कोरोनावर उपचार करणाऱ्या या डॉक्टर स्त्रीचा असाही शेवटचा निरोप….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, मीरा आई वडिलांची एकुलती एक मुलगी, दहावी पास झाल्यावर वडिलांनी तिचा कल बघून तिला पुढील शिक्षणासाठी डॉक्टर आणि इंजिनीयर असे दोन पर्याय सुचवले. त्यातून मीराने मेडिकल निवडले आणि ती डॉक्टर झाली नंतर तिचे समीर नावाच्या इंजिनीयर शी लग्न देखील झाले आणि त्यांना स्वर नावाचा एक मुलगा आहे.

आज मीरा घरी जायला निघाली ते निश्चय करूनच की, आज घरी जायचे ते शेवटचेच, उद्या सकाळी घरातून निघाली की हे कोरोना प्रकरण संपल्यानंतरच जगले वाचले. तरच घरी जाईन, मीराने निर्णय तर घेतला पण लगेचच तिच्या डोळ्या समोर तिचा छोटासा 2 वर्षांचा मुलगा स्वर आला, मन भरून आले छकुल्याच्या आठवणीने व्याकुळ झाली. अक्षरशः नोकरी सोडून द्यायचा विचार आला, पण दुसऱ्याच क्षणी मोबाईल ने कर्तव्याची आठवण करून दिली. तिच्या मैत्रिणीने फोनवरून हॉस्पिटल मधील बिकट अवस्था कळवली. तिच्या मनात द्वंद्व चालू होतं की जन्म दिल्यापासून माझ्या बाळाला पहिले तीन महिनेच सांभाळले. त्यानंतर मात्र सासूबाई आणि आईच्या जीवावर बाळाला सोडून आपण नोकरी करतोय. रात्री घरी गेल्यावर जर बाळ जागे असेल तरच थोडासा वेळ मिळतो बाळासाठी…. अशी कशी आई आहे मी, पण मी नोकरी  तर बाळाच्या भविष्यासाठीच करत आहे ना ? मग माझे कुठे चुकते. आई बाबा, समीर, त्यांचे आईवडील किती सपोर्ट करतात मला, माझ्या प्रोपेशन साठी त्यांना सगळ्याना मी जास्त वेळ देऊ शकत नाही.

खरच इतर प्रोपेशन मधले सगळे किती नशीबवान आहेत की त्यांना त्यांचे पुढील काही दिवस आपल्या परिवारासोबत सेफ राहता येईल. मात्र मला माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी उद्या घरा बाहेर पडावे लागेल. तेही कदाचित शेवटचा निरोप घेवून कारण घरातल्यांच्या प्रति माझे हे ही कर्तव्य आहे की, घरी येताना तो विषाणू माझ्या सोबत माझ्या घरच्यांनाही बादीत करू शकतो.

असे बरेच विचार तिच्या मनात चालू होते, त्यांना बाजूला सारून आता तिने तिच्या आईला फोन करून बाबा आणि तू घरी या आज राहायला असे सांगितले. तिचे आई बाबाही राहायला जवळच होते, ते देखील लगेच तिच्या घरी आले. फोन ठेवल्यानंतर तिला जाणवले की आई बाबांची मी एकुलती एक मुलगी आहे. माझे काही झाले तर त्यांना कोण बघेल आता ठीक आहे. पण म्हातारपणी त्यांचे कसे होणार आणि माझ्या समीरचे माझ्यावर किती प्रेम आहे. त्याला काय वाटेल मी जेव्हा आजारी होते तेव्हा ते त्याला बगवत न्हवते, किती अस्वस्थ होत होता तेव्हा तो आणि आता त्याला  एकटे सोडून  गेल्यावर समीरच्या आई बाबाना हे पटेल का? किती जीव लावतात मला, दोघेही मी माझा निर्णय सांगितल्यावर काय प्रतिक्रिया असतील. सगळ्यांच्या ह्या विचारानेच तिच्या अंगावर काटा येत होता.

असेच विचार करत ती घरी पोहोचली, बाहेर गेटवर तिचे सासरे भेटले, त्यांनी तिच्या मनातील घालमील तिच्याकडे बघूनच ओळखली. तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला म्हणाले शांत हो आणि आताच क्षण जग…. त्यामुळे तिला धीर आला आणि पटलेही या सगळ्यांसोबत आपली शेवटची रात्र असू शकते. त्यामुळे सगळ्यांसोबतच्या छान आठवणी घेऊन जाऊयात उद्या सकाळी…. मिराने सगळ्यासोबत गप्पा मारल्या, नंतर एकत्र जेवण झाल्यानंतर मिराचे सासरे म्हणेल तू तुझे आवरून घे आणि आराम कर. थोड्या वेळाने आपण सगळे एकत्र कॉफी घेऊया, तुझी दिवसभर दगदग झाली आहे, मीरा हो म्हणून रूममध्ये जाऊन स्वतःची बॅग भरून ठेवली. इकडे तिच्या सासऱ्यांनी बाकी सगळ्यांना सांगितले की सध्या जे काही चालले आहे. त्यामुळे मिराला त्रास होत असेल आणि त्यासाठीच तिला आपल्या सगळ्यांचा आधार आणि पाठबळ हवे आहे.

