नमस्कार मित्रानो आपल्याला बऱ्याच लोकांना पाणी हे साधं वाटत असत. म्हणून त्याला कोणत्याही वेळी आणि कितीही प्यायला तरी चालू शकत, अस बऱ्याच जणांना वाटत. पण,जर अस वाटत असेल तर ते फार चुकीचं आहे आणि आता तर उन्हाळा लागला आहे आणि उन्हाळ्यात शरीराला पाणी खूप आवश्यक असत. तर हे पाणी कस प्यावं किती प्यावं, थंड प्यावं की नॉर्मल प्यावं, त्याच प्रमाण किती असावं, कोणत्या वेळी प्यावं याला खूप महत्व असत. कारण पाणी जरी दिसायला साधं असलं तरी आपल्या शरीरातील अवयव चांगल्या रीतीने काम करण्यासाठी, आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाणी खूपच गरजेचं असत.
पोटांपासून त्वचेपर्यंत आणि वजन वाढवण्यापासून ते कमी करण्यापर्यंत पाणी खूप महत्वाची भूमिका निभावत…ही जर माहिती माणसाला चांगल्या प्रकारे माहिती असेल तर त्याला कोणताही आजार होऊ शकत नाही…आणि ही जर माहिती नसेल तर तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला अपचन, कफ,गॅस, लिवर कमजोर, सुस्ती येणे, किडनी स्टोन चा त्रास होणे(मुतखडा), रोग प्रतिकार शक्ती कमी होणे, सतत आजारी पडणे, त्वचेची आलर्जी, त्वचा रोग, चेहऱ्यावर मुरूम येणे, डाग निर्माण होणे, त्याचबरोबर त्वचा खूप ऑईली असणे, किंवा खूपच कोरडी पडणे, खाल्लेले शरीराला ना लागणे, केस गळती, रात्री झोप न येणे,अश्या अनेक समस्या ज्या आहेत या फक्त पाणी चुकीच्या पद्धतीने पिल्याने आणि चुकीच्या वेळी पिल्यामुळे होत असतात. म्हणून आज आपण पाणी कसं पिले पाहिजे कोणत्या वेळी पिले पाहिजे हे आपण पाहणार आहोत…
तर आपल्या शरीरामध्ये 60 ते 70% पाणी असत. आपण पिलेले पाणी आपल्या शरीरातील किडनी, लिवर, फुपुस, पचन संस्था, या सर्व अवयवांच काम जे व्यवस्थित रित्या होण्या साठी पाणी खूप महत्त्वाचं असत..तसेच आपल्या शरीरातील पेशी जिवंत ठेवण्यासाठी पाणी हे महत्वाची भूमिका निभावते. तर आपण एका दिवसात किती पाणी प्यावे..? जर लघवीचा रंग गडध पिवळा झाला असेल, तुम्हाला पचन नीट होत नसेल, चेहऱ्याची त्वचा कोरडी पडत चालली असेल, तर तुम्ही पित असलेलं पाणी ते कमी आहे, तुमच्या शरीराला पाणी कमी पडत आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि याकडे जर तुम्ही योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर भविष्यात तुम्हाला गंभीर समस्याना सामोरे जावं लागेल..त्यासाठी दररोज निश्चितप्रमाणात पाणी पिणे गरजेचं असत. तर पाण्यामध्ये 0 कॅलरीज असतात. अस असूनही हे पाणी आपल्या शरीराला खूप महत्त्वपूर्ण असत. कारण हे पाणी आपल्या शरीरामधील जे विषारी पदार्थ आहेत, हे बाहेर काढण्यासाठी खूप मदत करत. एक सामान्य व्यक्तीने दररोज 3 ते 3.50 लिटर पाणी पिणे खूप आवश्यक असते.
तर आता काही जणांना हा प्रश्न पडला असेल की जास्त पाणी पिल्याने शरीराला काय हानी होते का.? तर याच उत्तर अस आहे की कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात घेतली की नुकसान हे होताच असत. ज्यास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील जे किडनीच काम आहे ते ज्यास्त वाढत, त्याचबरोबर रक्तातील सोडिअम च प्रमाण कमी होण्याची चान्सेस वाढतात. पण अस खूपच कमी प्रमाणामध्ये होत. जर तुम्ही 4 ते 5 लिटर पेक्ष्या जास्त पाणी पीत असाल तरच अस होत. पाणी वेगवेगळ्या पद्धतीने पिल्यामुळे सुद्धा त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होत असतात. म्हणून पाणी हे नेहमी खाली बसून आणि हळूहळू पिले पाहिजे. त्याच पद्धतीने पाणी थोडा वेळ तोंडात ठेऊन पिल पाहिजे. या मुळे तुमच्या तोंडातील जी लाळ आहे ती चांगल्या प्रकारे पाण्यात मिक्स होते. आणि या लाळेमुळे पचन संस्था सुधारते..
तर एका वेळेला किती पाणी प्यायला पाहिजे..? तर ऐका वेळेला 1 ते 2 ग्लासच पाणी प्यायला पाहिजे. या पेक्ष्या ज्यास्त पाणी पिऊ नये. तर पाणी कसलं प्यायला हवं..? तर नेहमी नॉर्मल पाणी प्यायला हवं. थंड पाणी कधीही पिऊ नये. पाणी कधी प्यावं आणि कधी पिऊ नये..? तर जेवण करताना किव्हा जेवण केल्यानंतर 45 मिनटं पाणी प्यायला नाही पाहिजे. अस केल्याने काय होत तर, तुमचे जे पाचक रस आहेत ते चांगल्या पद्धतीने अन्नात मिक्स होतात. आणि तुमचं अन्न जे आहे ते चांगल्या पद्धतीने पचन होत असत. आपण जर त्याचा अगोदर पाणी पिलो..तर तुम्ही जे अन्न खालेलं आहे ते पातळ होत . त्यामध्ये पाचक रस सुद्धा चांगल्या पद्धतीने मिक्स होत नाहीत.. सकाळी उठल्याबरोबर अनुष्या पोटी तुम्हाला 1 ग्लास पाणी प्यायला हवं..तर अश्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं वापर केला. तर तुमच्या शरीरातील अनेक आजार कमी होतील.
Very useful infm
Barobar aahe