तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची वक्ती… वाचा या लेखात…

एका कॉलेज मध्ये हॅपी Marriage लाईफ वर एक कॉम्पिटीशन चालू होती. ज्यात काही कपल्स नी पार्टीसिपेट केलं होतं. कॉम्पिटीशन घेणारे ते प्रोपेसर आले, त्यांनी येताना पाहिल की असे खूप सारे कपल्स लग्नावर खूप सारे जोक करत होते, हसत होते. हे पाहून ते प्रोपेसर बोलले,…की चला एक गेम खुळूया…! सगळे इंटरेस्ट घेऊन त्यांच्याकडे पहायला लागले. की काय असेल हा गेम.? त्यांनी त्या गेम ला सुरवात केली. त्यांनी एका लग्न झालेल्या जोडीला स्टेजवरती बोलावलं. आणि ते बोलले, ज्या तुझ्या जवळच्या व्यक्ती ज्या तुला खूप जवळ वाटतात अश्या व्यक्तींची नावे ब्लॅकबोर्ड वरती लिही. 25 ते 30 नावे लिही..त्या मुलीने नावे लिहायला सुरुवात केली…

पहिले तिने तिच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे लिहिली, नंतर शेजाऱ्यांनी लिहिली, नंतर मित्रांची लिहिली, आणि तिच्या काही ऑफीस मधील लोकांची नावे लिहिली….मग ते प्रोपेसर बोलले जी तुला कमी महत्वाची नावे आहेत ती 5 नावे कमी कर.! मुलीने तिच्या काही ऑफीस मधील लोकांची नावे कमी केली…त्या प्रोपेसरने आणखी 5 नावे कमी करायला लावली. मग तिने थोडा विचार करून शेजाऱ्यांची नावे कमी केली… आता त्या प्रोपेसर ने सांगितले की आणखी 10 नावे कमी कर,,मुलीने परत थोडा विचार केला. आणि तिचे मित्र मैत्रीणी यांची नावे कमी केली….

आता बोर्डवरती उरली होती फक्त 4 नावे. तिचे आई वडील, पती आणि मुलाचे नाव. आता प्रोपेसर ने सगळ्यात कठीण गोष्ट सांगितली. यांच्यातील दोन नाव अजून पुसून टाक. ती मुलगी दुःखी होऊन गेली. तिला रडू येऊन गेलं. तिने कसं तरी करून आई वडिलांचे नाव पुसून टाकलं. तिथे जमलेले सर्व जण शांत होऊन गेले होते….गेम तर त्या मुली बरोबर चालू होता पण परिणाम सर्वांवर होत होता.

आता बोर्ड वर फक्त 2 नाव उरली होती. तिच्या मुलाचं आणि तिच्या पतीचं.. आणि आता त्या प्रोपेसर आणखी एक नाव पुसायला सांगितलं, आणि त्या मुलीला जणू धक्काच बसला. ती खालीच बसली. तिने खूप विचार केला आणि कसं तरी तिच्या मुलाचं नाव पुसून टाकलं..आणि त्या नंतर त्या प्रोपेसराने तिला विचारलं की तू अस का केलस? ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला त्यांचंही नाव तू पुसून टाकलस. ज्या तुझ्या मुलाला तू जन्म दिलास त्याच ही नाव तू पुसून टाकलस. आणि तुझ्या पतीचं नाव राहू दिलस. तू अस का केलंस..?

तिने सांगितलं की माझ्या जागी माझी आई जरी असती ना तरी तिने हेच केलं असत. मला माझ्या आईने शिकवल होत, की आईवडील नेहमी तुझ्याबरोबर नाही राहणार आणि मुलगा लग्नानंतर बहुतेक तुमचा नाही राहणार. पण तुझ्या जीवनाचा तुझ्या शरीराचा भाग म्हणून जो नेहमी तुझ्या सोबत राहील तो म्हणजे तो तुझा पती …जो नेहमी तुझ्या सोबत राहील. तो म्हणजे तुझा पती, म्हणून मी पतीचं नाव दिल. आणि हे ऐकून तो हॉल टाळ्यानी गजगजून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published.