जाणून घ्या रामायणात लपलेली अशी १३ रहस्ये, जी कोणालाच माहिती नाहीत….

रामायणातील सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत पण या महाकाव्यात रहस्याच्या रुपात लपलेल्या आहेत काही कथा ज्या कोणालाच माहिती नाहीत. चला पाहूया त्या काय आहेत.

१. रामायण रामाच्या जन्माच्या अनेक वर्षे आधी लिहिले गेले होते, त्याची रचना महर्षी वाल्मिकी ऋषींनी केली आहे. या महाकाव्यात २४ हजार श्लोक, पाचशे उपखंड तसेच उत्तरासहित सात कांड आहेत.

२. वाल्मिकी रामायणाच्या अनुसार श्रीरामाचा जन्म चैत्र मासाच्या नवमीला पुनर्वसू नक्षत्रात कर्क लग्नात झाला होता. त्या काळात सूर्य, मंगल, शनी, गुरु आणि शुक्र हे आपापल्या उच्च स्थानात होते तासेक चंद्राबरोबर गुरु स्थित होते. ही सगळ्यात उत्तम ग्रह दशा असते या काळात जन्माला आलेले बालक हे अलौकिक असते.

३. ज्या वेळी श्रीराम वनवासात गेले त्या वेळी त्यांचे वय साधारण २७ वर्षे इतके होते. राजा दशरथ यांना श्रीरामांना वनवासाला पाठवायचे नव्हते पण ते वचनात अडकले होते. जेव्हा श्रीरामाला थांबवायचा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही तेव्हा त्यांनी श्रीरामाला हेही सांगितले कि मला बंदी बनवून तू राजा हो.

४. वनवासाच्या पहिल्या रात्री जेव्हा राम आणि सीता झोपलेले होते, तेव्हा निद्रा देवी लक्ष्मण समोर प्रकट झाली त्या वेळी लक्ष्मणाने निद्रा देवीला अशी विनंती केली की 14 वर्षांच्या वनवासात त्याला झोप येऊ नये, ज्यामुळे तो राम आणि सीतेचे दिवस रात्र रक्षण करू शकेल. निद्रा देवी प्रसन्न झाल्याने म्हणाली की जर तुमच्या ऐवजी कोणी 14 वर्ष झोपेल तर तुम्हाला हे वरदान मिळू शकेल, त्यानंतर लक्ष्मण या सल्ल्यावर निद्रा देवी लक्ष्मणची पत्नी आणि सीतेची बहीण उर्मिलाला भेटली. उर्मिलाने लक्ष्मणऐवजी सोनं स्वीकारलं आणि ती 14 वर्षे झोपली.

५. रामायणाच्या अनुसार समुद्रावर पूल बनवायला पाच दिवसांचा वेळ लागला. पहिल्या दिवशी १४ योजन, दुसर्या दिवशी २० योजन, तिसर्या दिवशी २१ योजन, चौथ्या दिवशी २२ योजन आणि आणि पाचव्या दिवशी २३ योजन पूल बनवला होता. अशा प्रकारे एकूण १०० योजन लांबीचा पूल समुद्रावर बांधला गेला. हा सेतू १० योजन रुंद होता. (एक योजन साधारण १३-१६ किमी असतो)

६. सगळ्यांना हे ठाऊक आहे कि लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापल्यावर राग येऊन रावणाने सीतेचे हरण केले, पण स्वतः शूर्पणखेनेही रावणाला सर्वनाश होण्याचा शाप दिला. कारण रावणाची बहिण शूर्पणखा हिचे पती विद्युतजिव्हयाचा वध रावणाने केलं होता. तेव्हा शुर्पणखेने मनातल्या मनात रावणाला हा शाप दिला कि माझ्यामुळेच तुझा सर्वनाश होईल.