आपण ते तिला द्यायला हवे शेवटी ती ही एक व्यक्ती आहे. तेव्हा तिच्या मनाचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सध्या तिला जरा समजून घ्या सर्वांनी…. अशी थोडीफार साखर पेरणी केली त्यांनी, मीराच्या आईच्या लक्षात आलेच होते लेकीच्या वागण्यातून आणि अत्ता हे पक्क असल्याची खात्री पटली. पण ती ही आईच होती तरीही ती स्वतः सावरून मीराला कसा पाठिंबा द्यावा याचा विचार करत होती. आतून मात्र खूप घाबरली होती, आज मिराच्या सासऱ्यांनी स्वतः कॉफी बनवून आणली आणि मिराला हाक मारली मीरा आली आणि मिराचे कौतुक केले आणि मिराला सांगितले काही गोष्टी बोलायला अवघड असतात. त्यासाठी हातात कॉफी चा कडवट कप हा लागतोच. आज आपल्या मिराला आपल्याला काही तरी सांगायचे आहे त्यासाठी हा सगळा कॉफीचा बेत….

बोल बेटा तू जे काही ठरवले आहेस त्यात माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. मिराचे डोळे भरून आले तरीही तीने सांगितले की मी उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये गेली की हे कोरोना विषाणू संपल्यावरच जगली वाचली तरच घरी येईन. जर समजा मला त्याचा संसर्ग झालाच तर मला तुमच्यातील कोणीही बघायला यायचे नाही. मी यातुन वाचली नाही तरीही माझे पार्थिव तिथेच नष्ट करायला सांगा. त्यासाठी तुम्ही कोणीही तेथे येऊ नका हीच माझी शेवटची इच्छा आहे.

हे ऐकून समीर आणि मिराचे वडील दोघांनाही धक्काच बसला आणि समीरची आई संतापली मिराला बोलली तू मुलाला काय उघड्यावर टाकून जाणार आहेस काय? आमचं काय? समीरच काय? तुझ्या आई वडिलांचा तरी विचार केला आहेस का? ह्या घरची सून म्हणून तुझी काही कर्तव्य आणि जवाबदाऱ्या आहेत, त्या कोण पार पाडणार तू माझ्या समीरची बायको आहेस. त्याच्यावरच तुझं प्रेम इतक्यातच संपलं का ? लग्न ठरवताना तू आम्हाला आणि तुझ्या आई वडिलांना वचन दिल की, आम्हाला चौघांना कधीही अंतर देणार नाहीस. त्याच काय झालं? यावर मीरा काहीच बोलली नाही, त्यामुळे सासूबाई अधिकच चिडल्या आणि तिला म्हणाल्या अशी कशी ग तू उलट्या काळजाची…..

स्वतःच्या कुटुंबापेक्षा आणि नवऱ्यापेक्षा तुला तुझं प्रोफेशन मोठं वाटते का ? आज मला असे वाटते की समीर साठी आमची निवड चुकली आहे. आम्हाला अशी भावना शून्य मुलगी सून म्हणून नको होती. इतक्यात मिराचे सासरे मीराच्या सासूबाईंना बोलले तुझ्याकडून ही अपेक्षा न्हवती. मला तू काय बोलतेस तुला तरी कळते का?  तू एका सेवा निवृत्त सैनिकाची बायको आहेस. आपली सून ही उद्या एका बायोलॉजीक युध्दावर चालली आहे, तिला आशीर्वाद द्यायचे सोडून तिला तुष्ण कसली देतेस.

घरी यायचे नाही म्हणते, कारण सरकार लोकांना सांगून थकले आहे की घरा बाहेर पडू नका, पण लोक काही ऐकत नाही. मग नाईलाजाने सगळेच बंद करावे लागत आहे. सरकारला आणि शिवाय हिचा अजून एक मुद्दा असा की हिच्या आजूबाजूला पेशेंट असतात. म्हणून तो व्हायरस बाहेर इतरांपर्यंत किंवा आपल्या पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्यावर असलेल्या प्रेमापोटी ति तीची ममता बाजूला ठेऊन हॉस्पिटलमध्येच थांबायचे म्हणते.

त्यासाठी तिचे स्वतःच्या मनाशी भांडण चालू आहे, यामध्ये तीला आधार द्यायचा सोडून वेगळेच बोलतेस. आता मात्र सगळेच गप्प झाले मीराचे सासरे तिला बोलले की, मला तुझा अभिमान वाटतो. तू निश्चित पणे जा इथले सर्व माझ्यावर सोड, जा आता जाऊन आराम कर… उद्या आवरून नाष्ट्याला ये मी स्वतः तुझ्यासाठी नाष्टा बनवणार आहे. हे बोलताच मीरा खोलीमध्ये गेली.

खरच हा मिराचा शेवटचा निरोप असेल का ? अशा किती तरी जणी आणि असे किती तर जण आहेत जे आपआपल्या कुटुंबाचा शेवटचा निरोप घेऊन निघतात……  तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.