ताई माझं बाळ वाचवा… मी वर्षभर तुमच्याकडे कामाला येईल…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, वेळ रात्री 1.45 मिनिटांची पुढे दिसणारा रस्ताच जणू अंधारलेल्या… या परिसरात असलेल्या साई सुर्या हॉस्पिटलच्या संचालिका आणि तनिष्का डॉक्टर स्कोरमच्या सदस्या डॉक्टर :- चंचलताई साबळे यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचली…. “परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तनिष्का भगिनी देवदूत बनून या मजूर कुटुंबाच्या मदतीला धावल्या”.

अनेक ठिकाणी कोरोनाच्या भीतिने सर्वत्र चिंतेचे वातावरण असतानाही डॉक्टर चंचलाताई साबळे यांनी कसलेही रिपोर्ट अथवा फाईल रुग्णासोबत नसताना देखील यशस्वीपणे प्रसूति करत, कुटुंबाला मोठा आधार देत, सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्या बाळाच्या आई डॉक्टरांना बोलल्या “ताई आज तुमच्यामुळे माझे बाळ वाचले मी वर्षभर तुमच्याकडे कामाला येऊन तुमचे बिल परत फेड करेन” असे बोलून त्या मोठ्याने रडत होत्या.

नंतर डॉक्टरांमधील माणुसकी जोपासत कुठलीही फी न घेता मोफत सेवा दिल्याचे या कुटुंबाला कळाल्यावर मात्र मजूर कुटुंब हमसून हमसून रडले…..! कुटुंबाच्या चेहऱ्यावर एका बाजूला बाळ जन्माला आल्याचे आनंदअश्रू आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टरांमधील देवदूत भेटल्याने मन अगदी भरून आले होते. व या वातावरणात तनिष्का भगिमी, डॉक्टर चंचलाताई साबळे यांनाही अश्रू आवरणे कठीण बनले होते. रात्री पाऊने दोन वाजता माणुसकीला जोपासणारा हा प्रसंग निषब्ध करून गेला, तनिष्का भगिनी देत असलेल्या सामाजिक योगदानाचा नेहमीच अभिमान वाटतो……!!

अभिनंदन डॉक्टर चंचला ताई साबळे आणि सलाम तनिष्का….. मित्रांनो तुम्हाला या मदती बद्दल व डॉक्टर चांचालताई साबळे यांच्याबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.