या कारणांमुळे तुमच्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करत नाही…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, हिंदू धर्म शास्त्रानुसार घरातील स्त्री ही माता लक्ष्मी असते. म्हणून घरातील स्त्रीने माता लक्ष्मी समान आपले वर्तन ठेवायला हवे. हिंदू धर्मानुसार.. जर स्त्रीने योग्य प्रकारचे वर्तन केले तर त्यामुळे त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धन संपदा सदैव राहते. या उलट जर घरातील स्त्रीचे वागणे या उलट धर्माच्या विरोधी असेल तर मात्र त्या घरामध्ये माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत, ज्या स्त्रियांनी पाळल्या नाहीत तर त्यामुळे त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही टिकत नाही. त्या घरामध्ये पैसा आडका, धन संपत्ती आणि समाधान कधीही राहत नाही. तर चला जाणून घेऊ त्या 5 गोष्टी,

पहिली गोष्ट आहे, ज्या घरातील स्त्रिया झाडूला लाथ मारतात किंवा पायाने ढकलतात, झाडू घेत असताना किंवा अंगण साफ करत असताना, घर साफ करत असताना जर घरातील स्त्रीने झाडूला लाथ मारली तर त्यामुळे माता लक्ष्मी चा अपमान होतो, कारण झाडू हे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचेच एक स्वरूप मानले जाते. म्हणून झाडूला लाथ मारणाऱ्या स्त्रिया ज्या घरामध्ये असतात त्या घरी माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही.

दुसरी गोष्ट आहे, ज्या स्त्रिया खरकटी भांडी गॅस वर तशाच ठेवतात…! खरकटी भांडी कधीही गॅस वरती किंवा चुली वरती ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो त्या उपकर्णावर कधीही ठेऊ नये. मग ती चूल असो किंवा इतर वस्तू, खरकटी भांडी ठेवल्याने किचनमध्येच न्हवे तर संपूर्ण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते.

तिसरी गोष्ट आहे, ज्या घरातील प्रमुख व्यक्ती वा इतर लोक सूर्योदयानंतरही झोपून राहतात. जर एखादी स्त्री दिवसा झोपत असेल तसेच आपल्या सासू-सासऱ्यांचा अनादर करत असेल तर त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. अशा घरात लक्ष्मी दीर्घकाळासाठी वास करत नाही. यासोबतच आळशी लोक, देवावर विश्वास नसलेले, भ्रष्टाचारी, चोर तसेच कपटी लोकांच्या घरी लक्ष्मी राहत नाही. अशा लोकांवर लक्ष्मीची कृपा राहत नाही. .

चौथी गोष्ट आहे, उंबऱ्यावर बसून जेवण करणे…! बऱ्याच स्त्रियांना उंबऱ्यावर बसून जेवण करण्याची किंवा गप्पा मारण्याची सवय असते, अशा स्त्रियांच्या घरी माता लक्ष्मी येत नाही, कारण उंबरठ्यावर बसून जेवणे हे माता लक्ष्मीच्या येण्यामध्ये एक अडथळा मानण्यात येतो.

ज्या घरात छोट्या छोट्या कारणांमुळे वाद होत असतो. अथवा पती अवाथ सासू-सासरे वारंवार आपल्या सुनेला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून बोलत असतात अथवा तिचा अपमान करत असतात. तिच्याशी नोकराप्रमाणे वागतात अशा घरात लक्ष्मी टिकत नाही.

पाचवी गोष्ट आहे, उशिरा पर्यंत झोपणे….! ज्या घरातील स्त्रिया उशिरा पर्यंत झोपतात म्हणजेच सकाळी लवकर उठत नाहीत त्या स्त्रियांच्या घरी कधीही पैसा धन संपदा येत नाही. जरी ती धन संपदा आता दिसत असली तरी देखील हळूहळू त्या पैशांमध्ये कमी येऊ लागते, या स्त्रियांच्या सासरी तसेच माहेरी सुद्धा नंतर दारिद्र्यआणि गरिबी येते. तर ह्या होत्या त्या 5 गोष्टी….
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा

By Admin

One thought on “या कारणांमुळे तुमच्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करत नाही…

  • Suresh Sunar -

    कोरोना मुळे शाळा कॉलेज मॉल नाट्यगृह बरोबर दारूची दुकाने त्वरित बंद करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.