लॉकडॉऊनमुळे या महिलेसोबत जे घडले, ते जाणल्यावर तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, दिनांक 27 मार्च रोजी रात्री नालासुपरा या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सोनाली पंदिरकर या सहा महिन्यांच्या गरोदर असलेल्या महिलेच्या पोटात अचानक त्रास होण्यास सुरवात झाली. लॉकडाउन तिचे पती प्रदीप पंदिरकर बाहेर अडकले होते, शेजाऱ्यांनी त्या महिलेला दवाखान्यात दाखल केले. असता तेथील डॉक्टरांनी महिलेच्या पोटातील गर्भ मृत पावल्याचे सांगितले आणि पुढील उपचार आमच्याकडे शक्य नसल्याचे जाहीर केले.

एका हॉस्पिटलमध्ये पन्नास हजार रुपयांची मागणी केली आणि महिलेकडे फक्त 2 हजार रुपये होते, अशा परिस्थितीमध्ये महिलेचा त्रास वाढला आणि महिलेच्या गंभीर असा धोका निमार्ण झाला. महिलेसमोरील अडचणी म्हणजे पती घरी न्हवते, मुबलक पैसे न्हवते आणि नाला सुपाऱ्यात उपचार शक्य न्हवते. महिला अशा परिस्थितीत महिला सापडली, असता महिलेचे पती प्रदीप यांनी त्यांच्या मित्राच्या सल्यानुसा अचानक रात्री तुलसी जोशी यांना फोन केला आणि त्यांच्या समोरील समस्यांचा पाढा वाचला. अशा वेळी तुलसी जोशी यांनी त्या महिलेसाठी नाला सुपारी येथून रुग्णवाहिका उपलब्ध केली आणि मुंबई सेंट्रल या ठिकाणी असणाऱ्या नायर रुग्णालमध्ये दूरध्वनी वरून बोलून त्या महिलेस ऍडमिट करून घेण्यासंदर्भात विनंती केली.

तुलसी जोशी यांच्या विनंतीस मान देत रुग्णालय प्रशासनाने महिलेला त्वरित पाठवून देण्यास सांगितले, योग्य वेळी रुग्ण वाहिका आणि त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यामुळे सदर महिलेवर आवश्यक ते उपचार केले गेले. त्यामुळे सोनाली पंदिरकर यांचे प्राण वाचले आहेत, पंदिरकर दांपत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले आहेत. तसेच तुलसी जोशी यांना आमच्या Mahiti.in या वेबसाईट कडून मानाचा मुजरा…..!

Leave a Reply

Your email address will not be published.