सकाळी उठताच काय सर्व जण काय करतात पहिला मोबाईल चेक करतात पुढे काय काम आहे, याचा विचार करून काम पूर्ण करण्यासाठी आणि धावपळ करतात. काही जण अगदी निवांत अंघोळ करून नाश्ता करून टीव्ही बघण्यात मग्न होतात . या सर्वप्रकारामध्ये म्हणजेच मोबाईल टीव्ही, टाइमपास यामुळे फायदा नाही तर नुकसान होतं. सकाळी जेव्हा जाग येते, तेव्हा तुम्ही फ्रेश असता, मनाने व मेंदूने, जरी डोळ्यामध्ये थोडी झोप शिल्लक असली, तरी तुमची बॉडी विश्रांती घेऊन पुन्हा चार्जस झालेली असते. बॉडी प्रमाणेच तुमचा मेंदू सुद्धा पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेला असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर जे काही कराल त्यांचा परिणाम तुम्हाला दिवसभर पाहायला मिळतो.
ज्या लोकांची सुरुवात टीव्ही, मोबाईल,वायफाय टेन्शन नी होते, त्यांना दिवस मध्यम किंवा खराब जातो. कामामध्ये मन लागत नाही, काही तासामध्ये दिवस कंटाळवना वाटायला लागतो. पूर्ण दिवस वाया गेल्यासारखी भावना निर्माण होते. म्हणून सकाळी जाग आल्यावर पहला शांतपणे उठून बसा, बिनाकारण उठताच कामाचा विचार न करता, तुम्हाला मिळालेला चांगल्या गोष्टीचा विचार करा. मनामध्ये तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करा. मला आनंद वाटतो कारण माझ्या कडे प्रेमळ कुटुंब आहे, चांगली नोकरीं आहे, सुखी संसार आहे. काही जीवनातील सुखद क्षण आठवा, ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात आनंदानी होईल. या कामासाठी फक्त 5 मिनिटे वेळ द्या.
तुमचं ध्येय, स्वप्न पूर्ण झ्याल्याची जाणीव मनाला करून द्या. जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे व त्यांचा आनंद तुम्ही घेत आहे. सर्वकाही तुम्ही कमावलं आहे. ज्यामुळे सुखी व आनंदी व्यक्ती तुम्ही बनला आहात, अशी कल्पना तुम्ही 5 मिनिटे करायला सुरुवात करा. ज्यामुळे तुमचं सबकॉन्शियस माइंड पॉसिटीव्हली चार्ज होतो व ऍक्टिव्ह होतो. दररोज तो विचार केल्याने सबकॉन्शियस माइंड त्याचं प्रटर्न बनवायला सुरुवात करतो आणि हाच प्रटर्न तुमच्या मेंदूला ते काम करण्यासाठी प्रवृत्त करतो, म्हणून दिवसाची पहिली ही 10 मिनिटे खूप important असतात. यानंतर तुम्ही मोबाईल चेक करू शकता, महत्वाचा कॉल मेसेज, मेल करायचा असेल ते तुम्ही करू शकता. पण त्यानंतर मात्र मेडिटेशन करायला हवं. फक्त 15 मिनिटे शांतपणे मेडीटेशन करा, ज्यामुळे तुमच्या चंचल स्वभाव शांत होईल.
डोक्यामध्ये बिनाकारण गुहावणारे नकारात्मक विचार नियंत्रणा येतील. म्हणून मेडिटेशन करून व शारीरिक व मानसिक दुष्टीने सुदृढ बनायला सुरुवात करा. त्यानंतर सोबतच 10 ते 15 मिनिटे व्यायाम करु शकता. व्यायाम करण्यासाठी जिम ला जावेच अशी काही गरज नसते, जिमला जाणे शक्य नसेल तर घरीच बैठका सूर्य नमस्कार , दोरी उड्या, रनिंग आणि इत्यादी तुम्ही करू शकता.व अशाप्रकारे ४० ते ४५ मिनिटामध्ये दिवसाची सुरुवात सुंदर बनवू शकता, सोबत तुमचं आयुष्य देखील सुंदर बनेल, अशा करतो तुम्हाला हि माहिती आवडली असेलच, त्यामुळे तुम्ही शेअर नक्की करा.
खुप छान माहिती दिली आहे.