बॉलीवूड च्या या अभिनेत्रीला आपली सून बनवू इच्छित होते ऋषी कपूर, रणबीर कपूर देखील होता लग्नासाठी तयार…

बॉलीवुडचे दिग्गज अभिनेता ऋषि कपूर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांना कैंसर झाला होता, बुधवारी संध्याकाळी अहानक त्यांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली, मग त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले, तिथे त्यांचे निधन झाले. आधी इरफान खान आणि आता ऋषी कपूर या दोन्ही तार्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.

अनेक वर्ष ते कैंसरशी झुंज देत होते अखेरीस गुरुवारी त्यांचीही झुंज अपयशी ठरली. बिधुवारी रात्री त्यांची परिस्थिती आणखी गंभीर झाली, त्यांना छातीत दुखू लागले तसेच तापही होता. मग त्यांना वेंटीलेटर वर ठेवण्यात आले अन काही वेळाने त्यांच्या शरीराने प्रतिसाद देणे बंद केले.

ऋषी यांच्या आयुष्यात बर्याच इच्छा पूर्ण झाल्या पण दोन महत्वाच्या आणि शेवटच्या इच्छा मात्र पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यांना त्यांचा मुलगा रणबीर आणि आलीया हिचा विवाह पहायचा होता. त्या दोघांचा विवाह बराच आधी निश्चित झालेला असून या वर्षाच्या शेवटी त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. ते नेहमी रणबीर ला सांगायचे कि मला लवकर आजोबा कर. आपली नातवंडे अंगाखांद्यावर खेळवण्याचे स्वप्नही त्यांचे अर्धवटच राहिले.

जुलै २०१८ मध्ये ऋषी कपूर यांनी असेही सांगितले होते कि मी जेव्हा रणवीरकडे लग्नाचा आणि सेटल होण्याचा विषय काढतो तेव्हा तो विषय टाळतो आणि पळून जातो. माझी इच्छा आहे कि मी आणि माझी पत्नी नीतू लवकर आजी आजोबा होऊ आणि नातवंडाना खेळवू. मी त्याला नेहमी सांगतो कि आता तू ३६ वर्षांचा झालास, लग्न कधी करणार ? नेहमी फक्त कामात बुडालेला असतोस. असे ही म्हणतात कि या दोघांमध्ये मध्यंतरीच्या काळात मतभेद होते आणि ते वेगवेगळ्या घरात राहात होते.

त्याच्या लग्नासाठी ऋषी आणि नीतू मुंबईच्या कृष्णराज प्रॉपर्टीमध्ये कंस्‍ट्रक्शनही करून घेत होते. तिथे त्यांना त्याचे लग्न झालेले पहायचे होते. बातमी अशी कि ऋषी यांनी मुंबई हिल येथे कृष्ण राज बंगला विकत घेतला होता ज्यात ते त्यांच्या कुटुंबियांबरोबर राहात होते. काही वर्षांपूर्वी हा बंगला तोडून तिथे १५ मजल्यांची इमारत बनवायचा निर्णय झाला आणि त्याच्याच एका भागात कंस्‍ट्रक्शन करून घेत होते जेणेकरून त्यांच्या लग्नाचे सारे विधी तेथे पार पडतील.

ऋषि कायम हसतमुख असायचे, इतकेच नाही तर हॉस्पिटलमधील लोकांचेही ते मनोरंजन करत असत. गेली दोन वर्षे त्यांच्यावर परदेशात इलाज सुरु होते त्यात त्यांची प्रकृती स्थिर होती. कुटुंब, मित्र, जेवण, आणि चित्रपट ह्या गोष्टी त्यांच्या मध्यवर्ती होत्या. या दरम्यान त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला याचे आश्चर्य वाटायचे कि इतक्या गंभीर आजारातही ते इतके आनंदी कसे काय राहतात.

ते कायम हसतमुख असायचे आणि यांनी जगाचा निरोपही हसतच घेतला. पण तरीही इतरांच्या डोळ्यात मात्र अश्रू ठेवून गेले. त्यांचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यावर ह्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. आपल्या उत्तम अभिनयाने तसेच स्टायलिश लूकने लोकांचे मन ऋषींनी जिंकून घेतले, ”बॉबी” चित्रपटात त्यांनी डिंपल कपाड़ियाबरोबर डेब्यू केले होते पण त्याधी त्यांनी बालकलाकार म्हणूनही भूमिका निभावली होती. विविध भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, आणि जरी ते या जगात नसले तरी त्यांची भूमिकांच्या रुपात ते प्रेक्षकांच्या मनामनात अजरामर राहातील.

Leave a Reply

Your email address will not be published.