अभिनेत्री दिव्या खोसला कुमार बॉलिवूडचे प्रसिद्ध नाव भूषण कुमार यांची पत्नी असून ती जगातील सर्वात मोठ्या यूट्यूब चॅनेल म्युझिक कंपनीची मालक आहे. दिव्याने 2004 मध्ये अब तुम्हारे हवाले वतन साथीयो चित्रपटातून अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली. आज जरी दिव्या खोसला तिच्या मॅरेज लाईफमध्ये व्यस्त असली तरी, तिने तिच्या चित्रपट कारकिर्दीत तिने अनेक चित्रपटांच्या माध्यमातून लोकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती.
आज बॉलीवूडमध्ये निर्माता-दिग्दर्शक म्हणून काम करून ती कोटींची मालकिन बनली आहे. आता ती एका मुलाची आई होण्याबरोबरच तिच्या आयुष्यात बर्याच जबाबदाऱ्या पार पाडत आहे.
अभिनेत्री दिव्या खोसला हिने टी सीरीजचे निर्माते गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमारसोबत लग्न केले आहे. जे आज जगातील सर्वात मोठ्या YouTube चॅनेलचे मालक आहेत. भूषण कुमार यांनी अलीकडेच कोरोनामुळे ग्रस्त रुग्णांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. व आम्हाला समजलेल्या वृत्तानुसार त्यांनी गरजूंना 11 कोटी रुपयांची मदत केली आहे.
मित्रांनो यांनी केलेल्या मदतीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.