अशा स्त्रिया ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो.

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा हात असतोच….. प्रत्येक पुरुषाला वाटते की जी स्त्री लग्न करून आपल्या घरी येईल ती भाग्यशाली असावी तिच्यामुळे आपले घर हे स्वर्ग व्हावे… त्याच बरोबर तिने आपल्या घराची व आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घ्यावी… व आपल्या आयुष्यात आनंदी आनंद असावा….. काही पुरुषांच्या बाबतीत हे खरे देखिल होते व त्यांच्या घरात येणारी स्त्री खरोखरच आनंद व भाग्य घेऊनच घरात येते व घरातील संपूर्ण वातावरणात आनंद पसरवते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भविष्य पुराणात अशा स्त्रियांची लक्षणे सांगितली आहेत की ज्या स्रियांमध्ये हे गुण असतात त्या स्त्रीला लग्न होऊन ज्या घरी जातात त्या घराला स्वर्ग बनवतात…..! तर चाल या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

पाहिले लक्षण आहे, धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री…… जी स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीची पूजा करते व त्याच बरोबर दररोज घरामध्ये देवाजवळ व तुळशी जवळ दिवा लावते व स्वयंपाक झाला की अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवते व नंतर सर्वजण भोजन करतात या स्त्री मुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते व अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते.

दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती…..! जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते, जास्त हव्यास करीत नाही तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो, काही स्त्रीया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात. यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतींच्या नाकीनव येतात व कधी कधी त्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामे देखील गुंतवावे लागते व त्यामुळे त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात, म्हणून जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाही व घरातील वातावरण आनंदी व समाधानी राहते.

तिसरे लक्षण म्हणजे, स्त्री मध्ये धैर्यअसावे धाडस असावे… कोणतीही परिस्थिती असली तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असावी व कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्त्री भक्कम पणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असायला हवी जर अशी स्त्री घरामध्ये असेल तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही.

चौथे लक्षण म्हणजे राग न येणे…. तसे पाहायला गेले तर हा गुण असणाऱ्या स्त्रिया मिळणे अवघड आहे, कारण राग येणे हा स्त्री चा जन्मताचाच स्वभाव असतो. परंतु अति राग करणे, चिडचिड करणे, कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत थोडा फार राग सर्वच स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. जर स्त्री सारखी राग राग करीत असेल किंवा चीड चीड करीत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वाद विवाद होत राहतात म्हणून स्त्रीने सय्यमित व शांत असावे.

पाचवे लक्षण म्हणजे समजदार स्त्री… जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदार पणाने घेते व शांत पणे सर्व समजून घेते, जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा शांतपणे विचार करून स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते, गोड बोलते, त्यामुळे ते घर देखील सुखी व आनंदी असते, ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते, ती सर्वांशी चांगले बोलून त्यांच्यातील संबंध अधिक चांगले बनवते आणि सर्वांना समजून घेते त्यामुळे वेळ प्रसंगी ते सर्व लोक तिच्या कुटुंबियांसाठी धावून येतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

5 Comments on “अशा स्त्रिया ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो.”

  1. अगदी खरं आहे.मला अनुभव आला आहे,मी लग्ना अगोदर कफकल्लक होतो, दोन वेळचे मिळणे मुशकिल झाले होते.आज मी माझ्या तीन मुलांची लग्न करुन एक छोटेसे घर बांधले आहे.हे सर्व माझ्या सहचारिणी मुळे शक्य झाले.तीने स्वःता टेलर काम करुन संसाराला मोठा हातभार लावला.

  2. Hello my name is Amit suresh joshi, me kahi Ashich life partner shodhat aahe je maazya gharat sukh samruddhi gheun yel ghartlya barobar changle vaagel aani kahi nako

Leave a Reply

Your email address will not be published.