सावधान! शरीरातील ही लक्षणे देतात किडनी खराब होत असल्याचे संकेत!

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती, किडनी हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचं इंद्रिय आहे. रक्तातील नको असणारे घटक काढून टाकून रक्त शुद्ध करण्याचं महत्त्वाचं कार्य किडनी करत असते. मात्र, हल्लीची बदलती जीवनशैली आणि आहाराच्या पद्धती यामुळे मूत्रपिंड खराब होत आहेत. मानवाच्या शरिरात दोन किडन्या असतात. जर त्या दोन्ही किडन्या योग्य प्रकारे काम करत नसतील तर किडनी फेल होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर शरीरातील रक्ताचा महत्त्वाचा भाग किडनी जवळून जात असतो.

रक्त तयार होण्यासही किडनी मदत करते. शरीरातील पाण्याचा समतोल राखणं, आम्ल आणि अल्कलीचे प्रमाण व्यवस्थित ठेवणं, रक्तदाब स्थिर ठेवणं इ. महत्त्वाची कामेही किडनी करत असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला किडनी फेल होण्याची काही लक्षणे सांगणार आहोत जर तुम्हाला ती लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

१. लघवीचा त्रास….! लघवीचा त्रास होणे, ताप येणे, पाठ दुखणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. जास्त प्रमाणात पेनकिलर्स घेतल्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. २. अंगाला जास्त घाम येणे…!खूप जास्त वेळ एखाद्या ठिकाणी बसल्यावर तळव्याला घाम येणे, हे सुद्धा किडनीच्या विफलतेच लक्षण आहे. किडनीची अनावश्यक द्रव्ये काढून फेकण्याची क्षमता कमकुवत असल्याने असं होत असतं. ३. शरीरातील पाणी कमी होणे……! जेव्हा किडनी शरीरातल्या आवश्यक गोष्टी आणि अनावश्यक घटकांचा ताळमेळ साधू शकत नाही. तेव्हा शरीरातील पाणी कमी होत जातं. शरीर कोरडे पडत जाते. शरीरातील पाणी कमी झाल्याने हाडांचे आजार उद्भवतात.

४. श्वास घेण्याची क्षमता कमी होणे…! श्वास घेण्याची क्षमता कमी होणं देखील किडनी विकाराचं एक दृश्य लक्षण आहे. शरीरात असलेलं एक्सेस फ्लुइड त्याला कारणीभूत असतं, जे किडनीच्या कार्याविफलतेमुळे शरीराबाहेर पडू शकत नाही. ५. किडनी शरिरात ‘एरिथ्रोपॉइट्न’ नामक हार्मोन तयार करते.  ज्यामुळे लाल रक्तपेशी  ऑक्सिजन प्रवाहित करतात. ज्यावेळेस किडनीत बिघाड होतो ,तेव्हा हार्मोन्सचे प्रमाण घटते, शरिरातील लाल रक्तपेशी कमी होतात व अ‍ॅनिमिया  बळावतो. परिणामी रुग़्णाला थकवा जाणवतो.

६. तांबड्या रक्तपेशींची संख्या कमी होणे….!किडनी ड जीवनसत्वाचे रुपांतर EPO या हार्मोनमध्ये करते. EPO हार्मोन शरीरातील लाल रक्तपेशीच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असतो. जर किडनी व्यवस्थित काम करत नसतील तर शरीरातील लाल रक्तपेशीच्या निर्मितीवर त्याचा सरळ परिणाम होत असतो. ७. तोंडाची दुर्गंधी येणे…किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर अनावश्यक टाकाऊ पदार्थ शरीरात राहतात. त्यामुळे जिभेच्या चवीवर परिणाम होतो. तोंडाचा वास येतो. वजन प्रचंड कमी होत जातं.

८) पाठीत किंवा कुशीत दुखणे हे  किडनीविकारातील  अगदी  सर्वसामान्य लक्षण आहे. मात्र हे प्रत्येकामध्ये दिसून येईलच असे नाही. कंबरेच्या  खालील भागापासून मांडीच्या सांध्यापर्यंंत  अत्यंत तीव्र वेदना तुम्हाला जाणवू  शकतात.  मुतखडा किंवा मुत्रनलिकेत  खडा झाल्याने देखील हे दुखणे उद्भवू शकते. ९. अपरात्री जाग येणे, झोप न येणे….! शरीरातील अनावश्यक घटक मुत्राशयामार्गे किडनीच्या मदतीने शरीराबाहेर काढले जातात. परंतु जेव्हा किडन्या व्यवस्थित काम करत नसतात तेव्हा अनावश्यक आणि अपायकारक घटक शरीरात जसेच्या तसे राहतात. रक्तातील त्यांचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्त दुषित होत जाते. याचा सरळ परिणाम झोपेवर होत असतो. अपरात्री जाग येणे. झोप न येणे. हे किडनीचे कार्य व्यवस्थित सुरु नसल्याचे द्योतक आहे..

१०. चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे…!किडनीच्या विकारामुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका देखील निर्माण होत असतो. जर २० ते २५ % किडनीचे कार्य व्यवस्थित होत नसेल तर ही परिस्थिती उद्भवते. चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे आणि झोपताना थकवा जाणवणे याचे लक्षण आहेत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.