रामायण मालिकेतील सीता आठवते का, बघा आता कश्या दिसतात त्या…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती रामायण हा आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाला पडद्यावर दाखवण्यासाठी आतापर्यंत कितीतरी टीव्ही शो, चित्रपट आणि कार्टून्स च्या माध्यमांचा वापर करण्यात आला आहे . परंतु जेव्हा आपण रामायनाबद्दल बोलतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्या मनात रामानंद सागर यांची रामायण मालकी लक्षात येते. दूरदर्शन वर ही रामायण मालिका दर रविवारी दखवण्यात येत होती. परंतु त्यावेळी प्रत्येकांच्या घरात टीव्ही नव्हता, म्हणून काही लोक आपल्या परिसरातील ज्याच्या घरामध्ये सर्वात मोठे आणि कलरफुल टीव्ही आहे त्याच्या घरी रामायण पाहायला जात असे.

ही मालिका त्या काळात इतकी लोकप्रिय होता की प्रत्येक रविवारी जेव्हा ही मालिका टीव्ही वर लागत असे तेव्हा रस्त्यावर शांतता पसरली जायची. हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रत्येकजण टीव्ही समोर चिकटून बसायचे. हा कार्यक्रम पाहताना जर चुकून लाईट गेली तर लाईट लवकर यावी यासाठी सर्वजण आपला हात जोडून प्रार्थना करत असे.

या मालिकेची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये सर्वोत्कृष्टरित्या पात्र साखरणारे कलाकार. या मालिकेमध्ये काम केलेल्या प्रत्येक अभिनेत्याने आपली भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. व त्यांच्या या पत्रांमुळे लोकांच्या मनावर इतकी खोल छाप पडली आहे की आज देखील जेव्हा भगवान रामांची चर्चा येते तेव्हा अरुण गोविल यांचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येऊ लागते. राम व्यतिरिक्त या मालिकेतले इतर महत्त्वाचे पात्र सीता होते. ही भूमिका दीपिका चिखलियाने साकारली होती. या राम सीता जोडीने देशभरात भरपूर लोकप्रियता मिळवली आहे.

तर बरेच लोक त्यांना खरोखरचे राम सीता मानू लागले होते. रामायणातील ही सर्व पात्रे आज देखील आपल्या लक्षात आहेत. पण ही पत्र करणारे कलाकार सध्या कुठे आहेत व काय करत आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला सीताची भूमिका साकारणारी दीपिका चिखलियाबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत. जेव्हा दीपिका रामायणामध्ये सीतेची भूमिका साकारत होती, तेव्हा तिच्या वास्तव जीवनातील काही फोटो पेपरांमध्ये आणि मासिकांत छापले जायचे.

पण सीताची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया कशी आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. आज आम्ही तुम्हाला दीपिकाची लेटेस्ट फोटो दाखवणार आहोत. जेव्हा तुम्ही हा फोटो पाहाल तेव्हा तुम्ही दीपिकाला ओळखणारच नाही. 29 एप्रिल 1965 रोजी जन्मलेली दीपिका आज 52 वर्षांची झाली आहे. दीपिका 1985 ते 1995 या काळात टीव्ही आणि चित्रपटांमध्ये कार्यरत होती.

सध्या दीपिका एक आनंदी आणि सुखी गृहिणी आहे. त्यांनी सिंगार बिंदी कंपनीचे मालक हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना दोन मुली देखील झाल्या. आपण पाहू शकता की तेव्हापासून दीपिका खूप बदलली आहे.
मित्रांनो अश्याच सुंदर माहिती साठी आमचे Marathi Asmita पेज नक्की लाईक करा…. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.