मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषयी देशाला संबोधित केले. त्यांनी लोकांना जागरुक राहण्याचे स्पष्ट संदेश दिले आहेत. सध्या देशामध्ये कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. देशात 165 पेक्ष्या जास्त रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळलेले आहेत. काही तासांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली आहे, खर तर देशवासीयांना आवाहन केले आहे. 22 मार्च ला सकाळी ७ ते रात्री ९ जनता कर्फ्यू आमलात आणावा. अस पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. जनता कॅर्फु म्हंणजे नेमकं काय..? आणि जनता कर्फ्युच्या दिवशी आपण काय करायचं ? या बद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
“जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लावण्यात आलेला कर्फ्यू”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. “या रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व देशवासियांना जनता कर्फ्यूचं पालन करायचं आहे. जनता कर्फ्यू दरम्यान कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये. फक्त जे अत्यावश्यक सेवांशी जोडलेले आहेत त्यांनीच घराबाहेर पडावं”, असं मोदींनी आवाहन केलं. “हा प्रयोग आपलं आत्मसंयम, देशहितासाठी कर्तव्य पार पाडण्याच्या संकल्पाचं एक मजबूत प्रतिक असेल”, असं मोदींनी सांगितलं.
22 मार्च, रविवारच्या दिवशी आपण संध्या. 5 वा. सायरनचा आवाज होईल. तेव्हा आपण दारात, खिडकीत, बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे आभार मानूया. टाळ्या वाजवून, घंटी वाजून आभार मानूया, त्याचबरोबर दररोज 10 जणांना फोन करा आणि त्यांना जनता कर्फ्यूचं पालन करण्याचं आवाहन करा, असंही मोदी म्हणाले.असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. “घरातील 60 ते 65 वर्षीय व्यक्तींनी घराबाहेर पडू नये”, असंही आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर काही उपाय सापडलेला नाही, सुरूवातीला सामान्य वाटलं तरी हा रोग लगेच फैलावतो, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. असं म्हणत कोरोना वर कोणता ही इलाज नसल्याबाबत देशाला अवगत केलं.
सामान्यत: जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट येते तेव्हा ते काही देश किंवा राज्यांपुरते मर्यादित असते. मात्र, कोरोना ने संपूर्ण जग सध्या संकटात आहे. साधारणत: नैसर्गिक संकट देशांपुरतं मर्यादित होतं. मात्र, हे संकट जगभर पसरलं आहे. असं म्हणत कोरोना चे संकट किती मोठं आहे. याची व्याप्ती किती मोठी आहे. याची जाणीव मोदी यांनी देशाला करुन दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यापारी आणि श्रीमंतांना मोठं आवाहन केलं. रविवारी संचारबंदी दरम्यान कामगार कामावर येणार नाहीत. त्यामुळे त्या दिवसाचे कामगारांचे पगार कापू नका, असं मोदींनी सांगितलं.
नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आवश्यक वस्तूंचा साठा न करण्याचं आवाहन केलं. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू देणार नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. दूध, अन्न-धान्य, औषधांची कमतरता भासू नये यासाठी सरकारची उपाययोजन असणार असल्याचं मोदी म्हणाले.
छानच माहिती विविध सदर अंतर्गत आपण दिली आहे