नेहमी तरुण राहण्यासाठी हे 3 पदार्थ रोज खा कधीही म्हातारे दिसणार नाही.

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, मित्रांनो तारूण्य हे सर्वांनाच हवेहवेसे वाटते. तारूण्य जपण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. शिवाय, याबाबतीत महिला अधिक जागृत असतात. मात्र, तारूण्य टिकवण्यासाठी विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग होत नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. आपले केस काळे भोर असावेत, आपली स्किन तजीलदार असावी, त्यावरती सुरतुक्या नसाव्यात, असे जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही तरुण राहावं, म्हातारपण आपल्यामध्ये ज्यास्त प्रमाणात दिसू नये. अशी जर तुमची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला त्या बाबतीतच्या आहाराबद्दल सांगणार आहे. मित्रांनो जसा ज्याचा आहार तसे त्याचे तारुण्य अगदी बरोबर आहे. जितका तुमचा आहार योग्य असेल तितकेच तुम्ही चिरतरुण राहणार आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदांनी सांगितलेले असे तीन पदार्थ सांगणार आहोत. जे तीन पदार्थ दररोज खाल्ले म्हणजे उन्हाळा, पावसाळा, किंवा हिवाळा असो ह्या तिन्ही ऋतूंमध्ये जर हे पदार्थ तुम्ही प्रमाणामध्ये खाल्ले तर तुम्ही सदा सर्वकाळ तरुण रहाल.

तुमच्या चेहऱ्यावरती सुरतुक्या पडणार नाहीत आणि तुमची त्वचाही तजीलदार राहील, आणि तुम्ही तरुण दिसाल मित्रांनो हेजे तीन पदार्थ आहेत त्यातील पहिला पदार्थ आहे “लिंबू” मित्रांनो दिसायला अगदी साधा आहे, पण Vitamin C चा सर्वात श्रोत आहे लिंबू आपल्या ज्या डॅमेज झालेल्या सेल्स असतात. त्या सेल्सना रिपेअर करण्याचे काम लिंबू करतो. याच्यामध्ये आयर येबजॉबशन ची मोठी पॉवर असते, म्हणजेच आपल्या रक्तामध्ये लोह शोषून घेण्यामध्ये लिंबू खूप मदत करतो. त्याच प्रकारे हे आपले blood circulation सुद्धा खूप चांगले बनवते. आणि रक्ताभिसरनाचा वेग वाढल्यामुळे जी पोषक द्रव्ये असतात, ती प्रत्येक पेशीपर्यंत अगदी सहज पोहोचतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती त्वचेवरती काळे डाग पडत नाहीत. पडलेले असतील तर ते कमी होतात. सुरतुक्या पडत नाहीत आणि त्वचा नेहमी ताजीतवानी आणि जवान दिसते. आपण लिंबाचे सेवन लिंबू पाण्यामधून देखील करू शकता आणि लिंबूपाणी घेतल्याने आपल्या त्वचेवर फरक पडतोच, पण त्याच बरोबर आपल्या आहारामध्ये जे काही खाऊ त्याचे पचन देखील चांगले होते. हा लिंबु साधारणतः एका कुटुंबात जर चार व्यक्ती असतील तर एक ते दोन लिंबू त्यांनी दिवसाला वापरायला हवेत.

दुसरा पदार्थ आहे अक्रोड…. जे Dry foods असतात त्यापैकी एक पदार्थ आहे “अक्रोड”….!! ह्या अक्रोड Omega 3, Omega 6 , Vitamin C आणि E चा मोठा श्रोते आहे. अक्रोड, यामध्ये proteins असतात झिंकचे प्रमाण देखील बऱ्यापैकी आहे. आणि हे जे सगळे यामध्ये आहेत त्यामुळेच अक्रोडचे महत्व येवढे वाढले आहे. की तुमची त्वचा, केस याच संरक्षण यामुळ होत. तुमच्या पेशींना ऊर्जा पोहोचवण्याचे काम अक्रोड करत. तसेच सूर्यापासून जी अल्ट्राव्हायोलेट किरणं आपल्या पर्यंत येतात. या अल्ट्राव्हायोलेट घातक किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण सुद्धा हे अक्रोड करत, मित्रांनो नवनवीन पेशींची निर्मिती करण्यासाठी अक्रोड खूप महत्वाचे आहे.

आपल्या शरीरात ज्या पेशी असतात, त्या कालांतराने नष्ट होत असतात आणि त्या जागी नवीन पेशी निर्माण होत असतात. पण ज्यावेळी नवीन पेशी निर्मितीचा वेग कमी होतो, त्यावेळी आपण ज्यास्त वयाचे दिसायला लागतो व हा वेग वाढवण्याचे काम अक्रोड करत. आपण दोन ते तीन अक्रोड दररोज खायला हवेत यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळेल केस दाट बनतील तसेच आपली त्वचा देखील मुलाईम बनेल. आणि आपली हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा हे अक्रोड खूप चांगले आहे.

तिसरा पदार्थ आयुर्वेद सांगतो की रताळी… तर ही रताळी beta carotene युक्त असतात त्यामुळे आपल्या केसांना त्वचेला आणि नखांना पोषण देण्याचे काम हे रताळी करत असतात. मित्रांनो beta carotene बरोबरच यामध्ये fatty acids Omega 3, vitamins A, B, C, D, E, आणि K अशी जवळ जवळ सर्व प्रकारची vitamins या रतळांमध्ये आपल्याला दिसून येतात आणि म्हणून हा पदार्थ सुद्धा अतिशय चांगला आहे, तुमच्या पेशींची वाढ करण्यासाठी यामध्ये खूप चांगला घटक आहे, तो म्हणजे antioxidants, मित्रांनो आपल्या शरीरामध्ये free radicals ची सतत मिर्मिती होत असते आणि आपले शरीर म्हातारे करण्यास कारणीभूत घटक कोणता असेल तर तो म्हणजे free radicals……!!

तर या free radicals ना रोखण्याचे काम नष्ट करण्याचे काम antioxidants करतात आणि हे antioxidants आपल्याला रताळ्यापासून मिळतात आणि म्हणून रताळी आपण सीजनमध्ये दररोज खायला हवीत यामुळे free radicals पासून आपल संरक्षण होत. चेहऱ्यावर सुरतुक्या येत नाहीत, केस गळती होत नाही आणि आपण सतत तरुण ताजे तावाणे दिसतो. जर मित्रांनो लवकर म्हातारे व्हायचे नसेल जर वाढलेल वय तुम्हाला कमी करायचे असेल, तर तुम्ही सुद्धा हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये नक्की घ्या. लक्षात ठेवा जसा ज्याचा आहार तस त्याच तारुण्य हा मंत्र नेहमी लक्षात ठेवत, चला

मित्रांनो अश्याच सुंदर माहिती साठी आमचे Marathi Asmita पेज नक्की लाईक करा…. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.