७. असे म्हणतात कि जेव्हा हनुमानाने लंका जाळली आणि ते पुढे जात होते तेव्हा त्यांची नजर शनीदेवावर पडली, ते एका कोठारात बंद होते. हनुमानाने त्यांची सुटका केली. मुक्त झाल्यावर त्यांनी हनुमानाच्या बल आणि बुद्धीची परीक्षा घेतली आणि त्यांना जेव्हा खात्री पटली कि खरोखरच श्रीरामाचे दूत हनुमान आहेत तेव्हा त्यांनी हनुमानाला हे सांगितले कि ‘ह्या पृथ्वीवर जो तुझा भक्त असेल त्याला मी माझ्या वाईट दृष्टीपासून दूर ठेवीन, त्याला त्रास देणार नाही” अशा प्रकारे शनिवारी सर्व मंदिरात हनुमान चालीसेचा पाठ होतो तसेच आरतीही होते.

८. जेव्हा खर दूषण मारले गेले तेव्हा एक दिवस भगवान रामचंद्र सीतेला म्हणाले कि “ प्रिये आता मी माझी लीला सुरु करणार आहे, खर दूषण मारले गेले, जेव्हा शूर्पणखा ही बातमी घेऊन लंकेला जाईल तेव्हा रावण समोरासमोर लढाई करणार नाही उलट काही नवीन खेळी खेळेल आणि मला आता दुष्टांचा संहार करण्यासाठी एक नवीन लीला करायची आहे. जोवर मी सगळ्या राक्षसांना या पृथ्वीवरून संपवत नाही, तोवर तू अग्नीच्या सुरक्षेत राहा.” त्याच वेळी त्यांनी अग्नी प्रज्वलित केला आणि सीतेने भगवान रामचंद्रांची आज्ञा घेऊन अग्नीत प्रवेश केला. तिच्या स्थानावर ब्रह्माने तिचे प्रतिबिंब ठेवले.

९. अग्नी परीक्षेचे सत्य – रावण ज्या सीतेचे हरण करून घेऊन आला ते सीतेचे प्रतिबिंब होते आणि परत आल्यावर त्याची पुष्टी करण्यासाठी सीतेला अग्नीपरीक्षा देण्यास सांगितले.

१०. आधुनिक काळातले वानर नव्हते हनुमान – असे म्हणतात कि कपि म्हणून एक वानरांची जात होती त्या जातीचे हनुमान ब्राह्मण होते. संशोधक असे सांगतात कि भारतात आजपासून ९ ते १० लाख वर्षापूर्वी वानरांची एक अशी जात अस्तित्वात होती जी साधरणपणे १५ हजार वर्षापूर्वी लुप्त होऊ लागली आणि रामायणानंतर पूर्णपणे लुप्त झाली. कपि असे ह्या जातीचे नाव असून ही प्रजाती शेपटी आणि चेहऱ्यामुळे वानरासारखी दिसत असे.दुर्दैवाने ही जाती संपली आणि इंडोनेशिया देशाच्या बाली नावाच्या द्वीपात आता शेपटीधारी जंगली मनुष्यांचे अस्तित्व विराजमान आहे.

११. विश्वात रामायणाचे वाचन करणारे पहिले वाचक दुसरे तिसरे कोणी नसून स्वयं भगवान श्रीराम यांचे पुत्र लव आणि कुश होते. ज्यांनी रामकथा स्वतः आपले पिता श्रीराम यांच्या पुढे लावली होती. पहिली रामकथा पूर्ण केल्यावर लव कुश यांनी असे सांगितलेही होते की हे पितु भाग्य हमारे जागे राम कथा कही रामके आगे.

१२. सर्वानाच माहिती आहे की शूर्पणखाचे लक्ष्मणने नाक तोडल्यामुळे रागाने रावणाने सीतेचे हरण केले होते, पण खुद्द शूर्पणखाने रावणाला तुझा सर्वनाश माझ्याचमुळे होईल असा शाप दिला होता. कारण रावणाने शूर्पणखा यांचे पती विद्याजीव यांना मारले होते. मग शूर्पणखाने रावणाला मनातल्या मनात शाप दिला होता की माझ्यामुळेच तुझा सर्वनाश होईल.

१३.. रामाने सरयू नदीत बुडून पृथ्वीचा त्याग केला. असे मानले जाते की जेव्हा सीतेने पृथ्वीत लीन होऊन तिचा देह सोडला, तेव्हा रामाने सरयू नदीत समाधी घेऊन पृथ्वीचा त्याग केला.

 

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.