यावेळी चुकूनही पिऊ नका पानी, ठरते विषसमान…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती पाण्याला आपण इतके साधारण समजतो आपल्याला असे वाटते की आपण पाणी कधीही कितीही प्रमाणात पाणी पिऊ शकतो. परंतु आपला असा विचार करणे चुकीचे आहे. कारण जेवढे पाणी दिसायला साधारण वाटते तेवढेच ते आपल्या शरीरातील सर्व अवयवांना आणि शरीरामध्ये तयार होणारे घातक द्रव्य यांना बाहेर उत्सर्जित करण्यासाठी महत्वाचे ठरते.

भारतीय संस्कृती मध्ये पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे, वैज्ञानिक दृष्ट्या पाण्याचे महत्व आपल्याला माहिती असेलच. पण पाणी कधी प्यावे व कधी पिऊ नये याची माहिती तुम्हाला आहे का? पाणी जसे अमृत आ,हे तसेच ते पाणी विष बनते. ते आपण पुढे पाहणार आहोत, अपचन, गॅसचे प्रॉब्लेम, करपट ढेकर, जळजळ, कफ, मल साफ न होणे. हे सर्व प्रॉब्लेम उद्भवू शकतात व त्याच बरोबर 48 असेच आजार या पाणी पिण्यामुळे दूर करू शकतो. या साठी चार सूत्रांचा वापर करावा लागेल.

पहिले सूत्र आहे पहाटे 4 वाजता सव्वा लिटर पाणी प्यावे….! बरेच लोक म्हणतील फक्त पाणी पिण्यासाठी आम्ही 4 वाजता उठू शकत नाही, तर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा पहिले पाणी प्यावे, सव्वा लिटर म्हणजे चार ग्लास होतात. सुरवातीला चार ग्लास पिणे थोडे अवघड जाईल, पण तुम्ही एका ग्लास ने सुरुवात करू शकता व त्यानंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवू शकता. सकाळी पाणी पिण्याने तोंडामध्ये तयार झालेला लाळ पोटामध्ये जातो. हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते. गॅस चे सर्व प्रॉब्लेम यामुळे दूर होतात. व हे पाणी आतड्यांना साफ करण्याचे काम करते.

दुसरे सूत्र आहे पाणी चहा पिल्या प्रमाणे प्यावे…! सुरर$$ असा आवाज करत थोडे थोडे पाणी प्यावे ज्यामुळे ज्या प्रमाणे चहाचा घोट असतो, अगदी त्याच प्रमाणे छोटा पाण्याचा घोट घ्यावा.

पूर्ण एका दिवसामध्ये अडीच ते तीन लिटर पाणी पिण्यात यावे जर उन्हातून आपण आला असाल तर एका श्वासात एक ग्लास भरून पाणी पिने धोक्याचे ठरू शकते कारण त्यावेळी आपल्या शरीराचे तापमान जास्त असते.

तिसरे सूत्र आहे जेवणानंतर चुकूनही पाणी पिऊ नये. जेवणा नंतर पाणी पिणे म्हणजे विष पिल्यासारखे आहे, जेवण नंतर पाणी पिल्यास पचन क्रिया बिघडते. पचन क्रिया सुरू असताना जमलेली ऊर्जा नष्ट करण्याचे काम हे पाणी करते. म्हणून जेवणा नंतर किमान ४५ मिनिटानंतर पाणी प्यावे. अगदी नाईलाज असल्यास किंवा घास अडकल्यास थोडेसे पाणी प्यावे,

काकडी टोमॅटो यासारख्या फळभाज्या खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे टाळावे. तसेच डाळिंब संत्री केळी टरबूज यासारखी फळे खाल्ल्यानंतर ही आणि दुसरी फळे खाल्ल्यानंतर ही लगेच पाणी पिण्याचे टाळावे कारण पाणी पिण्यामुळे खाल्लेले अन्न सक्त होऊन पचन प्रक्रिया मंदावते. याचबरोबर गरम पदार्थांचे सेवन केल्यानंतर जसे की गरम चहा गरम सूप पिल्यानंतर लगेच पाणी पिले तर दातांना आणि हिरड्यांना नुकसान होऊ शकते.

चौथे सूत्र आहे थंड पाणी प्राशन करू नये, फ्रीज मध्ये ठेवलेले थंड पाणी किंवा कुलर द्वारे केलेले थंड पाणी आपल्या शरीरासाठी विषा प्रमाणे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या थंड पाण्याचे प्राशन करू नये. अगदीच जर नाईलाज असेल तर आपण मठातील थंड पाणी घेऊ शकतो. ही चार सूत्रे प्रमाणिक पणे 15 दिवस व योग्य प्रकारे आचरणास आणल्यास 48 आजार दूर होतील. याचा परिणाम फक्त पंधरा दिवसांतच तुम्हाला दिसू लागेल. व्यवस्थित झोप लागेल, भूक लागेल, पचन चांगले होईल चक्कर येणे, डोकेदुखी किंवा एक साईटला डोके दुखणे. हे सर्व काही प्रकार ठीक होतील. हे चार सूत्र अवलंबण्यासाठी कोणालाही पैसे खर्च करावे लागणार नाही, पण हे उपाय घरीच करण्यासारखे आहेत. व याचा फरक देखील तुम्हाला पंधरा दिवसांतच दिसून येईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

2 Comments on “यावेळी चुकूनही पिऊ नका पानी, ठरते विषसमान…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *