एक असे गाव जिथे लग्नासाठी तरसतात मुली पण वरच भेटत नाहीत….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, तुम्ही कधी अशा खेडेगावाबद्दल ऐकले आहे का? की जिथे पुरुषांची संख्या खूपच कमी आहे व तेथील अविवाहित मुली लग्नासाठी आतुर झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाबद्दल सांगणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. या गावात जवळपास 300 अविवाहित मुली आहेत ज्यांना लग्नासाठी एकही मुलगा मिळत नाही. सुमारे 600 महिलांच्या या गावात अविवाहित पुरुष शोधणे फारच कठीण आहे.

हे गाव जवळपास 100 वर्षांपासून बाहेरील जगापासून वेगळे झालेले आहे. या गावातील बहुतेक महिलांचे वय 20 ते 35 वर्षांच्या दरम्यान आहेत. गावात राहणारी सर्व माणसे एकतर विवाहित किंवा घर जावई झालेली आहेत. मुलींना लग्न तर करायचेच आहे, परंतु हे गाव सोडून बाहेर देखील जायचे नाही. येथील मुलींची अशी इच्छा आहे की लग्नानंतर मुलगा त्यांच्या गावी येऊन तेथील नियमांनुसार राहायला पाहिजे. मातृशक्तीच्या या गावात शेतीपासून घरामधील सर्व कामे स्त्रियाच करतात. या गावाची ओळख महिलांच्या समुदायामुळेच आहे. हे गाव म्हणजे ब्राझीलमधील “नीवा द कॉरडिरो”.

या गावाची स्थापना मारिया सेन्होरिंहा डी लीमा यांनी केली होती, त्यांना काही कारणास्तव 1891 मध्ये त्यांच्या चर्च व घरामधून हकलून देण्यात आले होते. 1940 मध्ये एन्निसियो परेरा नावाच्या पास्टरने इथल्या वाढत्या समुदायाकडे बघून येथे एका चर्चची स्थापना केली. इतकेच नव्हे तर त्यांनी मद्यपान न करणे, संगीत ऐकणे आणि केस कापायचे नाहीत असे अनेक नियम बनवले. 1995 मध्ये पास्टरच्या मृत्यूनंतर इथल्या महिलांनी असे ठरवले की ते पुरुषाने बनवलेल्या नियमांचे कधीच पालन करणार नाहीत. आणि तेव्हापासूनच तेथे स्त्रियांचे वर्चस्व आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

15 Comments on “एक असे गाव जिथे लग्नासाठी तरसतात मुली पण वरच भेटत नाहीत….”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *