रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थ नक्की खा….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, जर आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आपले अनेक रोगांपासून अनेक आजारांपासून नक्कीच संरक्षण होते. सध्या जगामध्ये एका विष्णूने अगदी उत्पात माजवला आहे अगदी थैमान घातले आहे या विषाणूची व अनेक लोकांना या विषाणूची बाधा होत आहे. अनेक लोक मृत्यू पावत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे कोणत्याही प्रकारच्या विषाणू पासून, जिवाणू पासून. हानिकारक सूक्ष्म जिवांपासून संरक्षण व्हावे तर तुम्ही स्वतःची रोग प्रतिकार शक्ती वाढवायला हवी. आज आम्ही तुम्हाला रोग प्रतिकार क्षमता, रोग प्रतिकारक शक्ती कशा प्रकारे वाढवू शकतो याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की कोणते पदार्थ आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी करतात, आणि म्हणून आपण हे पदार्थ कटाक्ष पणे टाळावे. सर्वात प्रथम घटक म्हणजे गोड पदार्थ, होय जे पदार्थ, अति गोड असतात, मग ती साखर असेल किंवा साखरे सारखी इतर पदार्थ असतील तर, असे जास्त गोड असणारे पदार्थ खाणे आपण टाळायला हवे. कारण हे गोड पदार्थ आपली रोग प्रतिकार क्षमता कमी करतात, दुसरे पदार्थ म्हणजे मैद्याचे पदार्थ, मैदा हा अत्यंत घातक पदार्थ आहे आणि या मैद्यापासून बनवलेले पदार्थ देखील आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी करतात. बेकरी मध्ये मिळणारे कोणतेही प्रॉडक्ट कोणतेही पदार्थ आपण जास्त खाऊ नयेत. त्याच प्रमाणे जे चरबी युक्त पदार्थ असतात चरबी युक्त पदार्थांचे देखील आपण सेवन करू नये, हे पदार्थ खाणे टाळावेत आणि उघड्यावरचे जे अन्न आहे ते देखिल आपण खाऊ नये. तर हे आहेत ते पदार्थ जे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी करतात. आता आपण जाणून घेऊया की कोणत्या पदार्थांचे सेवन आपल्या साठी अत्यावश्यक आहे. व विषाणूनपासून संरक्षण होण्यासाठी हे पदार्थ आपण नक्की खावेत.

आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये जो ऋतू चालू असेल त्या ऋतूतील फळांचा व त्या ऋतूतील भाज्यांचा समावेश नक्की करावा, त्याच प्रमाणे काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तुम्ही दररोज सकाळी तसेच रात्री झोपण्यापूर्वी दूध घ्या व त्या उखळलेल्या दुधामध्ये थोडीशी हळद टाका, जर तुम्ही ग्लास भर दूध घेणार असाल तर त्यामध्ये चिमूटभर हळद घ्या व हे दूध चांगले उखळून घ्या जेणेकरून ती हळद दुधामध्ये पूर्णपणे मिक्स व्हावी आणि नंतर ते दूध पिऊन टाका हे नक्कीच तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवेल.

या बरोबरच अजून एक उपाय देखील तुम्ही करू शकता एक पेला किंवा एक कप दूध घ्या व त्यामध्ये थोडेसे आले, तसेच चुमुटभर ओवा, थोडीशी काळी मिरी पावडर टाका, थोडीशी दालचिनी पावडर टाका, थोडीशी हळद मिसळा, त्याच बरोबर लसणाची एक पाकळी टाका, तीन ते चार तुळशीची पाने टाका ब असे हे मिश्रण केले दूध चांगले उखळून घ्या, सात ते आठ मिनिटे हे दूध व्यवस्थित उखळून घ्यावे कारण त्यामध्ये टाकलेल्या सर्व पदार्थांचे गुणधर्म या दुधामध्ये मिक्स होतील व असे हे दूध गाळून घेऊन प्यावे, अत्यंत उत्तम प्रकारचा हा उपाय आहे की जो आपली रोग प्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढवेल. त्याबरोबरच संत्री, पपई, काळी द्राक्षे, आवळा, लिंबू, किंवा अशी फळे ज्यामध्ये जीवनसत्व क  भरपूर आहेत.

अशा जीवनसत्व क असणाऱ्या फळांचा समावेश आपण आपल्या दैनंदिन आहारात नक्की करा, मात्र लक्षात घ्या की दुधामध्ये व या पदार्थांमध्ये किमान एक तासांचे अंतर असायला हवे, या पदार्थांमध्ये Vitamin C भरपूर असते जे आपली रोग प्रतिकारक शक्ती प्रचंड वाढवते. मात्र लक्षात घ्या की ह्यातील आंबट फळे खाल्ल्यानंतर यावरती पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे आपल्याला खोकल्याचा त्रास जाणवू शकतो. नंतर शेंगदाणे, बदाम, काळा खजूर, किंवा अक्रोड या पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. कारण या पदार्थांमध्ये क्षार, प्रथिने, फॅटिअसेंसी भरपूर असतात आणि हे पदार्थ आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नक्की मदत करतात. तुम्ही आपल्या आहारामध्ये अशा पदार्थांचा नक्कीच समावेश करायला हवा हे पदार्थच आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतील आणि अनेक प्रकारच्या विषाणूनपासून आपला बचाव करतील.

मित्रांनो अश्याच सुंदर माहिती साठी आमचे Marathi Asmita पेज नक्की लाईक करा…. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.