नवरा तो नवराच असतो, मला आवडलेली एक सुंदर काव्यरचना…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला खूप छान कविता सांगणार आहोत जी तुम्हाला नक्कीच आवडेल, चला तर मग सुरवात करूया,

नवरा तो नवराच असतो,
कितीही रागवला तरी मायेने तोच जवळ घेतो….!
कितीही रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात,
आपल्या मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात…..!
कितीही दुःखी असला तरी सारे गिळून घेतो,
कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो…..! खरच नवरा तो नवराच असतो

काळजी का करतेस मी आहे ना अस म्हणून किती धीर देतो,
साऱ्या अडचणी आपल्या मनात ठेवून बायकोकडे मात्र हसऱ्या नजरेने पाहतो….!
जस घरावर छत असत तसच,
आपल्या डोक्यावर झाकण असत नवरा नावच…!
किती सुरक्षित असतो आपण त्याच्या सावलीत.
उन्हाचे चटके तो खातो, आपल्याला मात्र सावली देतो….!खरच नवरा तो नवराच असतो

आपण चार अलंकार घालून म्हणतो मान माझी…. मंगळसूत्र तुझं,
कपाळ माझ…. बिंदी तुझ्या नावाची,
तो कधी म्हणतो का? कष्ट माझे… पगार तुझा, शरीर माझ… आयुष्य तुझं, जन्म आईच्या उद्गात…
पडलो तुझ्या पदरात, तूच जीवन संगिनी म्हणून गोड मानत असतो…… खरच नवरा तो नवराच असतो

संसाराचा रथ दोन चकांवर चालतो, त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो…!
एक चाक डगमगल तर एका चाकावर रथ थाटन खूप अवघड होतं.
बायको शिवाय घराला घरपण नाही, तसे नवऱ्या शिवाय बायको पूर्ण नाही….!
तो कळस आहे घराचा, छत आहे परिवाराचा….!
चटके तो खातो, आपण मात्र सावलीत राहतो….! खरच नवरा तो नवराच असतो

आयुष्यातील सर्व पोखळ्या भरता येतील पण नवऱ्याची पोखळी कधीच भरू शकणार नाही
म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या, प्रेमाची साथ द्या, जीवन भरपूर आहे जगण्याचा आनंद घ्या…!!

मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.