जाणून घ्या सकाळी उपाशीपोटी चहा घेतल्याने नेमकं काय होतं…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला सकाळी उपाशीपोटी चहा पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय काय होते याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. खूप साऱ्या लोकांना सकाळी उठल्यानंतर गरमा गरम चहा पिण्याची सवय असते. व तो चहा अदरक, तुळस, दालचिनी, विलायची इत्यादी गोष्टी पासून चहा बनवलेला असतो व या गोष्टींचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. पण आपण जर सकाळी उपाशी पोटी चहा पीत असलो तर त्याच्या पासून आपल्याला काय तोटे होतात, हे आपल्याला माहित असायला पाहिजे.

सकाळी उठल्यानंतर बेड वरच चहा पिण्याची सवय शहरातल्याच लोकांना नाही तर गावाकडल्या लोकांना सुद्धा आता ती सवय लागलेली आहे. सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय आपल्या शरीरासाठी स्वस्थकारक आहे का? हे आपल्याला माहित असायला पाहिजे, सध्या आपल्या भारत देशामध्ये चहा पिण्याची सवय ही खूप कॉमन आहे. आपण ऐखाद्या ठिकाणी मित्रांसोबत बसलेला असलो आणि जर आपण चहा नाही पिलो तर आपल्याला वाटते कि आपण काही तरी विसरलो आहे, व असे वाटणे कॉमन गोष्ट झाली आहे. आपल्या देशातील 90टक्के लोक सकाळी उठल्यानंतर चहा पिणे पसंद करतात. सध्या झालेल्या सर्वेनुसार भरपूर लोक सकाळी उठून उपाशी पोटी चहा पिणे पसंत करतात, परंतु ही सागळ्यात वाईट सवय आहे. असे सिद्ध झाले आहे.

चहा मध्ये जास्त प्रमाणात कॅफिन, कॅथलीन, कोयलिन आहे व हे आपल्याला उतेजीत करण्याचे काम करते म्हणजे स्टीमलायजेशन, परंतु सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची ही सवय सुटतच नसेल तर पहिल्यांदा सर्व प्रथम तुम्ही हलका फुलका नाष्टा करा. त्यानंतर अर्ध्या तासानंतर चहा प्या, जर तुम्हाला जास्त चहा पिण्याची सवय असेल तर तुम्हाला आत्ताच योग्य वेळी सावध होण्याची खूप गरज आहे. कारण जास्त चहा पिल्याने आपल्या पोटाच्या आतील भागांना खूप सारे नुकसान पोहचू शकते. काही लोकांना ब्लॅक टी पिण्याची सवय आहे परंतु त्यांना हे माहित असायला पाहिजे की उपाशी पोटी ब्लॅक टी पिणे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे आणि आपल्याला हे पण माहित असायला पाहिजे की चहामध्ये आपण जी साखर वापरतो. ती आपल्या मधील मोटेपणा वाढवते म्हणजेच ती आपल्याला आकाराने मोठे बनवते. तर चला सकाळी उपाशी पोटी चहा पिण्याचे 5 नुकसान कोणते आहेत ते जाणून घेऊ.

1. सकाळी उपाशी पोटी चहा पिल्यानंतर…. आपल्या शरीरातील जे पाइल्स ज्यूस आहे ते आपल्या लिव्हर च्या संबंधित आहे व ते अनियमित होऊ शकते व त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर अंधारी येणे, मुंग्या येणे, त्याचबरोबर सारखे सारखे घाबरल्या सारखे वाटणे अशा समस्या होऊ शकतात.  2 असे म्हणतात ब्लॅक टी पिणे आपल्या शरीरासाठी खूप चांगल आहे परंतु जास्त प्रमाणात ब्लॅक टी चा वापर करत असेल तर त्यांचा दुष्परिणाम असा होतो की त्यामुळे आपले पोट फुगत आणि भूक लागत नाही. 3 काही लोक जास्त दुधाचे प्रमाण असणारा चहा पिणे पसंद करतात, पण जर सकाळी उपाशी पोटी आपण जास्त दुधाचा चहा पीत असाल तर त्याचे देखील काही दुष्परिणाम आहेत व ते असे की, आपल्याला थकवा लवकर येतो, आणि त्याचबरोबर आपण जर जास्त दुधाचा चहा पीत असेल तर आपली चीड चीड देखील वाढते. त्यामुळे शिल्लक गोष्टीवरून देखील आपला चीड चीड पणा वाढतो.

4 काही लोकांना गरमा गरम कडक चहा पिण्याची खूप सवय असते, परंतु त्यांना देखील तसा चहा पिण्याचा कोणता दुष्परिणाम होतो ते माहित असायला पाहिजे जर आपण अशा पद्धतीने चहा पीत असाल तर आपल्या पोटामध्ये अल्सर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये जखमा देखील होऊ शकते व तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे.  5. काही लोकांना जास्त चहा बनवतात आणि नंतर तो चहा सारखा सारखा गरम करून पितात.. परंतु हे देखील आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे.

आता जाणून घेऊ सकाळी उपाशीपोटी चहा पिल्याने आपल्याला कोण कोणते रोग होऊ शकतात, तर चला जाणून घेऊ सकाळी उपाशी पोटी चहा पिल्यानंतर कोणते 4 रोग आपल्याला होऊ शकतात.  1. जर आपण सकाळी उठून उपाशी पोटी चहा पीत असाल तर आपल्याला प्रोटेस्ट कॅन्सर होऊ शकतो व पुरुषांना अशी समस्या होऊ शकते. अनेक रिसर्च मधून हे सिद्ध झाले आहे आणि खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी देखील असे सांगितले आहे.

2. उपाशी पोटी चहा पिल्यानंतर माणसाला खूप लवकर थकवा त्याच बरोबर त्याचा चीड चिडपणा देखील वाढतो. 3. उपाशी पोटी अदरक चा चहा पील्यामुळे पोटामध्ये गॅस निर्माण होतो आणि जर आपण ब्लॅक टी पीत असाल तर त्यामुळे आपले पोट फुगत. 4. उपाशी पोटी चहा पिल्यामुळे माणसाच्या शरीरावर खूप सारे दुष्परिणाम होतात. जर आपण अशा पद्धतीने चहा पीत असाल तर आपल्या शरीरामध्ये प्रोटीन त्याच बरोबर आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक विघटक यांचे अब्जार्वेशन व्यवस्थित होत नाही.

तर मित्रांनो हे होते उपाशी पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.