घरातील निगेटिव एनर्जी दूर करण्यासाठी काही हमखास उपाय…

आत्ताच्या घडीला चारी बाजूंनी वातावरण निगेटिव बनले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडून फक्त वाईट आणि नकारात्मक बातम्याच येताना दिसतात. अशात आपले विचार पोझीटीव ठेवणे हे आव्हानात्मक आहे. घरात पोझीटीव एनर्जी खेळती ठेवणे हे सोपे नाही पण योग्य पद्धतीने प्रयत्न केले तर नक्की ते जमू शकेल. काही अशा टिप्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही घरातील निगेटिव एनर्जी दूर करू शकता.

१. प्रवेशद्वारावर गणपतीची प्रतिमा

जर तुम्ही तुमच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवलीत तर नक्कीच ते खूप चांगले आहे. असे म्हणतात कि गणपती हा विघ्नहर्ता आहे आणि म्हणूनच त्याची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणे हे शुभ मानले जाते.

२. तुळशीचे रोप लावा

घरात तुळशीचे रोप लावले तर ते सगळी निगेटिव शक्ती खेचून घेईल. तुळशीत औषधी गुणधर्मपण आहेत. तुळशीजवळ रोज संध्याकालीदिवा लावला तर आणखी चांगले होईल. तुलस ऑक्सिजनचा पुरवठा करते.

३. घराच्या आजूबाजूला नकोत सुखी झाडे

घराच्या आजूबाजूला जर सुखलेली झाडे असतील तर लगेच काढून टाका कारण ही अशी झाडे निगेटिव एनर्जी देतात. घराच्या आजूबाजूला प्रसन्न वातावरण असणे आवशयक आहे.

४. लिकेजचा बंदोबस्त करा

जर घरात कुठे लिकेज होत असेल तर त्याचा बंदोबस्त लगेच करा. लिकेज मुळे जर निरनिराळ्या आकृत्या तयार झाल्या असतील तर वास्तुशास्त्राप्रमाणे ते योग्य नाही, त्याचा बंदोबस्त लगेच करायला हवा जेणेकरून निगेटिव उर्जा येणार नाही.

५. गालिचे सजवा

तुम्हाला जर गालिचे आवडत असतील तर त्यांनी घर सजवा म्हणजे घराच्या संदर्यात भर पडेल. संपूर्ण खोली व्यापेल असे गालिचे असतील तर अति उत्तम

६. मिठाचा उपाय

मीठ हे घरातील निगेटिवीटी दूर करते. एका भांड्यात थोडे मीठ घेऊन पूर्व दिशेला ते ठेवावे आणि दर आठवड्याला हे बदलावे. ह्याने घरात सकारात्मक उर्जा येईल.

७. खिडकीला पडदे लावावेत.

बरेचदा आपल्या घराच्या खिडकीटून काही अशा गोष्टी दिसतात ज्याने त्रास होतो जसे कि कचरा, प्राणी, उकिरडा वगैरे. म्हणून सतत पडदे लावून ठेवावेत जेणेकरून घरात नकारात्मक उर्जा येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *