प्रेतयात्रा पाहताच करा हे काम, पूर्ण होतील सर्व मनोकामना.

जीवनाचे अंतीम सत्य आहे मृत्यू. भगवतगीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे, “ मृत्यू एक असे सत्य आहे जे अटळ आहे, ज्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे” हेच जीवनाचे सार आहे, जो जीव या पृथ्वीतलावर जन्माला आला आहे त्याला एक दिवस इथून जावेच लागते, हा निसर्गाचा अटळ नियम आहे. जसा मृत्यू जीवनाचा महत्वाचा टप्पा आहे तसाच मृत्यूबरोबर या पृथ्वीतलावरूनचा व्यक्तीचा निरोप पण खूप महत्वपूर्ण आहे ज्याला प्रेतयात्रा म्हणतात.

कोणत्याही माणसाच्या मृत्युनंतर त्याची प्रेतयात्रा काढली जाते आणि यासंबंधात शास्त्रांचे अनेक नियम सांगितले गेले आहेत जे पाळले तर धर्म लाभ तर होतोच त्याचबरोबर यामुळे प्रेतात्म्याला शांतीही मिळते. प्रेतयात्रेशी संबंधित काही असे नियम आणि लोकांमध्ये असलेल्या श्रद्धा आम्ही तुम्हाला सांगत आहोत जे केल्याने माणसाला लाभ होईल.

जेव्हा कोणतीही प्रेतयात्रा दिसेल तेव्हा त्याला दोन्ही हात जोडून, डोके झुकवून नमस्कार करा आणि तोंडाने शिव शिव असा जप करा. यामागे शास्त्रीय कारण असे आहे की ज्या मृतात्म्याने शरीर सोडले आहे तो त्याच्याबरोबर नमस्कार करणाऱ्या व्यक्तीची सगळी दुःख व कष्ट त्याच्याबरोबर घेऊन जातो असे मानले जाते. प्रेतयात्रा पाहून तिकडून जाणारे लोक थोडावेळ थांबतात व देवाला प्रार्थना करतात. हा हिंदू धर्माचा एक प्रमुख नियम आहे, ज्या नियमानुसार प्रेतयात्रा पाहिल्यानंतर आपण मृतात्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्याने मृतात्म्याला शांती मिळते.

धार्मिक दृष्टीकोनाच्या व्यतिरिक्त ज्योतिष्यविद्येच्या भाषेतही प्रेतयात्रा पाहणे शुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की जेव्हा कोणी व्यक्ती प्रेतयात्रा पाहते तेव्हा त्याची अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता वाढते. त्याच्या आयुष्यातली दुःखे दूर होतात व त्याच्या मनोकामना पूर्ण होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *