सकाळी उठल्यानंतर स्त्रियांनी हि कामे केलीच पाहिजेत…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला रोज सकाळी उठून स्त्रियांनी आपल्या नवऱ्या बरोबर प्रथम करावे जेणेकरुन आपला संपूर्ण दिवस शुभ जाईल याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

सर्वात प्रथम तुम्ही सकाळी लवकर उठा

जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुम्हाला दिवसभर शरीरात ताजेपणा जाणवेल, व त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल, सूर्योदय होताच तुम्ही उठणे तुमच्या साठू खूप फायद्याचे ठरू शकते.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.

तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे, तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी तांब्याचे भांडे पाण्याने भरून ठेवा जेणेकरुन सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते पिता येईल, जर तुम्ही दररोज तांब्याचा भांड्यातील पाणी पिले तर त्यामुळे तुमच्या पोटा संबंधित प्रत्येक रोग बरे होतील, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हे काम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केले पाहिजे.

दररोज योगा आणि ध्यान करा

दीर्घकाळ निरोगी आणि तरूण राहण्यासाठी आपण दररोज योगा आणि ध्यान केले पाहिजे, जेणेकरुन आपला सर्व प्रकारच्या रोगांपासून बचाव होऊ शकतो, राग नियंत्रित करण्यासाठी ध्यान केले जाते, आणि योगा शरीराला सामर्थ्यवान बनवते व त्यामुळे आपले शरीर रोगाविरूद्ध लढण्यासाठी तुम्हाला खूप मदत मिळेल.

दररोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला पाणी चढवा

शास्त्रात असे वर्णन केले आहे की जे लोक सूर्याला पाणी देतात त्यांना समाजात नियमितपणे सन्मान मिळतो आणि आरोग्यासह दीर्घ आयुष्य देखील मिळते.

तुळशीला पाणी घाला

तुम्हाला जर दररोज देवी-देवतांची कृपा-दृष्टी ठेवायची असेल तर तुम्ही दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करावे, शास्त्रात असे सांगितले आहे की, ज्या घरात तुळशी आहे आणि ज्या घरातील लोक नियमितपणे तुळशीची काळजी घेतात अशा लोकांच्या घरी नेहमी सुख-समृद्धी राहते.

तेलाने मालिश करा

आपण आपल्या शरीरावर तेलाने मालिश करावे आणि मालिश करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम आहे, तेलाची मालिश केल्याने त्वचेवरील बारीक छिद्रे उघडतात आणि त्वचेवरील छिद्र उघडल्याने त्वचा साफ होते परंतु ही मालिश तुम्ही सकाळी आंघोळ करण्यापूर्वी करावी.

आपल्या घरातील देवांची दररोज पूजा करा

तुम्ही तुमच्या घरातील देवांची दररोज पूजा करावी आणि तेथे उदबत्ती व धूप जाळावा, या धूरमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होईल आणि तुमच्या घरातील वातावरण सुधारेल व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.

घरातून बाहेर जाण्यापूर्वी दहीचे सेवन नक्की करा.

घर सोडण्यापूर्वी तुम्ही दररोज थोडे दही खावे, जेणेकरून तुमच्या कामामध्ये व्यत्यय येऊ शकणार नाही आणि घरातून बाहेर जाताना दही खाणे शुभ मानले जाईल.

नेहमी आपल्या पालकांचा आशीर्वाद घ्या

आपण दररोज सकाळी उठून आपल्या पालकांचा आशीर्वाद घ्यावा, जेणेकरून आपल्या वरील वाईट वेळ निघून जाईल, आणि देवी-देवता देखील या लोकांनावरती आपली कृपादृष्टी ठेवतात.

गायीला भाकरी खाऊ घाला

सकाळी जेवण बनवत असताना आपण गाईसाठी एक स्वतंत्र भाकरी नक्की बनवा, व कामावर जाण्यापूर्वी आपण दररोज गायीला एक भाकरी खायला द्या, असे केल्याने तुमच्या घरामध्ये अन्न आणि पैशाची कमतरता कधीच येणार नाही.

तर मित्रांनो, असे काही नियम आहेत जे आपले जीवन सुखी करण्यासाठी आपल्याला खूप मदत करतात तुम्ही देखील दररोज सकाळी हे नक्की करून पहा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.