बायको सकाळी थकल्यासारखी दिसायची… नवऱ्याने रूममध्ये कॅमेरा बसवताच तिचे खुलले राज….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती रामायणात महर्षी वाल्मीकींनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.’ खरोखर किती अचूक वर्णन आहे हे ! आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य थिटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, “इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी त्यांचे ‘प्रसादपट’ हे थिटे ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही.” ती आपल्या मुलाला नऊ महिने गर्भाशयात ठेवणे, बाळंतपणाचा त्रास सहन करते, स्तनपान करणे, रात्रभर जागे राहून बाळाचा चांगला सांभाळ करते, स्वतः ओली होते मात्र बाळाला ओले ठेवत नाही, गोड अंगाई गीत म्हणते, बाळाशी त्याच्याच भाषेत चोचरे बोलते तसेच त्याला बोटाला धरून चालायला शिकवते, प्रेमाने ओरडणे, दूध-दही-तूप-लोणी खाऊ घालत लाड करणे. बाळ कितीही मोठे झाले तरी आई त्याला लहान बाळ समजूत डोक्यावरून हात फिरवते…. या जगातील प्रत्येक प्राण्यांच्या आणि पक्षांच्या ‘आईची’ हीच ओळख आहे.

आईने आपल्या मुलासाठी कितीही बलिदान दिले तरी ती ते कधीच बोलून दाखवत नाही, तरी सुद्धा बरेच लोक आईच्या या बलिदानावर देखील प्रश्न उपस्थित करतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची कहाणी सांगणार आहोत जिच्या पतीच्या मनात तिच्या विषयी शंका होती की ती दिवभर इतकी थकलेली का असते, ती असे कोणते काम करत असते ज्यामुळे तिची रात्रीची झोप पूर्ण होत नाही. त्यानंतर त्या आईने या प्रश्नचे उत्तर अतिशय चांगल्या प्रकारे दिले. व ते उत्तर पाहून तुम्हाला देखील समजेल की एक आई कोणते त्याग करते आणि आपल्या मुलांसाठी किती कष्ट करते.

आज आम्ही तुम्हाला अमेरिकेच्या लॉस एंजेलिस मध्ये राहणाऱ्या मेलानीय डार्नेल विषयी थोडी माहिती सांगणार आहोत. मेलानीया सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने दिसण्याऐवजी ती खूप थकलेली दिसायची. ती खूप थकलेली दिसत असल्यामुळे तिच्या पतीला काहीच समजत न्हवते, त्याला तिला पाहल्यानंतर असा प्रश्न पडत होता की तिला अशी कोणती समस्या आहे ज्यामुळे ती सकाळी उठल्यानंतर इतकी थकलेली दिसते? तर दुसऱ्या बाजूला मेलानीयाला मात्र माहीत होते की ती सकाळी उठल्यानंतर इतकी थकलेली का दिसते. मेलानीयाला भविष्यात या दिवसांची आठवण राहावी म्हणून त्यांनी एक प्लॅन बनवला. ज्या अंतर्गत मेलानीयाने तिच्या खोलीच्या छतावर एक कॅमेरा बसवला. व कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडिओ मेलानीयाने सुमारे तीन महिन्यांपूर्वी शेअर केला होता.

व्हिडिओमध्ये काय आहे?
मेलानीया सोशल मीडियावर fitmomma4three नावाने आपल्या मुलांसोबत असताना रात्रीच्या वेळेचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दखवण्यात आले की कशा प्रकारे मेलानीया आपल्या मुलांना झोपवण्याच्या नादामध्ये स्वतःची झोप पूर्ण करू शकत न्हवती. परंतु पहाटेचे 6.20 वाजल्यानंतर मेलानीयाला हांतरुणावरून उठावे लागत होते, तुम्हाला सांगू इच्छितो की, मेलानीयाचा नवरा ट्रेवलिंग जॉब आहे आणि तो जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असतो व अशा परिस्थितीत मेलानीयालाच तिन्ही मुलांची देखभाल करावी लागते आणि हेच कारण आहे ज्यामुळे मेलानीया दिवसा थकल्यासारखी दिसते.

संतुलन बनवणे खूपच अवघड
हा व्हिडिओ पोस्ट करीत मेलानीया म्हणाली की पालकत्वाची जबाबदारी सूर्यास्ताबरोबरच संपत नाही. दिवस किंवा रात्री मुलांची काळजी घेणे चालूच असते. स्वत: ची झोप पूर्ण करणे, मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्या इमोशनल गरजा भागवणे यामध्ये संतुलन बनवणे खूप कठीण आहे. मेलानीया म्हणते की भरपूर रात्र मी जागरण करून घालवल्या असल्या तरी जीवनाचे हे अनुभव माझ्यासाठी खूपच सुंदर आहेत, कारण तो मातृत्वाच्या सुखाचा भाग आहेत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *