मुलगी का असावी ? बघा नक्की आवडेल तुम्हाला….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला पोटी एक तरी मुलगी का असावी याबद्दल एक सुंदर कविता सांगणार आहोत, तर चला आम्ही ती सुंदर कविता तुम्हाला एकवतो. ज्यांना मुली असतात ना ते खरोखरच खूप नशीबवान असतात. मुलीचे प्रेम, मुलीची माया काही वेगळीच असते. तुम्ही खूप कविता ऐकल्या असतील पण ही रचना काहीशी वेगळी आहे, हृदयाला भिडून जाणारी आहे आम्हाला खात्री आहे तुम्हाला हो कविता नक्की आवडेल.

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून,बाबाला घास भरवण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
रोज संध्याकाळी, दमलास का रे बाबा आज असं म्हणण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
लगेच राग सोडून, बाबाला मिठी मारण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
रडू नको ना बाबा म्हणण्या साठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
मुलगी असून आईची माया देण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
शाळेत सोडायला तूच ये , असं बाबा जवळ हट्ट धरण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
आई पेक्षा मला बाबा आवडतो, असं म्हणण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
उमेदीने तिचा मुद्दा ,बाबाला पटवून देण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
आई चिडल्यावर, बाबाच्या मागे लपण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
बाबाला कन्या दानाचे सुख देण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
सासुराला जातांना, बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी …

👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧
पाडवा सणाला ,बाबाला भारी साडी मागण्यासाठी …

मित्रांनो कशी वाटली कविता ? आवडली ना तुम्हाला ?कविता कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *