चांगले एक दिवस चांगले सोखु दिल्यानंतर ती टूटी फ्रुटी खाण्यायोग्य होईल….!

तुम्ही या लिंक वर क्लिक youtube वरील हा video पाहून देखील, संपूर्ण कृती करू शकता ==> tutti frutti recipe  

मित्रांनो तुम्ही देखील ही टूटी फ्रुटी घरामध्ये नक्की तयार करून पाहा. व तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

 

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.