अभिषेक बच्चनच्या जन्मानंतर अमिताभ यांनी केली होती खूपच मोठी चूक, ज्याचा त्यांना आजही होतोय पश्चाताप

सगळ्या जगाला काय चूक आणि काय बरोबर याचा आदर्श घालून देणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा मुलगा अभिषेक याच्या जन्मानंतर एक असे काम केले होते, जे पूर्णपणे चुकीचे होते आणि ज्यामुळे अनेक लोकांच्या नोकर्या जाता जाता वाचल्या.

इतकेच नाही तर या गोष्टींची अमिताभ बच्चन यांना त्यावेळी जराही जाणीव झाली नाही, पण आज त्यांना त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाचा फार पश्चात्ताप होतो. स्वतः अमिताभ यांनी हल्ली झालेल्या एका इंटरव्यूमध्ये असे सांगितले की अभिषेक बच्चन जन्माला आल्यांनतर जेव्हा डॉक्टरने त्यांना असे सांगितले कि त्यांना मुलगा झाला आहे. तेव्हा ते आनंदाच्या भरात सर्वकाही विसरून गेले आणि त्यांनी ते डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या नर्सला वाईन पाजली होती.

बिग बी यांनी सांगितले कि त्यांच्या ह्या कृत्यामुळे डॉक्टर आणि नर्स यांची नोकरी जाता जाता वाचली होती. त्या वेळी कोणीतरी त्यांची तक्रार केली होती आणि या प्रकारची माहिती दिली. त्यानंतर बिग बी हे स्वतः हॉस्पिटलमधील लोकांशी बोलले नाहीतर डॉक्टर आणि नर्स यांना नोकरी गमवावी लागली असती. इतकेच नाही तर त्यांनी या गोष्टीची कबुलीही दिली कि श्वेतानंतर अभिषेकचा जन्म झाल्यावर ते इतके खुश झाले होते कि त्यांना कसलेच भान राहिले नाही आणि अशी चूक घडली. त्यांनी त्या वेळी ड्रायवर पासून ते नोकरांपर्यंत सगळ्यांनाच मिठाई वाटली होती.

बच्चन परिवाराचा एक शिरस्ता आहे कि जेव्हा त्यांच्याकडे एखादी खास गोष्ट घडते, तेव्हा घरातील सगळ्यांना मेजवानी दिली जाते. तसेच आता बिग बी सांगतात कि आता त्यांना जाणीव होते त्यांनी त्या दिवशी हॉस्पिटलचे नियम तोडून योग्य केले नाही. कोणताही नियम मोडणे हे चांगल्या नागरीकाचे लक्षण नाही असेही ते सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published.